मराठा समाजाचा विकास खुंटला तो, त्यांच्या राजकारणाच्या व्यसनामुळे. ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी आपले खिसे भरून घेतले. त्यांनी सतराशे साठ घोटाळे, भ्रष्टाचार करून आपली घर पैशाच्या पोत्यांनी भरली आणि दुर्दैवाने मराठा समाज अशाच लोकांना त्यांचा आदर्श मानू लागला..फास्ट पैसा… गाडी, बंगला, पाटीलकी, नाव, इज्जत, मान या गोष्टींसाठी मराठा समाज राजकारणात उतरून कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवू लागला..आणि या […]
माझ्या छंदांच्या निमित्ताने स्वच्छंद भटकताना गेली कित्येक वर्षे माझी पुण्याला नियमित भेट असतेच. तसा मी जन्माने – कर्माने पूर्ण मुंबईकर. कित्येक वर्षांपूर्वी दादरमध्ये रानडे रोडवर सहकुटुंब उभे राहून माझ्या वडिलांनी प्रबोधनकार ठाकऱ्यांबरोबर गप्पा मारल्या आहेत. मुंबईमध्ये आचार्य अत्रे, सेनापती बापट, श्री.ना,पेंडसे, विंदा करंदीकर, अप्पा पेंडसे ते मुंबईत येणाऱ्या अभिनेते चंद्रकांत,सूर्यकांत, राजा गोसावी,शरद तळवलकर अशा कितीतरी थोर […]
आमच्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी पूर्वी मी खूप मोठी सजावट करीत असे. शेकडो मंडळी आवर्जून भेट देत असत. पण आता अशी सजावट वयोमानानुसार शक्य होत नाही. तरीही गणेशोत्सव आला की आतली उर्मी मला शांत बसूही देत नाही. मग थोडीशी सजावट करतोच ! […]
गेले दोन-तिन दिवस हरयाणात जो काही धिंगाणा त्या राम रहीमच्या भक्तांनी घातलाय, तो मनाला अस्वस्थ करणारा आहे. त्याहीपेक्षा अस्वस्थता, सरकारने हे सर्व होऊ दिलं, याची आहे. झुंडशाहीपुढे झुकलेलं सरकार ही चिंतेची बाब आहे. ‘झुंडी यशस्वी होतात, मात्र त्या नेहेमीच शहाण्या नसतात’ या अर्थाचं प्लेटोचं एक वाक्य आहे, ते या निमित्तानं आठवलं. हल्ली हे वाक्य वारंवार आठवतं, […]
मुंबईत माटोळी पाहायला मिळणे हेच दुर्मिळ आहे. गोव्यामध्ये माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात. […]
विश्वातील सर्वात प्राचिन अश्या आपल्या हिंदू धर्मात ईश्वर एकच असला तरी त्याची अनेक रुपं मान्य केली आहेत. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे मान्य करतानाच हिन्दू धर्माने, ईश्वराला सगुण साकार बनवूनही पुजलं आहे. आपला ईश्वर आपण जसा मुर्ती रुपात साकारतो, श्रद्धेने पुजतो, त्याच आणि तेवढ्याच श्रद्धेने आपण निसर्गातही देव शोधतो. ईश्वर सर्वव्यापी असून अवघे चराचर व्यापून वर दशांगुळे उरतो असं मानणाऱ्या आपल्या पूर्वजांनी, निसर्गातल्या विविध चल-अचल रूपातला ईश्वर स्विकारला त्यात नवल ते काय..! […]
कोणतीही निर्मिती होताना प्रत्यक्ष त्याचं साक्षिदार असणं, हा विलक्षण आनंदाचा भाग असतो. निर्मिती, मग ती कोणतीही असो, ती देखणीच असते असं मला वाटतं. माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर एक सुतारकामाचा कारखाना होता. माझं लहानपण हे लहानपणी जसं असावं तसंच होतं, आतासारखं ते मोठ्यांसारखं झालेलं नव्हतं. अभ्यास, तोही चोख, शाळेच्याच वेळेत करायची पद्धत होती. तो एकदा केला, की मग पुढचे अनेक तास गंमतीचेच असतं. क्लास ह्या शब्दाचा जन्मही झाला नव्हता तेंव्हा. त्यामुळे अभ्यास हा शाळेतच करायचा असतो, असं तेंव्हा आम्हाला वाटे. शाळेचे दोन-पाच तास सोडले, तर रात्री झोपेपर्यंतचा वेळ हा मजेचाच होता. […]
आजच्या घडीला दिल्ली, चेन्नई,कोलकाता आणि मुंबई ह्या ४ महानगरांमधील प्लास्टिक कचरा दर दिवशी ६१ लाख किलो पेक्षा जास्त तयार होतो. प्रत्येकाने मनातल्यामनात एक शपथ घ्या की आजपासून मी प्लास्टिकचा, विशेषतः प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कटाक्षाने बंद करेन. आणि रोज दोन जणांना ह्याप्रमाणे प्रवृत्त करेन. […]
भगवंता, तुझी रुपे अनेक, सर्व चराचरातच तू अंशरुपाने वसतोस अशी आमचीही श्रध्दा. आम्ही जे जे डोळ्यांनी बघतो ते ते तुझेच रुप आहे, असा विश्वास साधुसंतांनी आमच्या मनात बाणवला. तरीही मानवरुपात तुझे जे अवतार झाले त्यापैकी सातवा अवतार प्रभूरामचंद्रांचा आणि आठवा अवतार भगवान श्रीकृष्णाचा […]
हिंदूंच्या देववैविध्यात भगवान श्रीकृष्ण हा मोठा लोकप्रिय देव ! हिंदूंचा धर्मग्रंथच ज्याने निर्माण केला असा हा अद्वितीय तत्ववेत्ता ! अत्यंत सात्विकतेने वागतानाच वेळ पडल्यास ” नरो वा कुंजरो वा ” म्हणणारा, स्थानिकांना कमी पडते म्हणून दही-दूध-लोणी बाहेर नेण्यास प्रतिबंध करणारा, १६ सहस्र नाडयांवर ( नारींवर नव्हे) हुकूमत असलेला योगीराज, नृत्य,सूर आणि स्वरराज्य यावर ज्याचे अधिपत्य होते […]