रवी जाधव… आजचा आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक… पण त्याच्या जडणघडणीत भक्कम असलेला त्याच्या कलेचा पाया महत्त्वाचा ठरतो… ‘टाइमपास’, ‘बालक पालक’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या मराठी सिनेमांनी केवळ राज्यातच नव्हे तर देश-परदेशातल्या सिनेरसिकांवर आपली भुरळ घालत कोटय़वधी रुपयांचा गल्ला जमवला.आपल्या दिग्दर्शनात सातत्य राखत विक्रमांचे अनेक थर रचून मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून रवीकडे पाहिलं जातं. […]
जगातला सर्वात मोठा देश रशिया व ह्याच रशिया टुरसाठी आपण खरेच काय पाहतो ? रुशिया टूर करायची असल्यास आपण काय पाहतो तर, मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग. ह्या रशियाच्या खऱ्या दोन राजधान्या होत, पण ह्यासाठी आपण किती दिवस देतो तर प्रत्येकी दोन किंवा तीन दिवस ! पाच दिवसाच्या रशिया टूर मध्ये फक्त भुज्याला शिऊन येतो. आणि रशिया पर्यटन म्हणजे केवळ मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग पर्यंतच सीमित नाही. […]
१७ डिसेंबर १९०३ रोजी राइट बंधूंनी पहिले मोटारचलित विमानोड्डाण केले. “विमान” या अफलातून यंत्राची प्रत्यक्ष आपल्या रोजच्या आयुष्याशी सांगड घालण्याचा मोठ्ठा प्रवास त्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर १९०३ ला सुरु झाला होता. […]
साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. २१ डिसेंबर हा आता जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो. […]
सोरटी सोमनाथच्या मंदिराचा रक्तरन्जीत इतिहास आणि आता उभे असलेले मंदीर भारताचे गौरव स्थान आहे. प्रत्येक भारतीयांनी अवश्य भेट द्यावी असे पर्यटन स्थळ आहे. एखादे धार्मिक स्थान हजारो वर्षे अनेक स्वाऱ्यामध्ये नेस्तनाबूत होते, परंतु त्यानंतर प्रत्येक वेळा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहते असे एकमेव स्थान आहे सोरटी सोमनाथ. सौराष्ट्राच्या पश्चिम किनारयावर वेरावळ पासून २० किमी वर वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांमधील प्रथम क्रमांकावर असलेल्या या स्थानाचा इतिहास रक्तरंजित आहे. […]
स्पॅम फोन कॉल अर्थात अनावश्यकपणे येणार्या फोन कॉलची संख्या भारतात एवढी मोठी आहे की भारताचा जगात चक्क दुसरा नंबर लागतो. ही माहिती दिली आहे आपल्याला येणाऱ्या फोनचा नंबर तात्काळ मोबाइल स्क्रीन वर दाखवणाऱ्या ट्रुकॉलर (Truecaller) या ॲपच्या निर्मात्यांनी. […]
आत्तापर्यंत आपण हिंदी महासागरावरच लक्ष केंद्रित करत होतो; पण अमेरिकेने पॅसिफिक महासागरातून आपले अस्तित्व कमी करायला सुरुवात केली, तेव्हापासून हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक महासागर दोन्हींकडे भारताने लक्ष देण्यास सुरुवात केली. हे सर्व महासागर दूर अंतरावर आहेत; मात्र आपल्या दोन्ही बाजूंना असलेल्या अरबी समुद्राचे आणि पूर्व किनार्यावरील अंदमान समुद्राचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. अंदमान समुद्र हा म्यानमार, दक्षिणपूर्व आशिया आणि भारत यामध्ये आहे. यापुढे तो हिंदी महासागराला मिळतो. त्या जवळच मलाक्काची सामुद्रधुनी आहे. […]
स्पृहा जितकी परखड आहे तितकीच मदत करणारीसुद्धा! एका व्यावसायिक शूटच्या वेळी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन स्पृहाला चक्क दहा वेगवेगळे पेहराव करावे लागले होते, ते तिने कोणतीही तक्रार न करता केले. हिंदुस्थानी सणांवर हे शूट बेतलं होतं. वेगवेगळे हिंदुस्थानी सण आणि एकच चेहरा अशी थीम होती. कल्पना सुरेख असली तरीही ती तडीस नेणं हे तसं कठीण होतं. आपल्या चेहऱयावर एकाच दिवशी दहा प्रयोग होणार होते. त्यातून आपली वेगळी प्रतिमा जगासमोर येणार होती. या सर्वांचा अभ्यास करूनच स्पृहाने या शूटला होकार दिला असावा. […]
संपूर्ण किनारपट्टीची फटिविरहित देखरेख पुरवण्यासाठी, तसेच अशोधित जहाजांचा प्रवेश रोखण्यासाठी, भारत सरकारने ’किनारी देखरेख महाजाल प्रकल्प’ (कोस्टल सर्वेयलन्स नेटवर्क प्रोजेक्ट) सुरू केलेला आहे. ह्या महाजालात किनारी रडार साखळी, ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम आणि व्ही.टी.एम.एस. यांचा समावेश होतो. प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात, भारतीय किनारपट्टीवर ४६ स्थिर रडारपैकी मुख्य भूमीवर ३६ आणि द्विपभूमी प्रदेशांवर १० बसवली आहे. […]
टाऊन हॉल ते फाऊंटनचा परिसर हा इथला एक टप्पा. हा “टाऊन हॉल” म्हणजेच सध्या आपण बघतो ती “एशियाटिक लायब्ररी”ची सुंदर इमारत. ही इमारत “दोरिक” या जुन्या ग्रीक शैलीत बांधली असून तीला ३० पायर्या आहेत. […]