एका क्षेत्रावर आपली पकड मिळवलेली असतानाच वेगळ्या कलाक्षेत्रात आपली ओळख निर्माण करू पाहणं हे एका कलाकारासाठी तसं आव्हानात्मकच असतं. उदय सबनीसांनी मात्र हा धोका पत्करला आणि यशस्वी दुहेरी ओळख निर्माण केली. अभिनय क्षेत्रावर आपली चांगलीच पकड मिळवलेली असतानाच म्हटलं तर संबंधित आणि म्हटलं तर तशा स्वतंत्र अशा आवाजाच्या जादुई दुनियेवरही आपली छाप उमटवण्यात उदयला चांगलंच यश मिळालं आहे. […]
कोकणचा निसर्ग रसिक पर्यटकाना सतत बोलावत असतो. त्यातही ज्याला रेल्वे प्रवास प्रिय त्यांच्यासाठी तर पर्वणीच. विशेषतः खवय्यांना तर मांडवी एक्सप्रेस चांगले २०-२५ पदार्थ पेश करते. हिरवा गार निसर्ग,लाल मातीचे डोंगर, घाट मार्गात अनेक बोगदे. रत्नागिरी स्टेशन आखीव नीटस मनात भरणारे. स्टेशन बाहेर रेल्वे बांधणीत मृत्यू पावलेल्या कर्मचारी वर्गाच्या स्मृतिस्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. […]
महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातील जाती शोधून त्यांना एकमेकांविरुद्ध झुंजविण्याचे राजकारण सुरु आहे. अशा वेळी दुसऱ्या जातीबद्दल काही चांगले लिहिण्याचे मी धाडस करतो आहे. ही जात म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ! म्हणजेच सीकेपी समाज !! […]
डिसिल्व्हा अंकल… छायाचित्रणाची आवड… आयकर विभागातील सुरक्षित नोकरीत स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याच्या निर्णयातून खऱया अर्थाने त्यांची छायाचित्रकारिता फुलली… […]
चित्रपटाचे तंत्र आणि कथा जसजशा बदलत गेल्या तसतसे सांस्कृतिक संदर्भही वेगळ्या प्रकारे सादर होऊ लागले. चित्रपटातील दिवाळी गाणी नवनवीन साज लेवून येतच राहिली. होम डिलेव्हरी, आमदानी अठ्ठनी खर्चा रूपया, तारे जमीन पर, मोहबबते, कभी खुशी कभी गम वगैरे चित्रपटातुन दिवाळीची गाणी अधिक भरजरी व लखलखीत रूपात अवतरली. दिवाळी गाण्याचं हे भव्यदिव्य रूप मात्र स्वप्नां सारखं वाटू लागलं….लेड इलेक्ट्रीक दिव्यांच्या चकचकीत रोषणाईत पणत्यांचा उजेड हरवला. दिव्याने दिवा पेटवणाऱ्या संस्कृतीतलं तेवणारं मन आता मात्र शोधताना अडचण येत आहे. […]
राजकीय पक्षांकडून ‘राम’ नामाचा जप सुरु झाला कि निवडणूक आली, हे आता लोकांना माहीत झालेले आहे. श्रीरामाचे नाव घेऊन देशातील बहुसंख्य हिंदूं मतांचे भावनात्मक ध्रुवीकरण करता येते, याची जाण राजकारण्यांना असल्याने प्रत्येक निवडणुकीत ‘राममंदीर’ हा काही राजकीय पक्षांच्या ठेवणीतील मुद्दा राहिला. निवडणुका आल्या कि ‘बनायेंगे मंदिर’ चा नारा द्यायचा. आणि निवडणुका झाल्या कि तांत्रिक मुद्द्यांचा कीस पाडून त्याला बगल द्यायची. हे राजकारण अनेक वर्षांपासून देशात केल्या जातेय. […]
गेल्या सहा दशकापासून कानडी झेटिंगशाहीचा सामना करणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या अस्मिता दुखावण्याचा खेळ अजूनही सुरूच असून कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी भाषिक तरुणांची डोकी फोडून आता तर कहरच केला आहे. १ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापनेचा दिन सीमा भागातली मराठी जनता काळा दिन म्हणून पाळते. महाराष्ट्रद्वेषाने पछाडलेल्या कानडी सरकारने कार्यकर्त्यावर लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले आणि कर्नाटक पोलिसांनी शेकडो मराठी भाषकांची डोकी फोडली. याला महाराष्ट्रद्वेषाचा कळस म्हटला पाहिजे. […]
पूर्वा गोखले. शांत,गोड चेहरा, चेहऱयातील सात्त्विकता, टवटवीतपणा हे तिचे खास वैशिष्टय़. इतिहासाची वेगळी साक्ष देणाऱया ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत सईबाईची चोख भूमिका साकारणारी, तर ‘कुलवधू’ मालिकेतून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवलेली अन् ‘रिमझिम’, ‘थरार’, ‘भाग्यविधाता’ या मराठी, तर ‘कोई दिल में है’, ‘कहानी घर घर की’ या हिंदी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला आणि ‘स्माईल प्लीज’ या […]
मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा– वाळकेश्वर. वाळकेश्वर ज्या टेकडीवर आहे, ती मलबार हिल भौगोलिक दृष्ट्या मुंबईतली सर्वात उंच टेकडी. या टेकडीच्या उंची सारखीच उंची ऐहिक आयुष्यात गाठलेली इथली माणसं. वाळकेश्वराची वस्तीच गर्भश्रीमंतांची. तसंच हा मुंबंईचा राजनिवासांचा विभाग. वाळकेश्वर म्हटलं, की आठवतं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडामोडीचं केंद्रस्थान असलेलं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘वर्षा’, देश-विदेशातील पाहुण्यांसाठी असलेलं ‘सह्याद्री गेस्ट हाऊस’, अनेक मंत्री, […]
मराठी सिनेइंडस्ट्रीत नाव कमावण्यासाठी एक संधीही पुरेशी ठरते, हे अनेक कलाकारांनी याआधीच सिद्ध करून दाखवलंय. उत्तम कलाकृती कलाकाराचं अख्ख आयुष्य बदलायला कधीकधी पुरेशी ठरते आणि हेच मोनालिसा बागल या अभिनेत्रीबद्दल काहीसं सांगता येईल. […]