नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

आता मदार चौथ्या खांबावरच

वारंवार कोसळू पाहाणाऱ्या लोकशाहीच्या सर्कशीच्या तंबूची शेवटची मदार आता न्यायववस्थेच्या चौथ्या खांबावरच आहे. या खाबाचं काही आलवेल नसलं, तरी तो अजून इतर तिन खांबांयेवढा पूर्ण सडलेला नाही, हे दाखवून देण्याची हिच वेळ आहे..!! […]

‘विकासा’ची व्याख्या

आपल्याकडे गेली अनेक वर्षे विकास या शब्दाची चर्चा आहे. हल्ली तर विकास सुसाट सुटलाय ते विकास वेडा झालाय इथपर्यंत चर्चा आहे. देशातील इतर शहरांचं माहित नाही, परंतू मुंबई गेली काही वर्ष ‘विकास’ चाललेला ‘दिसतो’ आहे. विकास हा शब्द नेत्यांपासून ते एखाद्या कंगाल माणसापर्यंत सर्वच लोकांच्या मुखात असतो. परंतू प्रत्येकाच्या विकासाची व्याख्या मात्र वेगवेगळी आहे असं वाटतं. हे म्हणजे विकासाच्या रथाला चहूबाजूने घोडे, ते ही शहरातलं धष्टपुष्ट अरबी ते गांवाकडचं एखादं मरतुकडं घोडं, अशा वेगवेगळ्या ताकदीचे जोडले आणि त्यांना त्यावरील, पोट भरलेला नेता ते पोटभरू कामगार अशा, स्वारांनी एकाचवेळी वेगवेगळ्या दिशेने जोरात पळण्यासाठी टांच मारली, तर त्या विकासाच्या रथाचं जे काही होईल, तसं आपल्या विकासाचं झालंय असं मला वाटतं..हे असं होण्याचं एकमेंव कारण म्हणजे विकासाची नेमकी व्याख्या काय आणि तो कोणासाठी करायचा हे ठरलेलं नसणं. […]

काळाच्या पडद्याआड गेलेले मुंबईचे ‘कॅफे समोवर’

दक्षिण मुंबईच्या काळा घोड्याजवळील प्रख्यात जहांगिर आर्ट गॅलरीच्या आडोशाला राहून मुंबईच्या सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार बनलेल्या ‘कॅफे समोवर’ने २०१५ मध्ये मुंबईकरांना अलविदा म्हटले आणि सवयीने या कॅफेकडे वळणारी अनेक असंख्य पावले थांबली! यामध्ये होती अमोल पालेकर, शाम बेेनेगल वगैरेंसारखी नामांकित मंडळी आणि तुमच्या-माझ्यासारखे असंख्य मुंबईकर. […]

थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (१७ सप्टेंबर १८८५ – २० नोव्हेंबर, १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक, बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र होते. आज प्रबोधनकार (केशव सीताराम ठाकरे) यांची जयंती .. […]

सैनिकांचे “सरंबळ”- एक शुरांचं गाव !

“शहिदांचे गाव” म्हणून प्रसिद्ध असलेला कुडाळ तालुक्यातील सरंबळ हे माझं गाव. १९१४ साली झालेल्या युद्धामध्ये गावातील ५२ सैनिकांपैकी सात सैनिक शहीद झाले. “लढवय्यांचे गाव” म्हणूनही या गावाची ओळख आहे. त्यांच्या स्मरणार्थ या गावामध्ये रणस्तंभ उभारण्यात आला आहे. […]

‘धनुष्यबाण’, ‘नारायणास्त्र’ ते ‘वज्रस्त्र’ !

गेले काही महिने राणे काय करणार, याची चर्चा प्रसार माध्यमांनी अशा वळणावर नेली होती, की जणू राज्यात मोठा राजकीय भूकंपच होऊ घातला आहे. प्रत्यक्षात राणे यांनी मोठा गाजावाजा करून अखेर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि सोबत आपल्या आमदारकीचा राजीनामाही देऊन टाकला. एक “स्वाभिमान” दुखावलेला कोकणातील नेता आधी शिवसेनेला जय महाराष्ट्र करतो आणि नंतर कॉंग्रेस ला सोडचिठ्ठी देतो. मग भाजपच्या वाटेवर जातो पण रस्ता चुकल्याने अखेर ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ घेऊन स्वतःची वेगळी चूल मांडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष लागल होत. त्यांनी काल आपली नवीन दिशा जाहीर केली. राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे नाव जाहीर केले. […]

हिन्दू : संस्कृती की धर्म?

हिन्दू संस्कृती ‘धर्म’ म्हणून ओळखली जाण्याच्या टप्प्यावर, स्वत:ला हिन्दू म्हणवणाऱ्या प्रत्येकाने या लेखात उपस्थित केलेल्या मुद्दयांचा गांभिर्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. मला याबातीत आपण विचारपूर्वक दिलेली उत्तरं जाणून घेण्यात मला रुची आहे, नव्हे आपण हिन्दूंच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी तसं होणं आवश्यक आहे, असंही मला वाटतं. […]

द “बर्निंग” ट्रेन

ही पोस्ट बुलेट ट्रेन हवी का नको या चर्चेसाठी नाही.ती आताच का , बुलेट ट्रेन ऐवजी हे करा, ते का नाही करत या फंदात मला पडायचे नाही. हे मतप्रदर्शन नाही तर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट नक्की काय आहे त्याबद्दल फक्त माहिती देत आहे !! काल काही चॅनेल्सवर सुद्धा हे सांगितले. नेटवर सुद्धा माहिती उपलब्ध आहे. […]

‘दूरदर्शन’…!

आज १५ सप्टेंबर…! आजच्या दिवशी १९५९ साली भारतात दुरदर्शन ची सेवा सुरु झाली. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे…! पु.लं.नीच “दुरदर्शन” हे नाव सुचवले आणि नंतर ते सर्वमान्य झाले….! […]

राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र का केला ?

जुन्या मनसे आणि सेना कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी माहित असतील, महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ पत्रकारांना देखील या माहित आहेत पण अनेक नवीन कार्यकर्त्याना माहित नसेल म्हणून हि माहीती, अनेकांना प्रश्न पडत असेल की नक्की साहेबांना असा काय त्रास दिला कि त्यांनी सेना सोडली…? त्यांनी सोडली नाही, तर त्यांनी सोडून जावं या साठीच “अनेकांनी” प्रयत्न केले. […]

1 201 202 203 204 205 226
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..