स्त्रीला ‘भिक्षा’ म्हणून किंवा ‘चढावा’ म्हणून ‘डावा’वर लावायची आपली परंपरा पांडवांइतकी जुनी आहे आणि पुढेही चालूच राहाणार आहे. राम रहीम पहिला नाही आणि शेवटचा तर नाहीच नाही. आणखी काही बाबा, बापू, माॅं हे स्वत:ला परमेश्वराचा अवतार म्हणून हे सारे खेळ या क्षणालाही करत असावेत असं म्हटलं तर खोटं ठरू नये. जोपर्यंत बाबांना राजाश्रय आहे आणि लोक देवापेक्षा उपायांच्या शोधात आहेत, तो पर्यंत आपल्या समाजात असंच चालू राहाणार. […]
डॉ. दीपक अमरापूरकर हे जागतिक कीर्तीचे यकृताचे तज्ज्ञ डॉक्टर..! बॉम्बे हॉस्पिटलची शान, अचूक निदान करणारा, अतिशय बुद्धिमान डॉक्टर..! मूळ सोलापूरचा असलेला हा माणूस अतिशय कष्टातून आणि परिश्रमातून डॉक्टर झाला आणि आपल्या मनमिळाऊ हसतमुख स्वभावानं दुसर्याच्या मदतीला कायम तयार असायचा. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. LJ वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केलं. […]
‘बाबा’ राम रहिमला वीस वर्षांची सजा ठोठावली हे ठीक झाले, पण आतापर्यंत ज्या राजकीय पक्षांनी अशा बाबांचा पाठिंबा घेऊन मते मिळविली त्यांच्या नैतिकतेचे काय? पैसा व संपत्ती हेच धर्म आणि अध्यात्माचे अधिष्ठान होत आहे. संत कोण व देव कोण याच्या व्याख्या ठरवा नाहीतर सर्वच धर्मांतील बाबागिरीवर कायद्याने बंदी घाला…! […]
रसायनशास्त्रात मोलाचे संशोधन करणाऱ्या जरट्रड बेले एलियन हिने कर्करोगावर उपाय शोधून काढला. तसेच हृदयविकार व पोटातील वायुविकारासंबंधी महत्त्वाचे संशोधन करून त्यासंबंधीची औषधे विकसित केली. त्याबद्दलच तिला १९८८ मध्ये शरीर-विज्ञानासंबंधीचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. […]
मराठा समाजाचा विकास खुंटला तो, त्यांच्या राजकारणाच्या व्यसनामुळे. ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी आपले खिसे भरून घेतले. त्यांनी सतराशे साठ घोटाळे, भ्रष्टाचार करून आपली घर पैशाच्या पोत्यांनी भरली आणि दुर्दैवाने मराठा समाज अशाच लोकांना त्यांचा आदर्श मानू लागला..फास्ट पैसा… गाडी, बंगला, पाटीलकी, नाव, इज्जत, मान या गोष्टींसाठी मराठा समाज राजकारणात उतरून कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवू लागला..आणि या […]
माझ्या छंदांच्या निमित्ताने स्वच्छंद भटकताना गेली कित्येक वर्षे माझी पुण्याला नियमित भेट असतेच. तसा मी जन्माने – कर्माने पूर्ण मुंबईकर. कित्येक वर्षांपूर्वी दादरमध्ये रानडे रोडवर सहकुटुंब उभे राहून माझ्या वडिलांनी प्रबोधनकार ठाकऱ्यांबरोबर गप्पा मारल्या आहेत. मुंबईमध्ये आचार्य अत्रे, सेनापती बापट, श्री.ना,पेंडसे, विंदा करंदीकर, अप्पा पेंडसे ते मुंबईत येणाऱ्या अभिनेते चंद्रकांत,सूर्यकांत, राजा गोसावी,शरद तळवलकर अशा कितीतरी थोर […]
आमच्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी पूर्वी मी खूप मोठी सजावट करीत असे. शेकडो मंडळी आवर्जून भेट देत असत. पण आता अशी सजावट वयोमानानुसार शक्य होत नाही. तरीही गणेशोत्सव आला की आतली उर्मी मला शांत बसूही देत नाही. मग थोडीशी सजावट करतोच ! […]
गेले दोन-तिन दिवस हरयाणात जो काही धिंगाणा त्या राम रहीमच्या भक्तांनी घातलाय, तो मनाला अस्वस्थ करणारा आहे. त्याहीपेक्षा अस्वस्थता, सरकारने हे सर्व होऊ दिलं, याची आहे. झुंडशाहीपुढे झुकलेलं सरकार ही चिंतेची बाब आहे. ‘झुंडी यशस्वी होतात, मात्र त्या नेहेमीच शहाण्या नसतात’ या अर्थाचं प्लेटोचं एक वाक्य आहे, ते या निमित्तानं आठवलं. हल्ली हे वाक्य वारंवार आठवतं, […]
मुंबईत माटोळी पाहायला मिळणे हेच दुर्मिळ आहे. गोव्यामध्ये माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात. […]
विश्वातील सर्वात प्राचिन अश्या आपल्या हिंदू धर्मात ईश्वर एकच असला तरी त्याची अनेक रुपं मान्य केली आहेत. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे मान्य करतानाच हिन्दू धर्माने, ईश्वराला सगुण साकार बनवूनही पुजलं आहे. आपला ईश्वर आपण जसा मुर्ती रुपात साकारतो, श्रद्धेने पुजतो, त्याच आणि तेवढ्याच श्रद्धेने आपण निसर्गातही देव शोधतो. ईश्वर सर्वव्यापी असून अवघे चराचर व्यापून वर दशांगुळे उरतो असं मानणाऱ्या आपल्या पूर्वजांनी, निसर्गातल्या विविध चल-अचल रूपातला ईश्वर स्विकारला त्यात नवल ते काय..! […]