जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती. […]
वेधशाळेनी हलक्याहून अधिक आणि मध्यमहून कमी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केलाय म्हणजे नक्की काय याचा मथितार्थ माझ्याही आधी आमच्या एरीयातील डासांना कळला आणि त्यांनी अक्षरशः हैदोस घातला. मानवीडंखासाठी आसुसलेले त्यांचे दात शिवशिवायला लागले. […]
एक खवैया व त्यात खाउपीऊ घालण्यात आनंद लुटणारा या माझ्या पिढीजात स्टेटसमुळे मी राहतो तिथल्या म्हणजेच पुण्याच्या खाद्यसंस्कृतिशी एकरूप झालोय. डोक्यातली वळवळ आणि पोटातली कावकाव यांच्या संगनमताने कित्येक खाद्य चढायांवर मी जीव निछावर केलाय. पुण्यात आज शुक्रवार संध्याकाळ आहे अशी वदंता पसरायचाच अवकाश, बर्याचशा घरी गँसची शेगडी व मँडम यांची द्रुष्टाद्ष्ट चहा कॉफी पुरतीच होत असेल आणि त्या शुक्रवार संध्याकाळपासुन रविवारच्या रात्रीपर्यंत क्षुधाशांतीच्या विविध होमकुंडांभोवती पुणेकर खवैयांची भ्रमंती चालुच असते. […]
चांगल्या कामासाठी “नाही” हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..हो अगदी बरोबर ओळखलं…”डॉ. प्रकाश बाबा आमटे” या भाऊंच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये आपले नाना पाटेकर ज्यांना “येम्पलवार” म्हणून बोलावतो ना … तीच ही व्यक्ती.‘मनोहर नारायण येम्पलवार’ …… […]
आपल्या गावात आणि शहरातही अनेकदा वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार बर्याचदा होत असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते. तसेच वीज जाते आणि येते, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे. […]
प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. पण ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचे मित्र मात्र समाजाच्या सर्व थरांतले होते. नाव जितेंद्र पण मंगेशीतले सर्वजण त्यांना ‘गंपू’ म्हणून हाक मारायचे. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर […]
भारतातले ‘सिनेमावेडे’ लोक १९५२ सालात जन्मले असावेत हा माझा लाडका आणि दृढ समाज आहे. कारण मी त्याच सालात या पृथ्वीचा भार वाढवलंय. या पूर्वीच्या पिढीचे सिनेमा बद्दल ‘एक छछोर नाद!’ असे मत होते. असो. (मी महाराष्ट्रातला तेव्हा ‘सिनेमा ‘ म्हणजे ‘हिंदी सिनेमा’ असाच घ्यावा.) […]
“गंधर्व भूषण” जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये “गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. […]
गोव्यात वर्षभर उत्सवी वातावरण असतं. त्यात दरवर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेरसिकांना पर्वणीच. विश्वभरातील हजारो प्रतिनिधी, फिल्ममेकर्स या महोत्सवात सहभागी होतात. त्यानंतर आयोजनाच्या बाबतीत म्हणायचा तर त्याहुनही सरस महोत्सव म्हणजे गोवा मराठी चित्रपट महोत्सव. यंदा हा बारावा महोत्सव असून 28, 29 आणि 30 जून रोजी याचे आयोजन केले असल्याची घोषणा आयोजक संजय शेट्ये यांनी केली आहे. […]