नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

मधुरम मधुरिका – मधुरिका पाटकर

मधुरिका पाटकर हे नाव गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने समोर आलं ते तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे. तिला शिवछत्रपती पुरस्कारानं (२००८-२००९) सन्मानित केले असून तिचा युथ नॅशनल चॅम्पियनशिप (२००६) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. खेळात वेगळं नाव कमावलेल्या आणि शेकडो पदकांवर यशाची मोहोर उमटवणाऱया मधुरिकाचं प्रोफाइल शूट करण्याची पहिली संधी मला २०१३ साली मिळाली. तिच्या याच पदकांसोबत तिचा एक फोटो टिपायचा मला मोह आवरला नाही. […]

‘अँटी-नॅशनल’ वरुन पत्रकारांच्या आक्रस्ताळेपणाचा कहर..

खरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको. […]

सूर संस्काराचा – डॉ. वरदा गोडबोले

डॉ. वरदा गोडबोले किराणा गायन शैलीतील एक आश्वासक नाव. सुरांच्या वाटेवर तिची वाटचाल सुरू आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याची संस्कारसंपन्न गायकी अंगी बाळगलेल्या गायक आणि गायिकांची यादी फार तगडी आहे. किराणा घराण्याचे उस्ताद करीम खां यांच्या तालमीत के. डी. जावकर, सवाई गंधर्व आणि बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी हे दिग्गज गायक तयार झाले. पुढे सवाई गंधर्व यांच्याकडे […]

झापडं काढा सुनिल, सचिन

सुनील आणि सचिन, सभ्य गृहस्थहो, तुमची झापडं काढा, जागे व्हा, जनप्रक्षोभ ज़रा समजून घ्या , आणि पाकिस्तानशी क्रीडासंबंध तोडायला अनुकूलता दाखवा. नाहींतरी, सरकार, ‘काय करावें’ ती कृती तुम्हांला विचारून थोडीच अमलात आणणार आहे ? तुमच्या चुकीच्या स्टँडबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्हांला नांवें ठेवतच आहेत. तरी , जनक्षोभ तुमच्या विरुद्ध जाण्यांआधी तुमचा स्टँड बदला, लवकर बदला, नाहींतर उशीर झालेला असेल . […]

टीव्हीच्या आठवणी…

चॅनेल्स नव्हती,रिमोट नव्हते त्यामुळे जे काही समोर सुरू आहे, ते भक्तिभावाने पाहत सगळं कुटुंब रंगून जायचं…त्यातल्या त्यात टीव्हीचा आवाज कमीजास्त करणं हीच काय ती हालचाल.. तेव्हाचा रिमोट हा घरातील शेंडेफळ असे.. […]

मराठी टिकवा नव्हे! मराठी टिकवूया !!

“इंग्रजी बोलता येत नसेल तर लाज बाळगण्याचे काहीच कारण नाही” कारण “लाज त्याने बाळगावी ज्याला स्वतःची मातृभाषाच येत नाही.” सतत इतरांना फुकटचे सल्ले देताना जर कुणी म्हणत असेल की, मराठी भाषा टिकवा तर त्यांना माझे  इतकेच सांगणे आहे की, मराठी भाषा टिकवा नव्हे ! तर आपण सर्वांनी मिळून टिकवूया असेच म्हणावे लागेल. […]

डॉ. जॉन हेशॅम गिबन (ज्युनिअर) – ‘हार्ट-लंग’ मशीनचे जनक

‘हार्ट-लंग’ मशीनच्‍या विकासामुळे ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रियेची गरज अधिकांशाने पूर्ण झाली. डॉ. जॉन हेशॅम गिबन (ज्‍युनिअर) यांच्‍याकडे या प्रणालीच्‍या विकासाचे जनकत्‍व जाते. दि. ६ मे १९५३ रोजी डॉ. गिबन यांनी ‘हार्ट-लंग’ मशीनच्‍या सहाय्याने शस्‍त्रक्रिया केली. यशस्‍वीपणे पार पडलेली ही पहिली ‘ओपन हार्ट’ शस्‍त्रक्रिया मानली जाते. […]

मेरा नाम जोकर

मेरा नाम जोकर’ हा राज कपूर यांचा एक ‘क्लासिक’ चित्रपट. ‘ये दुनिया एक सर्कस है’, असं म्हणत राज कपूर यांनी भारतीय प्रेक्षकांना ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटात सर्कस दाखवली. हा भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला चित्रपट होता कि ज्याला दोन मध्यांतर होते. हा चित्रपट एकूण ४ तास ३० मिनिटांचा होता. […]

खडा पारशी.. भाग २

भायखळ्याच्या दोन उड्डाण पुलांच्या बेचक्यात उभा असलेला आणि जाता-येता सहज नजरेला पडणाऱ्या ‘खडा पारशी’ आणि त्यांच्या वंशजांनी मुंबईला आजचं स्वरूप देण्यात फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे. एकूणच पारशी समाजाचं मुंबईवर फार मोठं ऋण आहे. करसेटजिच्या ‘खडा पारशी पुतळ्याकडे लक्ष जाताच हा सर्व इतिहास आपण क्षणभरासाठी आठवावा आणि आपण सर्वानी त्या सर्व महानुभावांचे उपकार स्मरावे यासाठी हा लेखन प्रपंच. […]

1 181 182 183 184 185 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..