भारताने आपले राष्ट्रहित लक्षात घेऊन येणार्या काळात इस्राईलशी चांगले संबंध प्रस्थापित करून देशाचा सामरिक, आर्थिक व तांत्रिक अशा तिन्ही बाजू भक्कम कराव्यात. याकरीता इस्राईल हा भारताचा चांगला मित्र होऊ शकतो व हे सुधारलेले संबंध भारताच्या विकासात खूप हातभार लावतील. […]
मराठी दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला आज २२ जानेवारी रोजी २८६ वर्षे पूर्ण झाली. […]
श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील. […]
मकरसंक्रांतीला पूर्वी अनेकजण शुभेच्छा पत्रे पाठवीत असत.त्याला “भेटकार्ड” म्हटले जाई. वर एखादे फुलाचे चित्र, आत हलव्याचे ८ / १० दाणे असलेले कागदी पाकीट आणि ” तिळगुळ घ्या, गोड बोला. मकरसंक्रांतीचे अभिष्टचिंतन !” असा मोजकाच मजकूर असे. आता ते जवळपास बंदच झाले आहे. […]
प्लास्टीकचा आपण आपल्या दैनदिन जीवनात चांगला उपयोग करून घेत आहोत. पण आपला आळस, बेशिस्तपणा, कुठेही, कधीही, केंव्हाही रत्यात, ट्रेनमध्ये गुटका, पान खाऊन थुंकण्याची, समुद्र व नदीत प्लास्टिक कचरा टाकण्याची वाईट सवयी निसर्ग साखळीचा आणि पर्यावरणाचा बिकट प्रश्न निर्माण करीत आहे, त्याला काळिमा लावत आहे. […]
गर्भवती स्त्रियांब्दल सध्या अस्तित्वात असलेला कायदा पुरेसा आहे काय ? गर्भवी स्त्रियांना स्वयम्.निर्णयाचा अधिकार नको कां ? गर्भवती स्त्रियांच्या मनाचा, तसेंच त्यांच्या भविष्याचा विचार न केल्यास, त्यांच्यावर अन्याय होत नाहीं काय ? […]
मी दिव्यांचा संग्रह करायला सुरुवात केल्याला आता ५० वर्षे पूर्ण होतील. या निमित्ताने सध्या महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दीपमाळांचा शोध घेत आहे. पुण्याच्या राजगुरुनगरजवळ चासकमान येथील सोमेश्वर मंदिरातील २५६ दिव्यांची दीपमाळ ही अत्यंत देखणी दीपमाळ आहे. ही संपूर्ण दीपमाळ, चारही बाजूच्या भिंतीतील कोनाडे आणि गावातील नदीकाठावरील शेकडो कोनाडे दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेला दिव्यांनी उजळलेले पाहायला प्रत्यक्ष सोमेश्वर नक्कीच अवतरत असेल ! या दीपमाळेसह आणखी काही वैभवशाली इतिहासाच्या श्रीमंत खुणा पाहायला मिळाल्या. […]
आपल्या देशाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना, नॅशनलांईज्ड बॅंकांना-जरी त्या राष्ट्राच्या असल्या तरी- जसं त्यांच्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रांतांवरून ओळखतात, तसं बनवून टाकलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे किंवा मराठ्यांचे, राणा प्रताप राजस्थानचे किंवा राजपुतांचे, गुरु गोविंदसिंह पंजाब्यांचे किंवा पंजाबचे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राम्हणांचे वगैरे वगैरे… […]
गीत रामायणाचें बर्याच भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेलें आहे, ही गोष्ट माझ्या वाचनात आलेली होती. त्यामुळे, त्याचें हिंदी भाषांतर आधीच झालेलें असूं शकेल याची मला कल्पना होती (आणि, तशी परिस्थिती खरोखरच होती, हें नंतर मला समजलेंच). मात्र, मी त्यावर मोहित झालेलो असल्यानें, आपण हें भाषांतर करायचेंच असें मी ठरवलें. यात ‘स्वान्त:सुखाय’ अशा आनंदाचाच भाग होता ; व्यावसायिक कांहींही नव्हतें (आजही नाहीं ). […]