आपल्या जीवावर निवडून आलेल्या राज्यकर्त्यांकडून आणि आपल्याच पैशांवर मिळणाऱ्या सातव्या-आठव्या वेतन आयोगाच्या पगारावर पोसली जाऊनही पुन्हा आपल्यालाच लुबाडायला तयार असणाऱ्या नोकरशाहीकडून आपण ‘डंके की चोट’पर नागवले जातोय हे कळतंय, पण आता नेमकं काय करावं, हे न कळल्याने निर्माण झालेल्या असहाय्यतेतून, सार्वजनिक यंत्रणाविषयीची सामान्य जनतेच्या मनातली पराकोटीची चीड मी गेले दोन-तिन दिवस अनुभवतोय. या सर्वाॅचा मला एकच प्रश्न होता, की हे संपणार आहे की नाही? संपणार असेल, तर कधी? आणि कसं?… हेच सुचवणारा माझ्या ‘अस्वस्थ मन’ या नविन सदरातील पहिला लेख. […]
एका अनपढ ट्रक ड्रायव्हरच्या ट्रकवरच्या या वाक्याला आपल्या देशाचं ब्रिदवाक्य म्हणून मान्यता द्यायला हरकत नाही..! जनतेची व देशाची फिकीर तुम्हा-आम्हाला. या भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांना तर आपल्या भावी पिढ्यांची फिकीर पडलीय.. मग तुमच्या आमच्या कितीही पिढ्या बरबाद झाल्या किंवा ढेकणासारख्या चिरडून मेल्या किंवा वांग्यासारख्या खरपूस भाजून मेल्या तरी चालतील..!! […]
मी कायद्याचा जाणकार नाही. परंतू जे नजरेला दिसलं, त्यावरून मला हे लिहावसं वाटलं. माणसं, माणसं असताना कायदा गाढव होता हे ठिक आहे. पण आता माणसं गाढवासारखी वागू लागल्यावर, कायद्याने आता माणसासारखं वागायला हरकत नसावी, एवढंच मला सुचवायचं आहे..!! […]
राज्याच्या शैक्षणिक जडणघडणीत आणि प्रगतीत `बालभारती`ची भूमिका मोलाची आहे. बालभारतीच्या या वैभवशाली इतिहासाचे दस्तऐवजीकरण होणे गरजेचे होतं. ‘बालभारती’च्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त साधून संस्थेच्या इतिहासाचा-वाटचालीचा दस्तऐवज (डाॅक्युमेंटेशन) करण्याचं ठरलं. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलेलं हे पुस्तक बालभारतीच्या तसेच राज्याच्या शैक्षणिक-सामाजिक वाटचालीचा महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. […]
एका देवळात एका रिसायकल होणार्या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !! […]
पुण्यातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची ओळख केवळ प्रशासकीय इमारत म्हणून राहणार नाही तर पुण्याच्या वैभवात या इमारतीमुळे एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या इमारतीच्या बांधकामावर सुमारे ६७ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. ‘ग्रीन बिल्डिंग’ म्हणून या इमारतीची एक वेगळी ओळख तयार होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या देखण्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच […]
प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई! एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणार्या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओंमध्ये या स्टुडिओची गणना होते. […]
संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला.तेव्हा रात्र रात्रभर नाटक चालत असल्याने तीस गाण्यांचे हे नाटकही त्या वेळी लोकांना खूप आवडले. तेव्हापासून आज शंभर वर्षांत हजारो प्रयोग होऊनही लोकांच्या मनावरची ‘संगीत संशयकल्लोळ’ची जादू ओसरलेली नाही. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला २० ऑक्टोबर २०१७ रोजी १०१ वर्षे झाली. […]