शाळेमध्ये असल्यापासून पिसाचा झुलता मनोऱ्या विषयी कमालीचे कुतूहल होते. पाडोवातून निघाल्यानंतर जेंव्हा, आमच्या बस ने आम्हाला पिसाच्या मनोर्याच्या परिसरामध्ये सोडले तेंव्हाचा तो क्षण खरचं खूप अविस्मरणीय ठरला.पुस्तकांमधून वाचलेले चित्र मनावर कोरले गेले होतेच. ते लख्खपणे समोर दिसले.मन आणि काया दोन्हीही मोहरून जायला झाले.आपण प्रत्यक्ष तेथे जाऊन ते बघतोय! हेच मुळी स्वप्नवत होते! पिसा येथे, स्क्वायर अॉफ […]
परमेश्वराच्या ठिकाणी भक्तीभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्व आहे. यामध्ये रामायणाच्या कथानकातच प्रसंगानुरूप रामाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले दिसून येते.ब्रह्मांड पुराणाचा एक भाग असलेल्या अध्यात्म रामायणात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय झालेला दिसून येतो.यालाच अध्यात्मरामचरित किंवा आध्यात्मिक रामसंहिता असेही म्हणतात.या ग्रंथाची ७ कांडे आणि १५ सर्ग आहेत. […]
नखाच्या सहाय्याने कागदावर कमीअधिक दाब देऊन आखीव-रेखीव असं नखशिल्प साकारणारा जादुई कलाकार. गेल्या तब्बल पाच दशकांहून अधिक काळ आपली ही नखशिल्प कला जिवापाड जपणारा सच्चा कलावंत. आपल्या कलेतून अनेक मनं जिंकणारे अन् जोडलेली मनं टिकवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले अरविंद सुळे म्हणजे नखशिल्प कलेतलं दादा नाव. […]
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात तैनात असलेल्या आपल्या फौजा मागे घेण्याची केलेली घोषणा भारताएवढीच त्या क्षेत्रातील अन्य देशांची चिंता वाढविणारी आहे. सध्या त्या क्षेत्रात अमेरिकेचे १४ हजार सैनिक आहेत आणि त्यापैकी निम्मे लोक माघारी बोलाविण्याची ट्रम्प यांची तयारी आहे. […]
दो लब्जो की है, दिल की कहानी, याद है मोहब्बत, याद है जवानी. ये कश्ती वाला, क्या गा रहा था, कोई उसे भी, भी याद आ रहा था. लाला लाललाला लाला लालाऽ लाला… माझ्या वयाच्या साधारण १३,१४ व्या वर्षी अमिताभ व झिनत या जोडीवर चित्रित झालेला हा मुव्ही मी बघितलेला. द ग्रेट गॅम्बलर च्या उपरोक्त गाण्याने […]
साधे -सुधे पोस्त कार्ड , आंतरदेशीय-पत्र आणि पाकिटे ” यातून एकमेकांना ख्याली-खुशाली “कळवली जात असे. घरातील वडीलधार्या व्यक्तींनी पत्रातील मजकूर वाचून सगळं खुशाल आहे बरं का ! असे भरल्या आवाजात सांगितले की ..भरलेले डोळे पदराने कोरडे करून मोठ्या समाधानाने ..घरातली बाई-माणसं पुन्हा कामाला लागत . […]
भारतीय रेल्वेने हा बांधलेला अजस्त्र पूल म्हणजे रेल्वे इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारी घटना आहे. आसाम मधील दिब्रुगड ते धेमजी अरुणाचल प्रदेश अशी दोन महत्वाची राज्ये जोडली जाणार आहेत. या पुलामुळे नेहमीचा रेल्वे प्रवास ११० ते १३० किमीने कमी होणार आहे, तर रस्त्याने प्रवासात ४०० ते ५५० किमी अंतराची बचत होणार आहे. […]
पार्लियामेंटरी स्टॅंडिंग कमिटी ने एक महत्त्वाचे सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात त्यांना नोकरीच्या पहिले पाच वर्षे सैन्यात नोकरी करणे अनिवार्य केले जावे. […]
संगणकविज्ञान आत्मसात करून “प्रोग्रॅमिंग’मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या पहिल्या “नेव्हल ऑफिसर’ ठरल्या. संगणकशास्त्र आणि नौदलातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नावाजलेली ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ म्हणजे रिअर ऍडमिरल ग्रेस मरे हॉपर. संगणक प्रोग्रॅमिंगच्या भाषेची पहिली संकलक अशी ग्रेसची ओळख आहे. […]