तिबेटच्या अस्मिता व संघर्षाचे प्रतीक असलेले आणि निर्वासित जीवन जगताना धैर्य, शांती व अहिंसेचा परिचय देणारे दलाई लामा यांचा ६ जुलै रोजी ८४ वा जन्मदिन होता. त्यानिमित्याने त्यांच्या कार्याची आणि तिबेटी आध्यात्मिक स्वातंत्र्य लढ्याच्या सध्याच्या परिस्थितीची समिक्षा करणे जरुरी आहे. […]
ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या ९९६ स्फुट रचनां मधली सर्वोत्कृष्ट रचना ही असावी … या गाण्यात विठ्ठलाच्या उत्पतीचा मागोवा घेतलाय ,गाणं तर अर्थपुर्ण सुंदर आहेच पण आशयाच्या दृष्टीने ही बहुअर्थसूचक ,शब्दांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या अनुभुती चं आकलन करुन देणारा आहे … ‘कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु …!’ […]
चोडण येथील युवक उदय मांद्रेकर गेल्या सत्तावीस वर्षांपासून पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, छायाचित्रकार, फिल्ममेकर्स यांना चोडण बेटाचे दर्शन करवून देण्याचे काम करतो. मांद्रेकर म्हणतात, आपल्याला यात कसलाच स्वार्थ नाही. परंतु जेव्हापासून आपल्याला या बेटाचे महत्व कळले आहे, तेव्हापासून एक जागरूक नागरिक या नात्याने आपण इथे येणाऱ्यांना पक्षी दर्शन करण्यास नेतो. त्यातून जे काही ही माणसं देतात, ते गोड मानून घेतो. […]
आबासाहेब गरवारे यांना नक्कीच महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार म्हणून मानले जाते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. शून्यातून उद्योग सुरू करून त्यांनी गरवारे मोटर्स, गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन, गरवारे वॉल रोप्स अशा अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. […]
कला अकादमीची अखिल गोवा भजनी स्पर्धा ही भजनसम्राट मनोहरबुवा शिरगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केली जाते. 1979 साली मनोहरबुवा शिरगावकर कैलासवासी झाले. मनोहरबुवांच्या स्मरणार्थ कला अकादमीचे तत्कालीन अध्यक्ष व गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या सूचनेवरून कला अकादमीने भजन स्पर्धा गोव्यात सुरू केली. […]
वारली चित्रकला ही जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. वारली ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात असून त्यांची ही कला ही या जमातीची ओळख बनलेली आहे. पण ही ओळख एवढीच मर्यादित नाही. वारली समाजात होणारा विवाह संस्कार हासुद्धा त्यांच्या कलेइतकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याविषयी हा लेख. […]
तिन्हीसांजेला मन असंच खूप हळवं झालं ….पार दूर दक्षिणेला … समुद्र किनाऱ्यावर जावंसं वाटायला लागलं …. बारदेशात …. खरं तर अति प्रबळ इच्छा झाली … इतकी की वाऱ्याच्या वेगाने धावत जावं … पण वास्तवातलं जग तेवढं सोपं नाही ना … प्रत्यक्ष जरी जाऊ शकलो नाही तरी मन मात्र शेकडो मैल दूर असलेल्या त्या किनाऱ्यावर गेलंच […]
भक्तांपर्यत माझ्या डेंटल ट्रिटमेंटची बातमी कशी काय लिक झाली कळायलाच मार्ग नाहीये. मला पुसटशीही कल्पनाही नव्हती की भक्त माझ्या मागावर आहेत आणि शेवटी एक दिवस माझा निजी दंत चिकित्सक दत्तु दातारला त्यांनी माझ्या अपरोक्ष गाठलेच. कसली एवढी भुरळ घातली माहित नाही पण माझ्या डेंटल ट्रीटमेंटची पूर्ण डीटेल्स भक्तांनी, त्याच्याकडुन मिळवली; किती इंप्लांट किती रुट कँनॉल, किती क्राउन, एकुण खर्च, वगैरे, वगैरे. […]
इंटरसर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आली. त्याजागी नवीन प्रमुखाची नियुक्तीही तितक्याच घाईने झाली. लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांना आयएसआयच्या प्रमुखपदावर आठ महिने राहू दिल्यानंतर त्यांची बदली आता करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयएसआयचे नवे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. […]