जगात अशा तर्हेची दुर्घटना घडल्याचे ऐकिवात नाही. चारशे ते पाचशे जनसमुदाय बेभान होऊन रेल्वे रुळांवर उभा असतो, मोबाईल ने फोटो काढत असतो. मी कोणालाही दोन्ही रुळांवरून येणाऱ्या गाड्यांचे भान नाही. थिजवून टाकणारी घटना, जबाबदार कोण? रेल्वे तर नक्कीच नाही. […]
खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल. […]
आज स्मिता जीवंत असती तर आम्ही तिच्या ६३ व्या जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या असत्या…. मेंदूत स्मृती नावाची गोष्ट शाबूत असे पर्यंत तरी स्मिता तुला नाही विसरू शकत आम्ही….कधीच नाही…….मन:पूर्वक अभिवादन […]
आपल्या भारतावर दिडशे वर्षे राज्य केलेले, भारतासारख्या दुभत्या गाईच्या दुधाची संपूर्ण मलयी आपल्या देशात घेऊन जाणारे हे इंग्रज. त्यांचा देश आहे तरी कसा? याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. […]
नुकताच मी इंदूर, उज्जैन भागात जाऊन आलो. तसा मध्यप्रदेश हा सपाटीचा प्रदेश आणि ‘मंद’प्रदेशही. सर्वसाधारण लोक, बिलकुल बढिया, हो जायेगा, देखा जायेगा, उससे क्या फर्क पडता है, इतनी क्या जल्दी है, वगैरे ‘निवांत’ मानसिकतेचे. महाराष्ट्रासारखे तिथे सह्याद्री सातपुड्या सारखे डोंगर पर्वत, हिरवाई, चढउतार, नागमोडी वळणे, वगैरे फार कमीच. अनेक किलोमीटर पर्यंत कंटाळा येईल असे सरळसोट रस्ते. […]
नूतन विद्या संकुल प्रत्यक्षात साकार करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखे मोठे कठीण काम आहे. संस्थेचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि हितचिंतक यांच्या एकत्रित प्रयत्नाने हा मेरू पर्वत उचलला जाईल असा संस्थेचा विश्वास आहे. अस्त पावलेल्या जुन्या इमारतीतील विटांनी नवी वास्तु उदयास येणार आहे. या विटांच्या रूपाने, विमलाबाई कर्वे यांनी रुजविलेले आणि जोपासलेले, जुन्या वास्तूतील संस्कार, मूल्य आणि उच्चतम गुणवत्ता हि जीवन सूत्रे नव्या वास्तुच्या गर्भात पुनर्जीवित होणार आहेत. त्यातूनच, मराठी शाळेची कळी नव्याने उमलणार आहे. ‘नवकांती पालवली विद्याभवनी’ असेच वर्णन सरस्वती विद्या संकुलाचे होईल याची मला खात्री आहे. […]
इ. ११वी, १२वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, भूगोल, कृषीविज्ञान आणि तंत्रज्ञान (phy, che, bio, maths, geography, agricultural science and technology) या प्रमुख विषयांसह सुमारे ६५ विषय इंग्रजीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही, त्यांची इच्छा असेल तर या विषयांची १२ वीची परीक्षा मराठीतून देण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केली आहे. […]
देशभक्ती म्हणजे नेमके काय? स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून रोज सकाळी प्रार्थना, मग तास सुरु होत असत, शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम असायचे यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या, यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत. […]
या मशीनवर उभं राहून त्यात नाणं टाकलं की एक चक्र फिरायचं.. ते फिरताना डिस्को लाईटस लागायचे आणि चक्र थाबलं की एक टिकिट बाहेर यायचं. या तिकिटावर तुमचं वजन छापलेलं असायचं, सोबत तुमचं भविष्यही असायचं आणि शिवाय एखाद्या फिल्मस्टारचा फोटोपण असायचा. […]
लालबाग च्या आसपासचा हा परिसर ह्या परिसरात असलेल्या कापडांच्या गिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होता. तीन शिफ्ट मध्ये जाणाऱ्या कामगारांचा लोंढा हा परिसर रात्रंदिवस जिवंत ठेवीत असे. गिरण्यांच्या भोंग्यावरून टाईम लावला जात असे. फूट-पाथ प्रशस्त होते आणि तरीही भरलेले असत. त्यावर फेरीवाले, भाजीवाले असायचे, कामगार वर्ग आपल्या छोट्या मीटिंगी येथेच करत. दुकानांमधून गर्दी डोकावत असे. रात्री २ ते सकाळी पाच एवढा वेळ हा परिसर त्यातल्या त्यात शांत असे. गिरण्यांचा संप झाल्यावर आणि पुढे गिरण्या बंद होऊन इथला कामगार वर्ग देशोधडीला लागल्यानंतर ह्या गिरणगावाची रया गेली ती पुन्हा आलीच नाही. […]