हिरव्यागार डोंगररांगा आणि लांबच लांब खाडी किनार यांच्या बेचकीत वसलेलं ठाणे शहर. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ठाणे जिल्ह्यात वन्यजीव संपदा अमाप अशीच पाहायला मिळते. शेकडो फुलपाखरं, पक्षी, कीटक, प्राणी, वनस्पती,फुलं, सरपटणारे प्राणी अशी निसर्गाची नाना रूपाचंदर्शनच आपल्याला या ठाण्यात होतं. कॅमेराबद्ध केलेल्यानिसर्गाच्या याच वेगळ्या छटा,त्यांची शास्त्रीय माहिती आणि हे फोटो टिपण्यासाठी वापरलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान या सगळ्याचा मागोवा […]
ह्या माणसाने आपल्या “अभिनेता” असल्याच्या स्टेटस चा बाऊ केला नाही. त्याने मला सुरवातीला फोन केला तेव्हा मी फिल्म अभिनेता “देवेन वर्मा” असे सांगितले नाही. माझ्यासाठी दोन दिवस थांबला.त्याच्या घरी गेल्यावर आक्रस्ताळेपणा नाही, आपण गाडीचे काम करून द्या ही आपली अपेक्षा मोकळेपणाने सांगितली. त्याशिवाय व्यवस्थित पाहुणचार आणि गप्पा. निरोप घेताना, निघताना ” फिर वापस कभी भी आना भाई” म्हणून निरोप दिला. […]
विजू माने हे मराठी सिनेइंडस्ट्रीतलं जुनं-जाणतं नाव. एक अभ्यासू दिग्दर्शक म्हणून विजूची ओळख आहे. माझी आणि विजूची ओळख साधारणपणे बारा-पंधरा वर्षांपूर्वीची. विजूचा तेव्हा ‘डॉटर’ नावाचा सिनेमा येऊ घातला होता. एकदा वृत्तसंकलनाच्या निमित्ताने ही ओळख झाली आणि दिवसागणिक ती गुणोत्तराने वाढतच गेली. […]
विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी अमृतसर येथे झालेल्या मोठ्या रेल्वेअपघातांमध्ये रेल्वेचे जबाबदारी होती का? इंजिन ड्रायव्हरचा दोष होता का? रेल्वेने आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला का? असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले. याच संदर्भात रेल्वेचे इंजिन ड्रायव्हर कसा परिस्थितीत काम करतात, त्यांच्या कामाचे स्वरुप काय असतं, याचं फार सुंदर विवेचन या लेखात केलेलं आहे. दोन ते तीन हजार प्रवाशांच्या सुखकर प्रवासाच्या नाड्या इंजिनातील दोन कर्तबगार माणसांच्या हातात असतात याची जाणीव प्रवासात एकदा जरी आली तर तो त्यांच्या सचोटीच्या कामाला मानाचा मुजरा ठरेल. […]
जगात अशा तर्हेची दुर्घटना घडल्याचे ऐकिवात नाही. चारशे ते पाचशे जनसमुदाय बेभान होऊन रेल्वे रुळांवर उभा असतो, मोबाईल ने फोटो काढत असतो. मी कोणालाही दोन्ही रुळांवरून येणाऱ्या गाड्यांचे भान नाही. थिजवून टाकणारी घटना, जबाबदार कोण? रेल्वे तर नक्कीच नाही. […]
खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल. […]
आज स्मिता जीवंत असती तर आम्ही तिच्या ६३ व्या जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या असत्या…. मेंदूत स्मृती नावाची गोष्ट शाबूत असे पर्यंत तरी स्मिता तुला नाही विसरू शकत आम्ही….कधीच नाही…….मन:पूर्वक अभिवादन […]
आपल्या भारतावर दिडशे वर्षे राज्य केलेले, भारतासारख्या दुभत्या गाईच्या दुधाची संपूर्ण मलयी आपल्या देशात घेऊन जाणारे हे इंग्रज. त्यांचा देश आहे तरी कसा? याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. […]
नुकताच मी इंदूर, उज्जैन भागात जाऊन आलो. तसा मध्यप्रदेश हा सपाटीचा प्रदेश आणि ‘मंद’प्रदेशही. सर्वसाधारण लोक, बिलकुल बढिया, हो जायेगा, देखा जायेगा, उससे क्या फर्क पडता है, इतनी क्या जल्दी है, वगैरे ‘निवांत’ मानसिकतेचे. महाराष्ट्रासारखे तिथे सह्याद्री सातपुड्या सारखे डोंगर पर्वत, हिरवाई, चढउतार, नागमोडी वळणे, वगैरे फार कमीच. अनेक किलोमीटर पर्यंत कंटाळा येईल असे सरळसोट रस्ते. […]
नूतन विद्या संकुल प्रत्यक्षात साकार करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखे मोठे कठीण काम आहे. संस्थेचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि हितचिंतक यांच्या एकत्रित प्रयत्नाने हा मेरू पर्वत उचलला जाईल असा संस्थेचा विश्वास आहे. अस्त पावलेल्या जुन्या इमारतीतील विटांनी नवी वास्तु उदयास येणार आहे. या विटांच्या रूपाने, विमलाबाई कर्वे यांनी रुजविलेले आणि जोपासलेले, जुन्या वास्तूतील संस्कार, मूल्य आणि उच्चतम गुणवत्ता हि जीवन सूत्रे नव्या वास्तुच्या गर्भात पुनर्जीवित होणार आहेत. त्यातूनच, मराठी शाळेची कळी नव्याने उमलणार आहे. ‘नवकांती पालवली विद्याभवनी’ असेच वर्णन सरस्वती विद्या संकुलाचे होईल याची मला खात्री आहे. […]