गेली काही वर्ष आपण पेपरलेसच्या गोष्टी ऐकतोय व त्याच्या गप्पाही मारतोय. संगणकीकरण, डिजीटलझेशन वैगेरेमुळे पेपर्स वापरण्याचं प्रमाण कमी होईल असं खरंच वाटत होतं. मलाही बरं वाटलं होतं. पर्यावरण, झाडं वैगेरे वाचतील हा विचार नंतरचा, पण ती कायतरी टायपलेल्या कागदांचं ओझं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं वाचेल म्हणून मला जास्त आनंद होत होता. पण परवाच एका वकिल […]
शनिवार दिनांक २४ जुन २०१७. मी एकूण ३० मुंबईप्रेमींना घेऊन माझी पहिलीच ‘मुंबई हेरीटेज टूर’ केली. सायनच्या प्राचिन शिवमंदीरापासून सुरु केलेली ही फेरी सायनचा किल्या, रस्त्यातले तिनशे वर्ष जुने माईलस्टोन, हाफकिन अर्थात जुनं राजभवन, भायखळ्याच भाऊ दाजी लाड म्युझियम व त्यातील पुतळ्यांचा इतिहास, फोर्ट सेंट जाॅर्ज व शेवटी मुंबईचा ऐतिहासिक फोर्ट विभाग पाहून समाप्त झाली. या […]
‘गुरु’चा महिमा जेवढा आपल्या संस्कृतीत सांगीतला गेलाय, तेवढा क्वचितच इतरत्र सांगीतला गेला असावा. “गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर..गुरुः साक्षात्परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः:” हे वचन आपल्या नित्याच्या व नैमितिक म्हणण्यात असतं. ब्रम्हा, विष्णू आणि महेश या विश्वाची उत्पत्ती, पोषण आणि लयाला कारणीभुत असणाऱ्या, उभ्या भारत देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतीक आस्थेचा भाग असणाऱ्या त्रिमुर्तीची बरोबरी, […]
मुंबई आणि आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या कबुतरांची गणना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करणार आहे. पहिल्या टप्प्यात कबुतरांची संख्या मोजली जाईल. दुसऱ्या टप्प्यात कबुतरखाने, कबुतरांचे राहणीमान, त्याचे लोकांवरील परिणाम आणि तिसऱ्या टप्प्यात विविध डॉक्टरांशी चर्चा करून, कबुतरांचे आरोग्य आणि कबुतरांचे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयी माहिती मिळविली जाईल. मुंबईत कबुतरांसाठी दाण्यांची, राहण्याची आणि सुरक्षेची सोय सहज होते. अशा अनेक कारणांमुळे मुंबईत कबुतरांची संख्या येत्या काळात अधिक वाढणार आहे, असे बीएनएचएसचे म्हणणे आहे. […]
दरवर्षी जून महिन्याच्या सुरवातीला देशात पावसाच्या आगमनाला सुरुवात होत असते. वेधशाळेच्या अंदाजानुसार त्याआधी सगळ्या प्रिंट मिडिया आणि वृत्तवाहिन्यांतून पावसाच्या आगमनाचे अंदाज वर्तवण्यात येत असतात. पण असे लक्षात येऊ लागले की अंदाज कुठेतरी चुकत आहेत! या सगळ्याला कुठलेतरी वातावरणातील बदल जबाबदार आहेत किंवा दैनंदिन जीवनात आपल्या हातून घडण्याऱ्या चुकीच्या कृतींचे पडसाद असतील. उदा. झाडे तोडणे त्या जागी नवीन झाडे न लागणे, त्यांचे संवर्धन न करणे, कारखान्यांतून आणि इतर गोष्टींतून वातावरणात प्रदुषित आणि विषारी वायूचे उत्सर्जन प्रमाणाच्या बाहेर होणे इत्यादी. काही प्रमाणत एल निनोचाही यात सहभाग असतो. […]
सर्व प्राण्यांना जे काही नटवायचे ते निसर्गाने स्वतः:च नटविले आहे. पण मनुष्य प्राण्याला मात्र निसर्गाने दिलेले सौंदर्य अपूर्ण वाटते.अनादिकालापासून तो अधिकाधिक सौंदर्य प्रसाधनांच्या शोधात आहे. सौंदर्यवर्धक वस्तूंचा शोध आणि निर्मिती त्याने हजारो वर्षांपासून चालविली आहे. अगदी मोहेंजोदरो आणि हडप्पा , ईजिप्शियन, ग्रीक अशा पुरातन संस्कृतीतून त्याची बीजे दिसतात. निसर्गाने जे सौंदर्य द्यायचे ते त्याने सर्व प्राण्यांमधील नरांना दिले […]
कोकणचे किनारे, मंदिरे, डोंगर आणि दाट झाडीने झाकलेला निसर्ग म्हणजे भन्नाटच ! आम्हाला दाभोळच्या खाडीतून जाताना आधी दुपार, मग संध्याकाळ, रत्नागिरीच्या जिंदाल कारखान्याजवळ आणि गणपतीच्या मंदिर परिसरात रात्र आणि दुसऱ्या दिवशी पावस खाडीजवळ पुन्हा स्वच्छ सकाळ लाभली. छायाचित्रांमध्ये तर माझी ” टिपता किती टिपशील या कॅमेऱ्याने ” अशी स्थिती झाली होती. जय परशुराम ! –मकरंद करंदीकर
माझ्या ऑफिसमधल्या परबकाकांच्या तोंडी हे पालुपद कायम असायचे. मुंबईत काम करणारे हे परब, शेकडो मैल लांब असलेल्या त्यांच्या या रामेश्वराच्या रेंजमध्ये कायमच असायचे. सिंधुदुर्गामधील आचरे येथील हा देव रामेश्वर म्हणजे मोठा जागृत देव ! भक्तांची देवावर श्रद्धाही तशीच गाढ. आपण कुठेही असलो आणि काही चुकीचं वागलो तर ” रामेश्वर बघता हा ” अशी भीती आणि काही […]
मानवाने जंगलं साफ करून शेती करण्यास सुरवात केली तेव्हा या पृथ्वीवर इतकी घनदाट जंगलं होती की थोड्याशा जंगलतोडीमुळे विशेष फरक पडला नाही. हळूहळू इंधन व इतर अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागली व परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली. आता जर त्वरित कृती केली नाही तर ही सुंदर वसुंधरा उजाड होण्यास वेळ लागणार नाही […]
नवे केंद्रीय मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर काही मंत्र्यांचे थेट कामाला लागणे लक्ष वेधून घेते. वृत्तपत्रे आणि चॅनेलीय मुलाखती, सत्काराच्या प्रचंड सभा, कार्यकर्त्यांच्या बैठकी, मोठमोठे दौरे असल्या गोष्टी टाळून काही मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यात श्री. सुरेश प्रभू यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी रेल्वे खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून रेल्वेचा कारभार सुधारण्यासाठी अत्यंत तळमळीने अनेक गोष्टी […]