भारतीय रेल्वेने हा बांधलेला अजस्त्र पूल म्हणजे रेल्वे इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारी घटना आहे. आसाम मधील दिब्रुगड ते धेमजी अरुणाचल प्रदेश अशी दोन महत्वाची राज्ये जोडली जाणार आहेत. या पुलामुळे नेहमीचा रेल्वे प्रवास ११० ते १३० किमीने कमी होणार आहे, तर रस्त्याने प्रवासात ४०० ते ५५० किमी अंतराची बचत होणार आहे. […]
पार्लियामेंटरी स्टॅंडिंग कमिटी ने एक महत्त्वाचे सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात त्यांना नोकरीच्या पहिले पाच वर्षे सैन्यात नोकरी करणे अनिवार्य केले जावे. […]
संगणकविज्ञान आत्मसात करून “प्रोग्रॅमिंग’मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या पहिल्या “नेव्हल ऑफिसर’ ठरल्या. संगणकशास्त्र आणि नौदलातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नावाजलेली ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ म्हणजे रिअर ऍडमिरल ग्रेस मरे हॉपर. संगणक प्रोग्रॅमिंगच्या भाषेची पहिली संकलक अशी ग्रेसची ओळख आहे. […]
मराठी सिनेमांच्या संगीतासाठी सध्या आघाडीच्या नावांमध्ये घेतलं जाणार एक नाव म्हणजे चिनार-महेश. चिनार खारकर आणि महेश ओगले या जोडगोळीने संगीतकार म्हणून मराठीतल्या अनेक सिनेमांच्या गाण्यांना संगीत दिलं. या दोघांनी एकत्रच मराठी सिनेइंडस्ट्रीत संगीतकार म्हणून श्रीगणेशा केला तो २००४ साली. […]
‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’असे आपण नेहमी म्हणतो. त्या प्रमाणे प्रत्येक टूरच्या यशामागे टूर लीडरचा सहभाग फार महत्त्वाचा, असे म्हणावेसे वाटते. आपली टूर कशा प्रकारे पार पडली आणि आपण त्यातून किती आनंद मिळवला, हे सर्वस्वी आपल्याला लाभलेल्या टूर लिडरवर खूपसे अवलंबून असते .असे माझे वैयक्तिक मत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण टूर करणार असू , तर […]
यंदाच्या यवतमाळात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत कवयित्री अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे मराठी संमेलनाला लागलेला वादाचा शाप यावेळी पुसला जाणार, असे वाटत असतानाच उद्घाटकांच्या निमंत्रणावरून संमेलनाच्या सहा दिवस आधी निर्माण झालेल्या वादाने सगळ्या उत्साहावर पाणी फिरवले आहे. […]
आल्प्स पर्वतांच्या कुशीमध्ये विसावलेला युरोपचा भाग म्हणजे ,जणू काही प्रत्यक्ष स्वर्गच. प्रत्येक ठिकाणचे आपले असे वेगळे वैशिष्ट्य वेगळेच सौंदर्य.निसर्गाचे एक वेगळेच रूप आपल्या मनावर राज्य करते. माउंट टिटलिसच्या सौंदर्य स्थळांवरुन अजून बाहेरही आलो नव्हतो आम्ही, तर दुसऱ्या दिवशीची रम्य सकाळ आम्हाला,झुंग्फ्रौ येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद देण्यासाठी आसुसलेली होती. […]