काही राजकीय पक्ष व नेते दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी रात्री १२ वाजता सुप्रिम कोर्टाचा दरवाजा ठोठतात. आज अनेक सैनिकांविरुद्ध खोटे-नाटे खटले कोर्टात चालू आहेत. पण देशातील राजकीय पक्षांचे हुशार वकील त्यांना मदत करण्यास का पुढे येत नाहीत? सैन्यावर होणार्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी, सैन्याची बदनामी करणारे व्हिडिओ पसरवणार्यांवर कारवाई होण्यासाठी राजकीय पक्ष एकत्र का येत नाहीत? […]
विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं. १६ डिसेंबर १९७२ रोजी पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला. […]
दहशतवादी हल्ला झाला कि केवळ निषेधाच रडगाणं गाणारा भारत असा काही पवित्रा घेईल असे पाकिस्तनाला स्वप्नातही वाटलं नसेल! त्यामुळेच त्याची आता धांदल उडाली आहे. भारताच्या कोणत्याही हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यास पाकी लष्कर सज्ज असल्याच्या वलग्ना पाकचे लष्करप्रमुख करत असले तरी वायुदलाच्या नुसत्या ट्रेलरने पाकची भंबेरी उडाली आहे. […]
भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा दुर्दैवाने या देशाचा पहिला पंतप्रधान “I am Hindu by an accident” असे म्हणणारा निघाला. त्यामुळे तो कधी पाकिस्तानशी लढणार नाही याची देशाला खात्रीच झाली होती. त्याला तर छत्रपती शिवाजी महाराज देखील वाट चुकलेले वाटायचे. या देशात नेहरूंच्या स्वप्नाळू विदेश नीतीचे भोग अजतागायत निरपराध भारतीय नागरिक आणि सैनिक निमूटपणे भोगत आहेत. आणि “पुलवामा अतिरेकी हल्ला” ही त्याचीच परिसीमा ठरली. […]
मुंबईचा फोर्ट परिसर, त्या परिसरातल्या त्या दगडात घडवलेल्या भव्य, देखण्या वास्तूतलं सौंदर्य सुमारे दिडेकशे वर्ष उलटून गेली तरी मनाला मोहवतं. कोणत्याही प्रकारची फारशी देखभाल नसतानाही आपली नजर खिळवून ठेवायचं सामर्थ्य त्या वास्तूंमधे आहे. या परिसरातील एकेका इमारतीची अदब, दबदबा(दहशत नाही) जाणवतो. त्या इमारतींमध्ये जाणीवपूर्व जपलेली सौंदर्यदृष्टी आंधळ्यालाही दिसेल. कोणत्याही इमारतीच्या प्रवेशदारावरची एखादी नजाकतभरी कमान असो वा वरच्या मजल्यावरच्या एखाद्या लहानश्या झरोख्याचं डिझाईन असो, सौंदर्याची जाणीव ठेवलेली आपल्याला लक्षात येते.. […]
…. केजरीवालच्या पाठीराख्यांनो, सत्य कटुच असतें हो ! तरीही या खरें बोलण्यांचा राग आला असला तर माफ करा ; कारण अखेरीस, अरविंद केजरीवालचे अन् माझें alma mater एकच आहे ना ! […]
६६ वर्षापूर्वी ३ डिसेंबर १९५२ रोजी ‘बिनाका गीतमाला’ची सुरुवात रेडीओ सिलोन वरून झाली आणि चित्रपट संगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सयानी त्याचे अविभाज्य घटक आहेत. […]
मधुरिका पाटकर हे नाव गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने समोर आलं ते तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे. तिला शिवछत्रपती पुरस्कारानं (२००८-२००९) सन्मानित केले असून तिचा युथ नॅशनल चॅम्पियनशिप (२००६) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. खेळात वेगळं नाव कमावलेल्या आणि शेकडो पदकांवर यशाची मोहोर उमटवणाऱया मधुरिकाचं प्रोफाइल शूट करण्याची पहिली संधी मला २०१३ साली मिळाली. तिच्या याच पदकांसोबत तिचा एक फोटो टिपायचा मला मोह आवरला नाही. […]
खरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको. […]