मोरया आता गोसावी झाले. गो म्हणजे इन्द्रिये; त्यावर ताबा मिळवणारे गोस्वामी म्हणजे जितेंद्रिय योगी. त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या. मोरगावला परतल्यावर त्यांचा दबदबा फार वाढला. अष्टौप्रहर लोक त्यांच्याकडे येऊ लागले. रंजल्या, गांजल्यांच्या अडीअडचणी दूर करताना त्यांना दिवसाचे चोवस तास पुरेनासे झाले. शेवटी वैतागून त्यांनी मोरगाव सोडले. […]
घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफि बनवायची!
भजनी मंडळाच्या वेळी मात्र छान दाट, ताजी वेलची , जायफळ पावडर घालून, खास कॅाफी बनवली जायची! मला ती गोड कॅाफी आवडायची, आणि जास्ती ती उकळत असतांनाचा वास आवडायचा!.. इतकंच माझं कॅाफी बद्दल प्रेम आणि ज्ञान !
जेव्हा कॅाफी बाटल्यातून, छोट्या साशा तून मिळायला लागली तेव्हा ब्रू,टाटा,नेस कॅफी अशी त्यांची नांवे कळायला लागली. […]
भारताच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान भारतातच विकसित करून, आपल्या संरक्षण दलांना उपलब्ध करून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य संरक्षण संशोधन आणि विकास संस्था करीत आहे. या संस्थेने विकसित केलेल्या काही आयुधांची आणि तंत्रज्ञानाची झलक आपण पत्रिकेच्या मागील अंकांमध्ये पाहिली आहे. हीच संस्था जीवन विज्ञान क्षेत्रातही मौलिक संशोधन करून, आपल्या जवानांना टोकाच्या विषम आणि प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे बळ देते. याच संशोधनाचा हा थोडक्यात आढावा… […]
लॉक ग्रीफिन.. नावातच वेगळेपण आणि पुस्तकातही. ही एक अतिशय महत्वाकांक्षी कादंबरी आहे. उत्कंठावर्धक आणि चित्तथरारक गोष्टी आवडणाऱ्या पुस्तकप्रेमींसाठी लॉक ग्रीफिन म्हणजे पर्वणीच. […]
परवाच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर २०२३ ला – ” बाॅबी ” – ५० वर्षांची झाली…कोण ही बाॅबी ? – असा प्रश्न आज नवीन पिढीला पडू शकतो कारण आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात लव्ह वगैरे सगळं एक व्यवहाराचा भाग असल्यासारखं वाटू लागले आहे पण आज जे साठीत आहेत त्यांना निश्चितच असला प्रश्न पडणार नाही कारण बरीच वर्षे बाॅबीने भुरळ घातली होती…
बाॅबी हा सिनेमा…. […]
कामगारांबाबत व्ही. व्ही. गिरी यांना कमालीची आस्था होती. कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. कामगारांसंबंधीचे विचार इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर प्रॉब्लेम्स इन इंडियन इंडस्ट्री, जॉब्ज फॉर अवर मिलियन्स वगैरे पुस्तकांद्वारे मांडले. […]
रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे शहाणपणाचे आहे. […]
डॉ. झाकीर हुसेन अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरूही होते. १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. १९६७ मध्ये ते भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले. […]