मुंबयची काली-पिली म्हंजे, मुंबयची काळी-पिवळी टॅक्सी. मी पाहिली ती देखणी, आटोपशीर, बांधेसूद फ्याट (‘फियाट’) गाडी. ॲंबेसिडर टॅक्सी मुबईत क्वचितच दिसायची आणि तिच्यावर ‘मोठी टॅक्सी’ असं ठसठशीतपणे लिहिलेलं असायचं. टॅक्सी असो कोणतीही, पण त्या काळात ड्रायव्हर असायचा तो सरदारजीच..! त्या काळात टॅक्सी म्हणजे काय तरी अप्रुपच वाटायचं. खाजगी गाड्या तर अगदी दुर्मिळ. टॅक्सीत बसणं म्हणजे स्वर्गप्राप्ती झाल्यासारखंच वाटायचं. […]
आमची मालवणी फटकळ (सभ्य भाषेत स्पष्टवक्ते) म्हणून प्रसिद्ध. पण एक सागतो, फटकळ माणसाच्या मनात काही नसतं. जे आहे ते बोलून मोकळं होणार, मनात काही ठेवणार नाही. हे या भाषेचं वैशिष्ट्य मालवणील् समुद्राने बहाल केलंय. समुद्र कसा, पोटतला कचरा पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकतो, अगदी तसंच. इथे ‘मुतण्या’ला ‘मुतणं’च आणि ‘हगण्या’ला ‘हगणं’च म्हणणार. […]
मला बीयश्टीच्या बसचा प्रवास खुप आवडतो. बसचे डयव्हर-कंडक्टर तर मनुष्य स्वभावाचे नमुने असतातच, पण प्रवासीही काही कमी नसतात. कंडक्टर-प्रवाशांचे होणारे वाद-संवाद तर माणूस किती प्रकारे विचार करु शकतो याचा उत्तम नमुना असतो. मला बसचा प्रवास, त्याच्या गुण-दोषांसकट, समृद्ध करणारा वाटतो. प्रवास कितीही लांबचा असो, वेळ असेल तर मी बसचाच उपयोग करतो. […]
शासन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे पण कचरा एकत्रितपणे ठेवण्याची जबाबदारी मात्र नक्कीच नागरिकांची आहे. सरकार कुठे पुरे पाडणार? शाळेत मुलाला स्कूटरने सोडायला जातांना वडीलच पचकन रस्त्यात थुंकतात मग मुलगाही तेच अनुकरण करणार. आपण पृथ्वीला धरणीमाता म्हणतो, मग तिच्यावर थुंकायचं धाडस तरी कसं होतं? […]
आपली लोकशाही हि जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे म्हटले जाते. कायद्याच्या मुद्द्यावर ते बरोबरही आहे. परंतु बारकाईने पाहिल्यास आपल्या देशात लोकशाही आहे का, हा प्रश्नच आहे. गेल्या काही वर्षात आपला देश राजकीय घराणेशाहीने ग्रासलेला दिसतो. काही मोजके पक्ष सोडण्यास, याला कुणीही अपवाद नाही. […]
भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षाचा कालावधी लोटला. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक लहान मोठ्या संस्थांनानी बनलेला हा उभा-आडवा देश, स्वातंत्र्यानंतरच्या काही काळात एक अखंड देश म्हणून जगासमोर आला. ब्रिटीशांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी वारशात मिळाल्या, त्यात ‘लोकशाही’ नांवाची अप्रुपाची एक गोष्टही मिळाली. […]
हृदयाच्या बाह्य आवरणावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचे श्रेय डॉ विल्यम्स यांना जाते. १० जुलै १८९३ रोजी जेम्स कॉर्निश या नावाच्या कृष्णवर्णी रुग्णावर डॉ विल्यम्स यांनी शस्त्रक्रिया केली. डॉ विल्यम्स स्वतः कृष्णवर्णी होते. अमेरिकेत कृष्णवर्णी जनतेला जेव्हा समान हक्क प्राप्त झाले नव्हते तेव्हा एका कृष्णवर्णी रुग्णावर यशस्वी हृद्य शस्त्रक्रिया करून डॉ विल्यम्स यांनी इतिहास घडविला असेच म्हटले पाहिजे. […]
डॉ ऱ्हेन आधुनिक काळातील हृद्य-शस्त्रक्रियांचे जनक मानले जातात. १८९६मध्ये एका २२ वर्षीय रुग्णावर यशस्वी हृद्य-शस्त्रक्रिया करून डॉ ऱ्हेन यांनी हृद्यावरील शल्यचिकित्सेद्वारे करावयाच्या उपचार पद्धतीला खूपच वरच्या पायरीवर नेवून ठेवले. ‘हृदय हे शल्यचिकित्सेच्या परिघाबाहेर आहे’ असे त्या काळात मानले जात होते. परंतु ऱ्हेन यांनी तो परीघ विस्तारला व हृद्य-शल्यचिकित्सा शक्यतेच्या मर्यादेत आणून ठेवली. […]
नाणार येथील या प्रस्तावित रिफायनरीला ‘ग्रीन’ रिफायनरी असं गोंडस नांव दिलं गेलं होतं. मी ‘ग्रीन रिफायनरी’ची व्याख्या शोधायचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की, ‘ग्रीन रिफायनरी’ हा शब्द प्रयोग वनस्पतींपासून मिळवल्या जाण्याऱ्या तेल उद्योगासाठी करतात, खनिज तेलासाठी नव्हे. मग नाणार इथे होऊ घातलेल्या खनिज तेलाच्या शुद्धीकरणाच्या प्रकल्पास ‘ग्रीन रिफायनरी’ असं संबोधण्याचं कारण काय, हे मला समजलं नाही..रिफायनरीच्या संबोधनातच मला मोठा गोंधळ दिसतो आणि हे असं का, याचं स्पष्टीकरण संबंधीतांनी स्थानिक जनतेला देणं गरजेचं आहे. […]
भेट देणाऱ्याच्या दृष्टीने अगदी लहान असलेली ’भेट’, भेट दिलेल्याला काय मिळवून देईल, ते सांगता येत नाही..त्याचे हे दोन किस्से. एक मित्राने सांगीतलेला, तर दुसरा मी स्वत: अनुभवलेला.. […]