गेली चार वर्ष आपटे आजींची सुप्रसिद्ध बटाटा वडा, भजी मिळणारी गाडी बंद होती. १९७१ ते १९८८ च्या अर्ध्या वर्षापर्यंत मी(आई वडील भावंडांसहित) ठाण्याचा रहिवासी. ठाण्यात उत्कृष्ट चविष्ट आणि स्वादिष्ट कुठे काय मिळतं याची खडानखडा माहिती आमच्या अट्टल खवैय्या मित्रांच्या कंपुला असायची. त्यामुळे कुणाच्याही, कुठे काही चविष्ट खाण्यात आलं की ते सगळ्यांना सांगितलं जायचं आणि आमच्या स्वाऱ्या धडकायच्या तिथे. […]
दिवाळी आणि रांगोळी ह्यांचे अतूट नाते आहे. ह्या रांगोळीचा उगम कधी झाला , कोणी प्रथम रांगोळी सुरू केली ह्याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात. काही म्हणतात अगस्त ऋषींच्या पत्नींनी , लोपामुद्रानी प्रथम यज्ञाच्या वेळी कोरडी रांगोळी काढली आणि सीतेनी रामासाठी ओली रांगोळी काढली. कोण म्हणतं द्वारका मध्ये कृष्णासाठी रूक्मिणीने रांगोळी सुरू केली . […]
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पहिली ओळख नामवंत शास्त्रज्ञ अशी असताना त्यांना राष्ट्रपती पदाची संधी मिळाली. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही त्यांनी आपल्या अलौकिक कामगिरीने देशाची नवी ओळख निर्णाण करून दिली. […]
माणूस आपल्या नाकाद्वारे विविध गंध ओळखतो, वेगवेगळ्या गंधांतला फरक सांगू शकतो. एखाद्या रसायनाचा गंध ओळखणं म्हणजे, त्या रसायनाच्या रेणूंची आपल्या घ्राणेंद्रियांशी झालेली क्रिया असते. मात्र एखाद्या रसायनाचा वास नक्की कसा आहे, हे त्या रसायनाच्या रेणूच्या रचनेवरून निश्चितपणे सांगणं, शक्य असतंच असं नाही. रसायनाच्या रेणूच्या रचनेतील, अणूंच्या काही ठरावीक गटांवरून त्या रसायनाच्या वासाचा अंदाज बांधता येत असला, तरी त्याला मर्यादा आहेत. अनेकवेळा जवळपास सारखी रेण्वीय रचना असणाऱ्या दोन रसायनांचा वास वेगळा असू शकतो. […]
के. आर. नारायणन यांना केवळ देशातच नव्हे तर विदेशातही अनेक मानसन्मान मिळाले. साहित्यातही त्यांची विशेष रुची होती. शालेय स्तरापासूनच त्यांनी विशेष श्रेणी मिळवली होती. परिवारातील बंधूत त्यांचा चौथा क्रमांक होता. […]
प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींच्याही एकमेकांशी संपर्क साधण्याच्या भाषा असतात. मात्र या भाषा रासायनिक स्वरूपाच्या असतात. काही वेळा ही रसायनं या वनस्पतींच्या मुळांद्वारे जमिनीतून, तर काही वेळा पानांद्वारे हवेतून, एका वनस्पतीकडून दुसऱ्या वनस्पतीकडे पोचवली जातात. एखाद्या वनस्पतीला जेव्हा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होतो, तेव्हा ती वनस्पती आजूबाजूच्या तिच्या भाऊबंदांना धोक्याची सूचना देऊन सावध करते. […]
आपल्याभोवती आढळणाऱ्या सर्व पदार्थांप्रमाणेच प्रतिपदार्थही अस्तित्वात आहेत. प्रतिपदार्थ हा सर्वसाधारण पदार्थासारखाच असतो, परंतु त्याचे काही गुणधर्म सर्वसाधारण पदार्थाच्या गुणधर्मांच्या विरुद्ध स्वरूपाचे असतात. उदाहरण द्यायचं, तर इलेक्ट्रॉनच्या प्रतिकणाचं – प्रतिइलेक्ट्रॉनचं – देता येईल. प्रतिइलेक्ट्रॉनचं वजन नेहमीच्या इलेक्ट्रॉनच्या वजनाइतकंच आणि त्याच्यावरचा विद्युतभार हा नेहमीच्या इलेक्ट्रॉनवरील विद्युतभाराइतकाच असतो. […]
डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना अनेक मानसन्मान मिळाले. भारतीय विद्यापीठांसह लंडन व केंब्रिज विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट पदव्या देऊन गौरविले. पहिला श्री. चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता. […]
व्ही पी बेडेकर अँन्ड सन्सचे डायरेक्टर अतुल बेडेकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९६७ रोजी झाला. अतुल बेडेकर रा. स्व. संघाच्या गिरगाव नगराचे संघचालक होते. तसेच जनता सहकारी बँक पुणेचे संचालकही होते. इतरही अनेक सामाजिक संस्थांमधे मोठ्या प्रमाणात ते सक्रीय सहभागी होते. […]
हिरा हे कार्बन या मूलद्रव्याचं, स्फटिकाच्या स्वरूपातलं एक रूप आहे. हिऱ्यांना रंग हे त्या स्फटिकांतील, अपद्रव्यांमुळे प्राप्त होतात. उदाहरणार्थ, निळ्या आणि पिवळ्या हिऱ्यांना त्यांचे रंग हे, त्यांतील बोरॉन, नायट्रोजन यासारख्या अपद्रव्यांमुळे मिळाले आहेत. मात्र गुलाबी आणि तपकिरी हिऱ्यांना त्यांचे रंग अपद्रव्यांमुळे नव्हे, तर एका वेगळ्याच कारणामुळे प्राप्त झाले आहेत. […]