नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

सृजनरंग

रंगांनी सजलेल्या नवरात्रोत्सवाचं फोटोशूट करण्याची संधी मला वृत्तपत्रांमुळे अनेकदा मिळाली. हे फोटोशूट म्हणजे एका विशेष रंगांचे पारंपरिक वस्त्र परिधान केलेल्या मराठी सिनेतारकांना घेऊन केलेले फोटोशूट. संकल्पना जरी सहज सोपी वाटत असली तरीही ती प्रत्यक्षात आणण्यात अनेक दिवसांची आणि फोटोमागे काम करणाऱया अनेक कलाकारांच्या कलेची ती मेहनत होती. […]

मानव जातीचा कर्दनकाळ – एक क्षुद्र मच्छर

पृथ्वीतलावरील उडणाऱ्या कीटकात सर्वात जास्त वेळ उडू शकणार्‍या कीटक आहे डास. त्याच्या अंदाजे २७०० जाती व पोटजाती आहेत.माणसांमध्ये मुख्यतः मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग आफ्रिकन पीत ज्वर, चिकन गुनिया व मेंदूचा दाह हे रोग होण्यास ते कारणीभूत असतात. […]

आयटी महासत्ता आणि गुलामगिरी

कोट्यावधींनी संगणक असलेल्या आपल्या देशात अजूनही परदेशी ऑपरेटिंग सिस्टिम, परदेशी वर्ड प्रोसेसर, परदेशी इमेज मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, परदेशी ब्राऊझर्स वापरावे लागतात हे दुर्दैव आहे. नाहीतरी “गुलामगिरी”ची आपल्याला सवयंच आहे !!! ज्या “मायक्रोसॉफ्ट ऑफिस”वर आम्ही रात्रंदिवस काम करतो तसंच एखादं सॉफ्टवेअर बनवण्याची आमच्याकडच्या “जायंटस”ना इच्छा का होत नाही? […]

‘जावा’ने घडवलेली आठवणींची सफर – पूर्वार्ध

कशावरुन कधी काय आठवेल त्याचा नेम नाही. तसंच झालं. ‘लोकसत्ते’त एक बातमी पाहिली. महिन्द्र कंपनी ‘जावा’ मोटरसायकल ‘पुन्हा’ बाजारात आणणार, ही ती बातमी. ही बातमी वाचली आणि मन एकदम मागे गेलं. मोटरसायकल शिकण्यासाठी केलेली धडपड, माझ्या आयुष्यात आलेल्या मित्रांच्याच जावा/येझदी व इतर मोटरसायकल्स-स्कुटर्स, त्यांनी मला दिलेला आणि अजुनही मनात भरून राहिलेला अवर्णणीय आनंद इत्यादींच्या मनातल्या त्या सर्व आठवणी जिवंत झाल्या […]

डिजिटल कचरा

कोणत्याही माध्यमांचा वापर योग्य रित्या झाला तर त्या विषयीची गोडी टिकून राहते.  प्रत्येकाने दिवसभरात आलेल्या संदेशांमधून एखादा चांगला संदेश निवडला आणि तोच फक्त पाठवला तर संदेशांची भाऊगर्दी आपोआप कमी होईल. शिवाय एकच संदेश पाठवायचा असल्याने त्याचे चिंतन आणि मनन होऊन तो पाठवला जाईल. […]

अलबेला अभिनेता – मंगेश देसाई

मंगेश देसाई समंजस, परिपक्व अभिनेता… फोटो काढताना मंगेशच्या व्यक्तिमत्त्वातील समोर न आलेले अनेक पैलू उलगडलेत… मंगेशकडे कोणताही चेहरा ताकदीने प्रेझेंट करण्याची दैवी कला आहे आणि ते तो प्रामाणिकपणे गेली तेवीस-चोवीस वर्षे करतोय. मंगेशचा ‘खेळ मांडला’ ते ‘एक अलबेला’ असा प्रवास याचीच प्रचीती म्हणता येईल. […]

सागरी सुरक्षेच्या इतिहासाचा नियमितपणे अभ्यास जरुरी

२६ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्याने सागरी सुरक्षेची सध्याची अवस्था आणि क्षमता याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. सागरी सुरक्षेचा इतिहास हे अगदी स्पष्टपणे दाखवतो की, आपण केवळ संकटकाळात जागे होतो. सगळ्यांनीच इतिहासाचा नियमितपणे अभ्यास करावा ज्यामुळे दुर्देवी इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही. […]

सागरमालामुळे वाढती महासागरी वाहतुक आणि सागरी सुरक्षा

इकॉनॉमिक इंजिन’ म्हणून सागरी किनारपट्टीचा वापर होतोय. भारताला लाभलेल्या किनारपट्टीवरील बंदरांचे आधुनिकीकरण (मॉडर्नायझेशन ऑफ पोर्टस) करून तेथे ‘इंडस्ट्रीअल क्‍लस्टर्स’ सागरमाला प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहेत. ग्लोबल शिपिंगच्या दृष्टीने बंदरांच्या विकासाद्वारे एक कोटी रोजगार उपलब्ध होणार आहेत. जलवाहतुकीद्वारे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात दोन ते तीन टक्‍क्‍यांनी वाढ होईल.रेल्वेने वाहतुकीचा खर्च सव्वा रुपया, रस्त्याद्वारे एक रुपया, तर जलवाहतुकीद्वारे पंचवीस पैसे एवढा फरक आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही जलवाहतूक उपयुक्त आहे. […]

शिक्षणाच्या बाजारीकरणावर शिक्कामोर्तब ?

शिक्षण क्षेत्रात खासगीकरणाचा शिरकाव झाल्यानंतर काही मोजक्या शिक्षण संस्थांनी व्रतस्थाप्रमाणे विद्यादानाचे पावित्र्य सांभाळले. मात्र बहुतांश शिक्षण संस्था म्हणजे पदव्या मिळवून देणाऱ्या ‘फॅक्टऱ्या’ बनल्या. के.जी. ते पी.जी. चे रेट फिक्‍स करून एकादं प्रोडक्ट विकावं तसं त्यांनी शिक्षण विकायला सुरवात केली. याचे दुष्परिणाम म्हणजे, पाण्यासारखा पैसा ओतून पदव्या मिळवाव्या लागत असल्याने पदवी घेऊन फक्त पैसे कमविण्याचाच विचार बहुतांश विद्यार्थी करतात. त्यामुळे, शाळा म्हणजे ज्ञानाचे भांडार असलेले मंदिर असते. विद्या हे दान आहे, ती काही विकण्यासाठी ठेवलेली वस्तू नाही, असा युक्तिवाद केला जात असला तरी, शिक्षणाचा बाजार भरवला गेलाय, हे वास्तव आहे. […]

लोकमानस बदलणारी प्रसारमाध्यमे 

आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून लोक फसत असतील तर त्यांचा गांभीर्याने विचार माध्यमांनी करावा? सेलच्या जाहिराती, नियुक्तीसाठी जाहिराती, फसवणूक जोपासणार असतील तर आदर्शांचे अग्रलेख कशासाठी? दिशाभूल करणार्‍या गोष्टी भूल देवून केल्या जात आहे. एकीकडे वैधानिक इशारा द्यायचा आणि दुसरीकडे मृत्यू स्वस्त करायचा असे किती दिवस चालणार? […]

1 190 191 192 193 194 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..