देशप्रेम ही केवळ सोयीने वापरण्यापुरती किंवा, पोलिसांवर, लष्करांवर सोपविलेली गोष्ट नसावी. आज आपला देश सुरक्षित आहे का? त्यासंदर्भात देशासमोर कोणती आव्हाने आहेत आणि छत्रपतींच्या रणनितीचा वापर करुन ही आव्हाने कमी करु शकतो का? याचा विचार केला पाहिजे. […]
स्वातंत्र्यवीर सावरकार यांचा जीवनभर मृत्यूशी जवळचा संबंध होता, असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. क्रांतीचा पथ म्हणजे मृत्यूच्या हातात हात घालून चालणेंच की. आणि , हा पथ त्यांनी विचारपूर्वक स्वीकारलेला होता. […]
आज आपण हार्ट- ट्रान्स्प्लांट (हृदय-प्रत्यारोपण) बद्दल बोलतो. अगदी साध्या भाषेत बोलायचे तर एका जिवंत माणसाच्या शरीरातील निकामी हृदय काढून त्याजागी दुसरे सुस्थितीतील हृदय बसविणे व ते चालते करणे ही प्रक्रिया म्हणजे हृदय-प्रत्यारोपण!३ डिसेंबर १९६७ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात, ग्रुटे शुर रुग्णालयात, डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी पहिली हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली त्या घटनेला गेल्या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. […]
ईशान्य भारतातील लहान राज्यात बांगलादेशी घुसखोरांचे आक्रमण हा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा या ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या निवडणुका त्रिपुरात 18 फेब्रुवारीला, मेघालय व नागालँड या दोन राज्यांत 27 फेब्रुवारीला होतिल. मात्र याला मिडीयात,कुठल्या वाहिन्यांमध्ये खास स्थान मिळाले नाही. या तिन्ही विधानसभांच्या सदस्यांची संख्या प्रत्येकी 60 इतकी आहे. ईशान्येकडच्या राज्यांची एकूण सदस्य संख्या बंगालपेक्षाही […]
या वर्षीचे संरक्षण बजेट हे ७.८१ टक्क्यांनी वाढले आहे. म्हणजे मागच्या वर्षी असलेले २९५५११ कोटींहून २७४११४ कोटी एवढे वाढलेले आहे. मात्र हे अतिशय कमी आहे. यामुळे आधुनिकीकरणाला चालना मिळेल ही आशा रसातळाला मिळालेली आहे. १९६२ पासून आपण जर संरक्षण बजेटचा अभ्यास केला तर ही वाढ सर्वांत कमी वाढ आहे. […]
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन १० दक्षिण-पूर्व आशियाई देशांचे प्रमुख उपस्थित रहाणार आहे.हे देशाच्या इतिहासात प्रथमच होते आहे. येत्या काळात भारत-चीन स्पर्धा अधिक तीव्र होणार. कारण चीनच्या महत्त्वाकांक्षांच्या आड येणारा आशियाई खंडात भारत हा एकमेव देश आहे. म्हणून चीन भारतविरोधी धोरण अवलंबणारच. […]
भारताने आपले राष्ट्रहित लक्षात घेऊन येणार्या काळात इस्राईलशी चांगले संबंध प्रस्थापित करून देशाचा सामरिक, आर्थिक व तांत्रिक अशा तिन्ही बाजू भक्कम कराव्यात. याकरीता इस्राईल हा भारताचा चांगला मित्र होऊ शकतो व हे सुधारलेले संबंध भारताच्या विकासात खूप हातभार लावतील. […]
मराठी दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला आज २२ जानेवारी रोजी २८६ वर्षे पूर्ण झाली. […]
श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील. […]