मला ‘बाल’वयात जेंव्हा टक्कलाविषयी फारशी माहीती नव्हती तेंव्हा वाटायच की काही लोक जसे केस वाढवतात तसेच काही प्रतिस्पर्धी लोक टक्कल वाढवत असावेत. वाढत्या वयानुसार टक्कलांचे विविध आकार तसेच तुरळक केसांचा त्याच्या अवती भवतीचा वावर हा माझ्या टक्कलाविषयीच्या उत्कंठेचा केंद्रबिंदु होत गेला. टक्कल या विषयाचा खोलवर विचार करत करत आता तर माझेही केस झडत जाउन मीही स्वयंप्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे परंतु तरीही माझा त्याविषयीचा अभ्यास तितक्याच चिकाटीने चालू आहे. […]
वर्षानुवर्ष आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे चटके सहन करत संविधानिक मार्गाने आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या सकल मराठा समाजाच्या संघर्षाला यश आले असून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्यांत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपली मोहोर उमटवली आहे. […]
सुमारे आठ वर्षांपूर्वी फ्रान्सच्या लवेरा शहराजवळील बंदरात आमचे जहाज नांगर टाकून उभे होते. आम्ही कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी येऊन थांबलो होतो. जहाजाने किनाऱ्याजवळ नांगर टाकला होता. समोर एका छोट्याशा बेटावर एक टुमदार किल्ला दिसत होता. […]
वळवाचे पाऊस सुरू झाले,पहिल्या पेरण्या झाल्या की वारक-यांना वेध लागतात पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीचे. मनामनात गजर सुरू होतो “ विठ्ठल विठ्ठल , जय जय पांडुरंग हरी…” वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. मी अगदी लहानपणापासून ज्ञानोबांच्या पालखीचे दर्शन, वारीला जाण्याची गडबड बघत व अनुभवत आलेली आहे. पण ते सर्व पुण्यासारख्या शहरी वातावरणात आलेल्या वारीची. प्रत्यक्ष वारक-यांशी बोलणे किंवा त्यांची […]
लोकशाहीमध्ये माओवाद्यांशी लढणे हे देशभक्त सामान्य नागरिकांचे पण काम आहे. माओवादी हिंसाचाराच्या मागे उभ्या राहणाऱ्या तथाकथित मानवतावाद्यांचा पर्दाफाश करावा लागेल. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये माओवाद्यांविरुद्ध एक अक्षर लिहीले गेले नव्हते. 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माओवाद्यांना विरोध हा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा विषय बनला पाहिजे. […]
जीवन संघर्षाचे दुसरे नाव आहे असे आपण नेहमीच म्हणतो. आणि ते अगदी बरोबर पण आहे. मानवी जीवन अनेक प्रश्नाने गुंतलेले असते. प्रत्येक जीव कुठल्यातरी विचाराने त्रस्त झालेला असतो. कुणाला संपत्ती कशी सांभाळावी याची काळजी असते तर कुणाला, आजच्या सांजेला तरी पोटभर भाकर मिळावी अशी आशा असते. […]
मोबाईलवरचा फोटो माझ्या संकटविमोचक मुलीला सेंड करुन ” पोळपाटावरचा जिन्नस झुम करुन पहा आणि कसा खायचा ते सांग ” असे कळवले. ताबडतोब तिचा फोन आला आणि आळीपाळीनी तिच्या इंन्स्ट्रक्शन घेत घेत आम्ही सिझलरला गिळंकृत केल. […]
आपण टीव्ही वर जेव्हा कार्यक्रम पाहतो तेव्हा आणखी काय काय दिसते? प्रत्येक चॅनेल आपले नाव, तारीख व वेळ दाखविते. याव्यतिरिक्त बर्याच वेळा टीव्हीचा पडदा इतर कशा-कशाने व्यापलेला असतो. हे ‘इतर’ म्हणजे काय? तर कार्यक्रमांसंबंधी आणि प्रयोजक कंपन्यांच्या वस्तू व सेवेशी संबंधित जाहिराती, सूचना, निवेदने, आवाहने इत्यादी. हे सर्व चित्र, लिखित शब्द (Text) व ध्वनी या स्वरूपात असते. टीव्ही पहात असताना डोळे व कान काम करत असतात आणि हो, मेंदूही. […]
भेंडीबाजार घराण्याची दुर्मीळ झालेली गायकी तीन तपांच्या निरंतर प्रयत्नांनी पुन्हा प्रस्थापित करून ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. समाजातील सर्व स्तरांमध्ये अभिजात संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली. […]
आपली व्होटबॅंक फुगवण्यासाठी ३० वर्षांपासून डाव्या आघाडीच्या राज्य सरकारांनी आणी तृणमूल काँग्रेसने मागच्या १० वर्षात पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरी मोठ्या प्रमाणावर होऊ दिली. बंगालचे बांगलादेशीकरण करण्यासाठी डीजेएमआय व आयएसआयने मिळून गेल्या ४८ वर्षांपासून पश्चिम बंगालच्या लोकसंख्येची प्रतवारी बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालविला आहे. भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळवून बांगलादेशी घुसखोर भारतात स्थायिक झाले आहेत. […]