नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

राम गणेश गडकरींचा समृद्ध वारसा – जुई गडकरी

आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी. मराठी साहित्य आणि नाटय़सृष्टीत मोलाचं योगदान केलेल्या राम गणेश गडकरींची ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही नाटकं, तर ‘वाग्वैजयंती’ हा काव्यसंग्रह आजही रसिकांवर गारुड घालत आहे. याच गडकरींचा मराठी धागा पुढे कायम राखत आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या […]

संघर्षातून समोपचारकडे !

राममंदिर प्रकरणी सुरु असलेल्या अनेक वर्षाच्या संघर्षाचा समारोप करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सामोपचाराचा मार्ग सुचविला आहे. परस्परांची सहमती असेल तर कोणताही मुद्दा सामोपचाराने मिटवला जाऊ शकतो. समंजसपणे तोडगा काढल्यास सामाजिक सलोखा कायम राखण्यासही मदतच होईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचे स्वागत करावे लागेल. अर्थात, राम मंदिर आणि बाबरी मशीद हा काहींसाठी राजकारणाचा मुद्दा बनेलला आहे. त्याचा असा ‘निकाल’ लागणे त्यांना कितपत रुचेल हा एक प्रश्नच आहे. […]

रेल्वेचा इतिहास

रेल्वेशिवायचं जग ही कल्पनाही आज अशक्य वाटते; पण रेल्वे अस्तित्वात नसण्याचाही एक काळ होता.   आश्चर्याची किंवा गमतीची गोष्ट म्हणजे, तो काळ `रेल्वेमुळे आपल्या सुरळीत, स्वास्थपूर्ण जगण्याचा घात होईल’ अशा भीतीदायक समजुतीचाही होता. […]

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग १

१८५० ते १९३० या कालखंडात  मलेरियाच्या तापाने जगभरात थैमान घातले होते लक्षावधी लोकांचा बळी घेतला होता.  अमेरिका, युरोप पासून ते थेट भारतापर्यंत वैद्यक शास्त्रातील अनेक संशोधकांनी या रोगाचे कारण शोधण्याचा चंगच बांधला होता. संशोधनाच्या क्षेत्रातील  चुरशीच्या चढाओढीत अथक प्रयत्नांती डॉक्टर  रोनाल्ड रॉस हे अग्रेसर ठरले.  […]

रानपाखरं

येत्या काही वर्षात चिमणी सारखा पक्षी जो आपल्या अवतीभवती सतत दिसायचा तो आजकाल माणसानी लावलेल्या नवीन शोधांमूळे दिसेनासा झालाय. यासारखी अनेक पाखरं जी आपल्याला माहीती ही नाहीत. यांच्या जाती नष्ट झाल्या तरी समजलेही नसेल किंवा समजणार ही नाही. मग अशावेळी आपण मानव जातीने यांचे संवर्धन करणे खरचं खूप गरजेचे आहे. नाहीतर निसर्गाचा ड़ोलारा कोलमड़तोच आहे. तो संपायला वेळ ही नाही लागणार . […]

डॉ. नॉर्मन शुमवे

हृदय-प्रत्‍यारोपणाच्‍या इतिहासात डॉ. नॉर्मन शुमवे यांचे नाव सोनेरी अक्षरांत लिहिलेले आहे. त्‍यांनी अमेरिकेतील स्‍टॅनफोर्ड येथील पहिले हृदय-प्रत्‍यारोपण केले. त्‍याआधी बराच काळ ते यावर काम करीत होते. या विषयावर पथदर्शी संशोधन व कार्य करण्‍याचे श्रेय शूमवे यांच्‍याकडे जाते. डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांनी शुमवे यांच्‍याकडे हृदय-प्रत्‍यारोपणाचे प्रशिक्षण घेतले असे म्‍हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. मानवी हृदय-प्रत्‍यारोपणाची […]

लाखात अशी देखणी – सुरेखा पुणेकर

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर… खास लावणीचा शृंगार, नखरे… कॅमेऱयाने टिपलेल्या तिच्या अदा… कारभारी दमानं’, ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘झाल्या तिन्हीसांजा’ अशा अनेक लावण्यांनी अवघ्या महाराष्ट्रावरच नव्हे तर सातासमुद्रापार संपूर्ण जगावरही भुरळ पाडली. महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार म्हणून ओळखली जाणारी लावणी ही केवळ नृत्यकलेतून सादर न करता ती आपल्या अदाकारीने […]

जिद्दी एव्हरेस्टवीर – आनंद बनसोडे

हिमालयातील एव्हरेस्टसह जगातील चार सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणारा आनंद बनसोडे हा सोलापूरचा तरुण महाराष्ट्रातील तमाम युवकांना प्रेरणावत ठरला आहे! त्याची शिखर सर करण्याची जिद्द आणि त्याने त्यासाठी केलेला संघर्ष जाणून घेताना आनंद बनसोडेबद्दल कौतुकच मनी दाटते. […]

पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड

पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड अशी त्‍यांची ओळख निर्माण झाली असली तरी त्‍यापूर्वी देखील त्‍यांनी महत्त्वाचे संशोधन केले होते. डॉ. बर्नार्ड यांनी धाडसीपणे निर्णय घेऊन ही शस्‍त्रक्रिया केली. अशक्‍य वाटणारी गोष्‍ट त्‍यांनी शक्‍यतेच्‍या आवाक्‍यात आणली. या शस्‍त्रक्रियेला जगात उदंड प्रसिद्धी मिळाली व त्‍याचबरोबर डॉ. बर्नार्डही प्रकाशझोतात आले. […]

मोहक मोहिनी – गिरिजा जोशी

अभिनेत्री गिरिजा जोशी तिचा उठावदार बोलका चेहरा, पारंपरिक आणि पाश्चिमात्य या दोन्ही पेहरावांसाठी अनुरूप आहे. ‘गोविंदा’, ‘प्रियतमा’, ‘धमक’, ‘देऊळ बंद’, ‘वाजलंच पाहिजे’ यासारख्या रूपेरी पडद्यावरच्या कलाकृतींमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिकांतून नेहमीच अभिनेत्री म्हणून समोर आलेल्या गिरिजा जोशीने अल्पावधीतच आपला चाहता वर्ग तयार केला. पदार्पणापासूनच तगडय़ा कलाकारांसोबत अभिनय साकारलेल्या गिरिजाने आपला कसदार अभिनय सादर करत अभिनय क्षेत्रावर आपली […]

1 179 180 181 182 183 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..