उन्मादाच्या नशेत झिंगून आपल्या विकृतीचे भयंकर प्रदर्शन करताना , मांडलेले थैमान सर्वांना भयकंपित करणारे होते . विच्छिन्न झालेले ते शिल्प पाहताना यातनांनी तडफडणाऱ्या आपल्या आत्म्याला किती भयंकर क्लेश झाले असतील याची कल्पना सुध्दा करता येत नाही . […]
समर्थ रामदास स्वामी हे खरे तर भगवान श्रीरामाचे उपासक आणि परमभक्त. असे सांगतात की, समर्थ रामदास स्वामी हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गणेशस्थानी गेले असता गणपतीच्या दर्शनानंतर त्यांनी ही आरती लिहिली. […]
शंखाचे अनेक प्रकार आहेत. पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. शंख निर्मिती ही शंखचूर्णांच्या हाडांपासून होते असं मानलं जातं. तर त्यांची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही मानलं जातं. हेच कारण आहे की, देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. शंख हे समुद्र मंथनातून प्राप्त झालेले पाचवे रत्न आहे. […]
कवडी (संस्कृत: कपर्दिका; इंग्रजी: Cowry) हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळांमधे याचा वापर डाव टाकण्यास करण्यात येत असे. साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गाई, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवडयांचा वापर करण्यात येतो. जुन्या काळी कवडीचा उपयोग नाणे म्हणून करीत […]
आपल्याला शिवाजी महाराज हे कर्तव्यदक्ष, मुत्सद्दी,प्रजेची काळजी वाहणारे म्हणून माहिती आहेत .पण ज्या इंग्रजांनी पुढे आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या इंग्रजांना मूर्ख बनवले होते हे आपल्याला ठाऊक नसते. […]
सपुष्प वनस्पतींच्या मध्ये फुलांचे वेगवेगळे आकार, प्रकार, रंग, वास, अधिवास असतात. अगदी टाचणीच्या टोका पासून १-२ मीटर व्यास असणारी रेफ्लेशिया सारखी फुले बघायला मिळतात. त्यामध्ये ऑर्किडच्या फुलांची रंगविविधता, फुलांची आकर्षक रचना, मन मोहित करते. ऑर्किड फुलांची सौंदर्य, जटिलता आणि अविश्वसनीय विविधता वनस्पती जगात अतुलनीय आहे. या विदेशी सुंदरतेमध्ये पृथ्वीवरील फुलांच्या रोपांच्या सर्वात मोठ्या कुटूंबाचा समावेश आहे, […]
हा शब्द तुम्ही स्वतः अनेक वेळा उच्चारला असाल आणि असंख्य वेळा इतरेजनांकडून ऐकलेला असाल . कुणी तो OK असा वापरतात तर कुणी Okay असा . या शब्दाला मुद्रित अवस्थेत अवतीर्ण होण्यास आज १७५ वर्षे उलटली आहेत अमेरिकेत प्रकाशित होणाऱ्या ‘ द बोस्टन मॉर्निंग पोस्ट ‘ या दैनिकात OK हा शब्द सर्वप्रथम प्रसिद्ध झाला . […]
आज एक चविष्ट विषयाला हात घातलाय. आता याचं काही विशेष वाटत नाही म्हणा, पण माझ्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मध्ये उपहारगृहात जाणं तसं विशेषच होतं. एक तर जेवायला, म्हणजे आजच्या भाषेत lunch अथवा dinner घ्यायला सर्वसामान्य घरातलं कुणी जात नव्हतं. महिन्या दोन महिन्यातून एकदा जाणं व्हायचं, ते ही अल्पोपहारासाठी. मला मात्र आमचे तात्या अधून मधून घेऊन जायचे उपहारगृहात. दादरमध्ये माझ्या आवडीची दोन उपहारगृह होती. त्यातलं एक उडीपी होतं. […]
अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांवर मराठी माणसांची मोठ्या प्रमाणावर श्रद्धा आहे. श्री दत्तगुरुंचे अवतार मानले गेलेल श्री स्वामी समर्थ हे अक्कलोट येथे अनेक वर्षे वास्तव्याला होते. या काळात अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची स्वामींवर अपार श्रद्धा बसली. श्री स्वामी समर्थ व श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची पहिली भेट जुन्या राजवाड्यातील श्री गणेश पंचायतन मंदिरात झाली […]