जुन्या काळच्या पौर्वात्य आशियाई आणि पाश्चिमात्य युरोपीय जगाच्या मध्यावर ग्रीस हा देश येतो. या भौगोलिक स्थानामुळेत्याला अनन्यसाधारण व्यापारी महत्त्व होते. ग्रीसने जगात अनेक अनमोल देणग्या दिल्या त्यापैकी एक म्हणजे वास्तुकला. प्राचीन ग्रीक संस्कृतीचा रसायनात रुजून आजची पाश्चिमात्य संस्कृती घडली. […]
महात्मा गांधी आज अनेकांना हवे आहेत, अनेकांना नको आहेत. आऊटडेटेड माणसं व तत्वज्ञान आजच्या परिस्थितीत वापरुन तरुणांना काही संदेश देतांना आजच्या परिस्थितीत relevance, त्याचं दाखवता आलं तरी पुरेसं आहे. महात्मा आज बंदिस्त झाले आहेत. नोटात महात्मा, फोटोत महात्मा, मात्र प्रत्यक्ष जीवनात सगळा खोटाच व्यवहार. […]
प्रसारमाध्यमांतून वास्तूशास्त्रवाले, कोचिंगवाले, भविष्यवाले, संत, महात्म्ये आपले विकार, संस्कार म्हणून बिंबवत आहेत. हीच आजची शोकांतिका आहे. संस्काराच्या टिपकागदाने विकार टिपलेच पाहिजेत, नाही तर रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही. […]
श्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ओळख ‘अपराजित योद्धा अशी आहे. बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. २८ एप्रिल २०१९ ला रोजी बाजीराव पेशवे यांची २७९ वी जयंती साजरी करण्यात आली. […]
भारतासारख्या बलाढय़, खंडप्राय देशाला मूठभर माओवादी आव्हान देतात, हवा तेव्हा हिंसाचार घडवून दहशत निर्माण करतात ही लाजिरवाणी बाब आहे. भारतीय लोकशाहीला माओवाद हा सर्वांत मोठा धोका आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक गाव दहशतीपासून मुक्त व्हावे, असा संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. माओवादाविरुद्धची लढाई ही अशी अनेक आघाड्यांवर आणि दीर्घकाळ लढावी लागणार आहे. […]
आपल्या सर्वाना १९९२ सालातला हर्षद मेहता स्कॅम आठवत असेलच. याच्यानंतर भारतीय भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात बदल झाले. हे सर्व गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी होते. भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी १९८८ साली सेबीची स्थापना झाली आणि ३० जानेवारी १९९२ पासून सेबीला सर्व अधिकार बहाल करण्यात आले. NSDL (ऑगस्ट १९९६) व CDSL (फेब्रुवारी १९९९) या दोन प्रमुख DEPOSITORY अस्तित्वात आल्या आणि शेअर डीमैट स्वरुपात उपलब्ध होऊ लागले. […]
भारतात आर्थिक नियोजनाद्वारे विकास करताना सरकारची भूमिका आवश्यक ठरली. सरकारच्या आर्थिक विकासातील भूमिकेत आजवर भरपूर बदल घडून आज जरी आपण बाजार नियंत्रित अर्थव्यवस्थेकडे आलो असलो तरी देखील शिक्षण, आरोग्य, शेती, कर रचना इ. विषयात सरकारची भूमिका अत्यंत सजग असणे अपेक्षित आहे. आर्थिक समरसता साधण्यासाठी आजवर आपल्या सरकारांनी केलेल्या उपाय योजना आपण थोडक्यात पाहू. […]
भूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक अशी बिरूदे असणारा राजा सोमेश्वर याचा ‘मानसोल्लास’ अर्थात ‘अभिलषितार्थचिन्तामणि’ हा ग्रंथ. (शतक १२ वे). हा ग्रंथ म्हणजे एक ज्ञानकोशच आहे. राजा सोमेश्वर हा चालुक्य कुलातील राजा असून त्याने स्वत: या ग्रंथाला ‘जगदाचार्यपुस्तक’ असे नाव दिली आहे. राजाचा आहार असा या मांडणीचा विषय असला तरी तत्कालीन पाककृतींचा परिचय त्याद्वारे करून देणे असा या लेखाचा प्रमुख उद्देश आहे. आधुनिक काळात पाकशास्त्र विषयाचे प्रशिक्षण महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थाना उपलब्ध आहे. परंतु १२ व्या शतकात सोमेश्वर राजाने सांगितलेले अन्नाविषयीचे तपशील आजच्या काळातही उपयुक्त आहेत. […]
आपण सहज ऐकतो किंवा वाचतो की “आज सेन्सेक्स ३०० अंकानी वाढला”, “आज सेन्सेक्सने नवे शिखर गाठले” “आज सेन्सेक्स कोसळला” “लोकांचे एवढे करोडो रुपये बुडाले” शेअर मार्केटशी संबध नसणार्यांना पण याचा अंदाज येतो की आज शेअर मार्केट मध्ये शेअरचे भाव वाढले किंवा कोसळले आहेत. आपल्या रोजच्या सहज बोलल्या जाणारया “सेन्सेक्स” या शब्दाचा नेमका अर्थ किती लोकांना माहिती आहे ? […]