इ. ११वी, १२वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, भूगोल, कृषीविज्ञान आणि तंत्रज्ञान (phy, che, bio, maths, geography, agricultural science and technology) या प्रमुख विषयांसह सुमारे ६५ विषय इंग्रजीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही, त्यांची इच्छा असेल तर या विषयांची १२ वीची परीक्षा मराठीतून देण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केली आहे. […]
देशभक्ती म्हणजे नेमके काय? स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून रोज सकाळी प्रार्थना, मग तास सुरु होत असत, शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम असायचे यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या, यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत. […]
या मशीनवर उभं राहून त्यात नाणं टाकलं की एक चक्र फिरायचं.. ते फिरताना डिस्को लाईटस लागायचे आणि चक्र थाबलं की एक टिकिट बाहेर यायचं. या तिकिटावर तुमचं वजन छापलेलं असायचं, सोबत तुमचं भविष्यही असायचं आणि शिवाय एखाद्या फिल्मस्टारचा फोटोपण असायचा. […]
लालबाग च्या आसपासचा हा परिसर ह्या परिसरात असलेल्या कापडांच्या गिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होता. तीन शिफ्ट मध्ये जाणाऱ्या कामगारांचा लोंढा हा परिसर रात्रंदिवस जिवंत ठेवीत असे. गिरण्यांच्या भोंग्यावरून टाईम लावला जात असे. फूट-पाथ प्रशस्त होते आणि तरीही भरलेले असत. त्यावर फेरीवाले, भाजीवाले असायचे, कामगार वर्ग आपल्या छोट्या मीटिंगी येथेच करत. दुकानांमधून गर्दी डोकावत असे. रात्री २ ते सकाळी पाच एवढा वेळ हा परिसर त्यातल्या त्यात शांत असे. गिरण्यांचा संप झाल्यावर आणि पुढे गिरण्या बंद होऊन इथला कामगार वर्ग देशोधडीला लागल्यानंतर ह्या गिरणगावाची रया गेली ती पुन्हा आलीच नाही. […]
माणूस किती असंवेदनशील बनत चाललेला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या आपण इतके आहारी गेलो आहे की, आपल्यालातील एकमेकांप्रती असलेला जिव्हाळा, प्रेम,माया, ममता आणि आपुलकीची भावना नष्ट होत चालली आहे. आपण तंत्रज्ञानाच्या युगात इतके व्यवहारी होत चाललो आहोत की, आपल्याला रक्ताची नातीही कळेनाशी झालेली आहेत. कुणीही जगल्या – मेल्याचं सोयर- सुतक कुणालाही राहील नाही. […]
कोकणाच्या प्रवासाचे हे असे टप्पे – जलमार्ग, खुष्कीचा मार्ग (रस्ते), रेल्वे मार्ग आम्ही पाहिले आणू अनुभवले. पण विमानतळ तयार होऊन येथे हवाई वाहतूक सुरु होईल असे वाटले न्हवते. अजून वाशी – नवी मुंबई येथे विमानतळ व्हायचा आहे, त्यापुढे कोकणाला विमान उड्डाणाला प्रायोरिटी असेल असे वाटले न्हवते. […]
आज मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त विलीन होऊन 70 वर्षे लोटली . निजामाच्या जुलमी राजवटीपासून सुटका मिळविण्यासाठी येथील सर्व जाती-धर्मियांनी मोठ्या संख्येने घरादारावर तुळशीपत्र ठेऊन हा लढा यशस्वी केला . भारत सरकारच्या पोलीस ऍक्शनने मराठवाडा स्वातंत्र्य भारताचा हिस्सा बनला खरा, येथील प्रश्न सुटताना दिसत नाहीत. ऐतिहासिक, संप्रदायिक, साहित्य तसेच श्रमसंपदेने संपन्न असलेला मराठवाडा आजही कृषी, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रात खूप पाठीमागे असल्याचे दिसते. […]
श्री सुभाष नाईक यांनी अथर्वशीर्षाचें ‘सम-लय मराठी भाषांतर’ व सरल मराठी पद्यरूपांतर’ असें दोन प्रकारें अनुवाद केले आहेत. म्हणजे, ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचें वाचन/पठण करणें आवडेल, ती व्यक्ती त्या पद्धतीचें भाषांतर वापरूं शकेल. […]
प्रत्येक मराठी मनात ‘माळव्या’ बद्दल एक वेगळीच जवळीक आणि हळवं आकर्षण आहे. इंदूर … धार … देवास … मांडू .. जीवनदात्री…गूढरम्य नर्मदा …. ही आकर्षणं तर मराठी मनात खूप आहेतंच पण अजून मोठं आकर्षण म्हणजे नर्मदेच्या तीरावरचं महेश्वर आणि अहिल्याबाई होळकर. […]
मलेरियाचे अस्तित्व पृथ्वीतलावर हजारो वर्षांपासून असल्याचा ऐतिहासिक नोंदी अनेक ग्रंथातून आढळल्या आहेत. आज एकविसाव्या शतकात निदान भारताचा विचार करताना कोणत्याही रुग्णास आलेल्या तापाचे रोगनिदान करताना मलेरिया हा रोग प्रथम विचारात घेतला जातो. […]