मुंबईचा फोर्ट परिसर, त्या परिसरातल्या त्या दगडात घडवलेल्या भव्य, देखण्या वास्तूतलं सौंदर्य सुमारे दिडेकशे वर्ष उलटून गेली तरी मनाला मोहवतं. कोणत्याही प्रकारची फारशी देखभाल नसतानाही आपली नजर खिळवून ठेवायचं सामर्थ्य त्या वास्तूंमधे आहे. या परिसरातील एकेका इमारतीची अदब, दबदबा(दहशत नाही) जाणवतो. त्या इमारतींमध्ये जाणीवपूर्व जपलेली सौंदर्यदृष्टी आंधळ्यालाही दिसेल. कोणत्याही इमारतीच्या प्रवेशदारावरची एखादी नजाकतभरी कमान असो वा वरच्या मजल्यावरच्या एखाद्या लहानश्या झरोख्याचं डिझाईन असो, सौंदर्याची जाणीव ठेवलेली आपल्याला लक्षात येते.. […]
…. केजरीवालच्या पाठीराख्यांनो, सत्य कटुच असतें हो ! तरीही या खरें बोलण्यांचा राग आला असला तर माफ करा ; कारण अखेरीस, अरविंद केजरीवालचे अन् माझें alma mater एकच आहे ना ! […]
६६ वर्षापूर्वी ३ डिसेंबर १९५२ रोजी ‘बिनाका गीतमाला’ची सुरुवात रेडीओ सिलोन वरून झाली आणि चित्रपट संगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सयानी त्याचे अविभाज्य घटक आहेत. […]
मधुरिका पाटकर हे नाव गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने समोर आलं ते तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे. तिला शिवछत्रपती पुरस्कारानं (२००८-२००९) सन्मानित केले असून तिचा युथ नॅशनल चॅम्पियनशिप (२००६) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. खेळात वेगळं नाव कमावलेल्या आणि शेकडो पदकांवर यशाची मोहोर उमटवणाऱया मधुरिकाचं प्रोफाइल शूट करण्याची पहिली संधी मला २०१३ साली मिळाली. तिच्या याच पदकांसोबत तिचा एक फोटो टिपायचा मला मोह आवरला नाही. […]
खरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको. […]
डॉ. वरदा गोडबोले किराणा गायन शैलीतील एक आश्वासक नाव. सुरांच्या वाटेवर तिची वाटचाल सुरू आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याची संस्कारसंपन्न गायकी अंगी बाळगलेल्या गायक आणि गायिकांची यादी फार तगडी आहे. किराणा घराण्याचे उस्ताद करीम खां यांच्या तालमीत के. डी. जावकर, सवाई गंधर्व आणि बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी हे दिग्गज गायक तयार झाले. पुढे सवाई गंधर्व यांच्याकडे […]
चॅनेल्स नव्हती,रिमोट नव्हते त्यामुळे जे काही समोर सुरू आहे, ते भक्तिभावाने पाहत सगळं कुटुंब रंगून जायचं…त्यातल्या त्यात टीव्हीचा आवाज कमीजास्त करणं हीच काय ती हालचाल.. तेव्हाचा रिमोट हा घरातील शेंडेफळ असे.. […]
“इंग्रजी बोलता येत नसेल तर लाज बाळगण्याचे काहीच कारण नाही” कारण “लाज त्याने बाळगावी ज्याला स्वतःची मातृभाषाच येत नाही.” सतत इतरांना फुकटचे सल्ले देताना जर कुणी म्हणत असेल की, मराठी भाषा टिकवा तर त्यांना माझे इतकेच सांगणे आहे की, मराठी भाषा टिकवा नव्हे ! तर आपण सर्वांनी मिळून टिकवूया असेच म्हणावे लागेल. […]