एका बाजूला भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर तणावाची स्थिती निर्माण होत असताना आपली युद्धसज्जता कायम ठेवणं महत्त्वाचं असतं. अशा स्थितीतून देश जात करताना भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्या अपघातामुळं या घटनेचं गांभीर्य वाढतं. वैमानिकांची व विमानांची सुरक्षा आणि हवाई दलाची युद्धसज्जता हे तिन्ही घटक एकमेकांशी संलग्न आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्या अपघाताचं विश्लेचषण करत असतानाच हवाई दलात सेवा करणाऱ्या सर्वच लढाऊ विमानांच्या अत्याधुनिकीकरणाचाही तितक्याच गांभीर्यानं विचार केला पाहीजे. […]
आजवर जी आरती दूरदर्शनवर कधीतरी पाहिली होती, ती प्रत्यक्षात अनुभवता आली याचा अतिशय आनंद वाटत होता. आता उठून परत फिरण्याच्या विचारात होतो तोच लाटांवर नाचत छोट्या छोट्या प्रकाशज्योती येताना दिसू लागल्या. मोठ्या मजेशीर दिसत होत्या. त्या पाण्यावर कशा तरंगताहेत याचे आश्चर्य जवळ आल्यावर निवले. […]
शेअर मार्केट हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी स्वतः गेली २५ वर्षे शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करीत आहे. मी काही तज्ञ नव्हे तर माझ्या अनुभवातून काही गोष्टी शिकलो त्यामुळेच हा विषय सोप्या मराठी भाषेत मांडण्याचा हा माझा एक प्रयत्न करतोय…….. […]
मुळात पॉप, जॅझ या पाश्चात्य गाण्याला, त्यातही नाईटक्लबमध्ये गाणी म्हणण्याला त्या काळी अजीबातच प्रतिष्ठा नव्हती. उषाजींच्या ‘सादगी’ मुळे या क्षेत्राला भारतात मानाचं स्थान मिळवता आलं. साडी, गजरा, दागीने ही त्यांची वेषभुषा त्यांचं भारतीयत्त्व जपत गेली, आणि पाश्चात्य संगीत सादर करणारी ही तरूणी देखील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर करणा-या कोणत्याही घराण्याच्या गायिकेपेक्षा वेगळी नाही, हे लोकांना लक्षात येऊ लागलं. […]
‘पागडी’ हा शब्द घरासंदर्भात वापरला जातो. मुंबईकरांच्या अतियंत जिव्हाळ्याचा असलेला हा शब्द, हल्लीच्या पुनर्विकास आणि त्यातून मिळणाऱ्या ओनरशिप घरांच्या काळात हळुहळू विस्मृतीत चाललाय. पण एकेकाळी मुंबईत कुठेही घर घ्यायचे असलं, की ते पागडीनेच मिळायचं. आजची वैभवशाली मुंबई घडवलीय, ती अशाच पागडीच्या घरात राहून कष्ट करणाऱ्या मुंबईकरांना. या अर्थाने ‘पागडी’ या शब्दाशिवाय मुंबईचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. […]
प्रिया मराठे… विविध मराठी, हिंदी मालिकांमधून सातत्याने दिसणारा देखणा चेहरा… आकर्षक बांधा… ही प्रियाची वैशिष्टय़ं.. आपला दमदार अभिनय सादर करत ‘या सुखांनो या’ ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ व्हाया ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘साथ निभाना साथिया’ असा मराठी आणि हिंदी छोटय़ा पडद्यावरचा प्रवास गेली दशकभर सातत्याने करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. छोटय़ा पडद्यावरून घराघरांत पोहचलेल्या प्रियाने रुपेरी पडद्यावरही आपल्या […]
अतिदक्षता विभागात संगणकीकृत निरीक्षणे ठेवणे व तेथील रुग्णांच्या अतिमहत्त्वाच्या चाचण्यांवर सतत लक्ष ठेवणे हे आज आपल्या ओळखीचे आहे. परंतु अशा प्रकारचा अतिदक्षता विभाग असावा अशी कल्पना मांडून , त्याचे प्रारूप कर्कलीन यांनी सुचविले व आज जगभरात ते अंमलात येते आहे. या प्रारूपाच्या वापरामुळे रुग्णांची काळजी घेणे सुलभ झाले आहे. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कमी झाली आहे व पर्यायाने कित्येकांना जीवदान मिळाले आहे. […]
भाई गायतोंडे हे नाव संगीत क्षेत्रात संगीत ऋषी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं. याच ऋषितुल्य भाईंची तुला त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या एका वाढदिवसानिमित्त केली होती. भाईंच्या वजनाचे तबले यावेळी भाईंना भेट म्हणून मिळाले होते. हे तबले भाईंच्या घरी एका काचेच्या कपाटात दिमाखात सजले होते. याच तबल्याच्या पार्श्वभूमीवर मी भाईंचा आणखी एक फोटो टिपला. भाईंची सांगीतिक श्रीमंती या फोटोकडे नजर टाकल्याच क्षणी दिसते. मी टिपलेला हा फोटो भाईंनादेखील खूप भावला आणि म्हणून माझ्यासाठी तो विशेष ठरला. पुढे हाच फोटो स्वरदायिनी ट्रस्टच्या दिनदर्शिकेसाठी वापरला गेला होता. […]
आपल्या देशात बहुपक्षीय पद्धतीची संसदीय लोकशाही आहे. गेली ७० वर्ष लोकशाहीचा हा गाडा चाललाय. लोकशाहीत दोन महत्वाचे भाग असतात. एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष. किंबहूना विरोधी पक्षाची भुमिका लोकशाहीत जास्त महत्वाची असते. सत्ता हा विषयच असा आहे की, ती मिळाल्यावर स्खलन होण्याची शक्यता जास्त असते, मग सत्तेवर कुणीही असो. […]