नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

सत्कार, शाल आणि श्रीफळ

कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात तरी नक्की आहे. कदाचित देशात इतरत्रही असावी असं टिव्हीवरील इतर प्रांतात विविध व्यक्तींच्या केल्या जाणाऱ्या सत्कारांच्या क्लिप्स पाहून जाणवतं. मोठी व्यक्ती म्हणजे, ज्या व्यक्तींनी समाजात समाजासाठी काही भरीव कार्य केलंय अशा व्यक्ती. मग त्या व्यक्तीचं ते कार्य समाजसेवेचं असो वा शिक्षण […]

सरकारी कार्यालयातला ‘गटारी’ भ्रष्टाचार !

…सरकारी कार्यालयाचे वाॅचमन, कार्यालयातील शिपाई, लिफ्टमन आदींचं समाधान दोन-पाचशे रुपयांच्या वर्गणीवर होतं. कारण त्यांची मजल तेवढीच असते. तेवढ्यावर मिळणारं एखादं गटार त्यांना पुरेसं असतं. खरी गटारी तर त्यांच्या पुढच्या डेसिग्नेशन्सवर असलेल्यांची आणि त्यांची तिथे नेमणूक करणार्‍या राजकारण्यांची असते. हे गटारी निमित्त वर्गणी वैगेरे काढत नाहात. ते एका दिवसाच्या गटारीवर समाधानीही नसतात. त्यांची गटारी वर्षभर सुरुच असते आणि लोळण्यासाठी गटारं असतात, ती ‘लाचे’ची, कॅश आॅर काईंड आॅर बोथ..! ही गटारं साधी, झोपडपट्टीतल्यासारखी गरजेपोटी निर्माण झालेली नसतात, तर मुद्दामहून तयार केलेले परंतू वरून गुळगुळीत गिलावा केलेले मोठे, गलित्छ नाले असतात… […]

फेसबुक, अश्लीलता आणि माझं ब्लाॅक केलं गेलेलं फेसबुक खातं !

घट्ट स्लॅक आणि टाईट कुर्ता घातलेली, चालती-फिरती आधुनिक जिवंत ‘शिल्पं’, त्या प्राचिन दगडी शिल्पांचीच आठवण करून देतात. अश्या समाजमान्य कपड्यांत, हाफ आणि क्वार्टर पॅन्टीत किंवा बिकीनीत काढलेले फोटो बिनधास्त फेसबुकवर शेअर केले जातात, त्यात कुणाला वावगं, अशिष्ट, अश्लील असं काहीच वाटत नाही. फेसबुकलाही वाटत नाही. […]

“गटारी” अमावस्या म्हणजे आपली “दीप अमावस्या”

आपल्याकडे प्रत्येक प्रथेमागे, सणामागे काही ना काही सामाजिक आणि शास्त्रीय कारणे ही आहेतच. दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु होतो. ऊन-पावसाचा खेळ. अंधार देखील लवकर पडू लागतो. कदाचित म्हणूनच पूर्वी दीप अमावास्येच्या निमित्ताने घरातील सर्व दिवे बाहेर काढून त्या योगे त्यांची स्वच्छता व्हावी असे अध्यारूत असावे. […]

मी, एक दहशतवादी ! 

संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आराखडा तयार करत असताना मला आलेल्या अनुभवांवर आधारित हा लेख.  […]

इंग्रजांनो, शतशः सलाम ! 

एका जर्मन कंपनीच्या कृषी विभागातर्फे आठ वर्षे कोकणात भटकंती करत असताना इंग्रजांच्या काळातील असा एकही पूल शिल्लक राहिला नाही जिथे थांबून पुलावर लावलेल्या दगडावरील (प्लेक्) माहिती मी वाचली नाही. ३४ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे अस्तित्वात आली नसल्यामुळे रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत असे. मोबाईल अस्तित्वात आला नव्हता व चांगल्या कॅमेऱ्यांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे फोटो काढणे शक्य नव्हते. पूल […]

पेपरलेस कारभार – एक भ्रम

गेली काही वर्ष आपण पेपरलेसच्या गोष्टी ऐकतोय व त्याच्या गप्पाही मारतोय. संगणकीकरण, डिजीटलझेशन वैगेरेमुळे पेपर्स वापरण्याचं प्रमाण कमी होईल असं खरंच वाटत होतं. मलाही बरं वाटलं होतं. पर्यावरण, झाडं वैगेरे वाचतील हा विचार नंतरचा, पण ती कायतरी टायपलेल्या कागदांचं ओझं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं वाचेल म्हणून मला जास्त आनंद होत होता. पण परवाच एका वकिल […]

मुंबईच्या एका ऐतिहासिक वारश्याचा निर्घृण खून

शनिवार दिनांक २४ जुन २०१७. मी एकूण ३० मुंबईप्रेमींना घेऊन माझी पहिलीच ‘मुंबई हेरीटेज टूर’ केली. सायनच्या प्राचिन शिवमंदीरापासून सुरु केलेली ही फेरी सायनचा किल्या, रस्त्यातले तिनशे वर्ष जुने माईलस्टोन, हाफकिन अर्थात जुनं राजभवन, भायखळ्याच भाऊ दाजी लाड म्युझियम व त्यातील पुतळ्यांचा इतिहास, फोर्ट सेंट जाॅर्ज व शेवटी मुंबईचा ऐतिहासिक फोर्ट विभाग पाहून समाप्त झाली. या […]

गुरू….

‘गुरु’चा महिमा जेवढा आपल्या संस्कृतीत सांगीतला गेलाय, तेवढा क्वचितच इतरत्र सांगीतला गेला असावा. “गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर..गुरुः साक्षात्परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः:” हे वचन आपल्या नित्याच्या व नैमितिक म्हणण्यात असतं. ब्रम्हा, विष्णू आणि महेश या विश्वाची उत्पत्ती, पोषण आणि लयाला कारणीभुत असणाऱ्या, उभ्या भारत देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतीक आस्थेचा भाग असणाऱ्या त्रिमुर्तीची बरोबरी, […]

1 204 205 206 207 208 226
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..