गेल्या दोनचार दिवसांत बातमी वाचली की, रुपयाचा फॉरेन एक्सचेंज रेट, ७१.९९ म्हणजे , जवळजवळ ७२ झाला आहे . म्हणजेच, एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला ७२ रुपये मिळतात . किंवा असंही म्हणतां येईल की एक डॉलर हवा असेल तर आपल्याला ७२ रुपये खर्च करावे लागतात. (Wow ! आपल्या सगळ्यांनाच अगदी धन्य धन्य वाटायला हवं ! ) […]
श्री. रामचंद्र शिवाजी कदम हे भारदस्त आणि भारतीय समाजाच्या संस्कारांचे पुतळे समजल्या जाणाऱ्या थोरांचं नांव आपल्या नांवात गुंफलेल्या महाशयांना आपण सांप्रत राम कदम या नांवाने ओळखतो. ‘नांवात काय आहे’ असं शेक्सपियर म्हणाला होता, याची या क्षणाला आठवण होते. प्रभु रामचंद्र हे स्वत:चं नांव आणि वडिलांचं नांव छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करुन देणारं, याचं भान राम कदमांनी सोडलं व नांव काहीही असलं तरी त्यांची मूळ प्रवृत्ती रावण आणि मोगलांचीच आहे, याची त्यांनी पुन्हा एकदा प्रचिती दिली. […]
येत्या २०१८ – २०१९ मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय पोलिस दलाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे शक्य नाही. […]
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असे श्र्लोक म्हणत घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची आपली भारतीय संस्कृती कधी काळी होती असे म्हणण्याची आता वेळ आलेली आहे असे म्हणले तर फारसे वावगे होणार नाही. पण या पार्सल संस्कृतीला नावे ठेवण्यापेक्षा ती आता बहुतेक शहरात एक आवश्यक बाब बनली आहे हे तितकेच खरे आहे. व आपण सर्वांनीच ती […]
२० ऑगस्ट २०१८ च्या ‘लोकसत्ता ( पुणें आवृत्ती)मधील बातमीद्वारें सई परांजपे यांचें भाषेबद्दलचें मत वाचलें ; तसेंच २१ऑगस्टच्या लोकसत्तातील ‘लोकमानस’मध्ये या विषयावरील विनित मासावकर व श्रीनिवास जोशी यांची मतेंही वाचनांत आली. ( एक स्पष्टीकरण : सई परांजपे यांची चर्चात्मक मुलाखात मी प्रत्यक्ष पाहिलेली-ऐकलेली नाहीं. त्याबद्दल ‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या बातमीचाच संदर्भ मी येथें देऊं शकतो). सई परांजपे यांच्याबद्दल […]
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि एकूण देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. […]
काही माणसं उपजतच कलेचं लेणं घेऊन आलेली असतात. ती इतकी मोठी असतात पण तरीही प्रसिद्धिपराङमुख असतात. `राष्टपतीपदक’ विजेते.. चित्रकार प्राध्यापक गजानन शेपाळ हे अशांपैकीच एक. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र म्हणजे प्रा. शेपाळ यांचीच देणगी…. याच चित्रासाठी त्यांना राष्टपतीपदकाने गौरवण्यात आले. […]