गोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे तसेच चीनला अधिकृत भेट देणारे वेंकटरामन हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती । कामराज यांच्या रशिया भेटीवर आधारित प्रवासवर्णनासाठी त्यांना सोव्हिएट लँड-नेहरू पारितोषिक देण्यात आले. […]
भारतीय संस्कृतीलातीत सनातन विश्वधर्मावर आधारलेली आहे. वैदिक वाङ्मयात ऋत नावाची एक संकल्पना आहे. ही ऋत संकल्पनाच या विश्वधर्माची मूळ बैठक होय. आपण गणपती अथर्वशीर्षात ऋतं वच्मि सत्यं वच्मि म्हणतो, हेच ते ऋत होय. ऋत म्हणजे अंतिम सत्याचा मार्ग, विश्वाचा शाश्वत नियम. […]
झैल सिंग यांना ब्रिटिश शासनाने तुरुंगात डांबले. सुटका झाल्यानंतर ते भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात समांतर शासन स्थापन करून शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळही उभी केली. […]
प्रसिद्ध परंतु अल्पायुषी नॉर्वेजिअन गणितज्ञ नील्स हेन्रिक आबेल (१८०२-२९) यांच्या नावाने एक पारितोषिक, २००३ सालापासून दरवर्षी आहे. एका अर्थाने हे पारितोषिक गणिती जीवनगौरव या स्वरूपाचे असून त्या विजेत्याचे एकूण कार्य विचारात घेते, न की एखादे प्रमेय, सिद्धांत किंवा प्रश्न सोडवण्याची पद्धत. पदक आणि ७५ लक्ष नॉर्वेजिअन क्रोनर्स (सुमारे भारतीय रुपये ६,४८,००,०००) असे या पारितोषिकाचे स्वरूप असून, नॉर्वे सरकारच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली जाते. […]
जॅकी चॅन म्हणजेच चॅन कॉग-संग याचा जन्म ७ एप्रिल १९५४ रोजी हॉगकॉग येथील व्हिक्टोरिया पिक विभागात झाला. त्याच्या वडिलांचे नाव चार्ल्स आणि आईचे ली-ली-चॅन . जॅकी चॅन चे टोपण नाव होते ‘ पाओ-पाओ ‘ म्हणजे ‘ कॅनॉनबॉल . तो लहानपणापासून अत्यंत उत्साही होता. त्याने लहानपणी शालेय शिक्षणात फार प्रगती केली नाही. […]
जागतिक तापमानवाढीचा महाराक्षस समोर उभा ठाकल्यावर माणसाला जाग आली आणि जगभर हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. हल्ली बाजारात आलेली विद्युत ऊर्जेवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने हा त्या प्रयत्नांचाच एक भाग होय. पण, हे आता जमिनीवरील वाहनांपुरते मर्यादित राहिले नाहीये, तर जहाजे आणि विमानेसुद्धा विद्युत ऊर्जेवर चालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जहाजांच्या बाबतीतील या प्रयत्नांचा आढावा घेणारा हा लेख… […]
नीलम संजीव रेड्डी आणीबाणीत पुन्हा सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाले. जनता पक्षातर्फे ते निवडून आले. राष्ट्रपतिपदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रपतिपदाची शान त्यांनी पक्षांतर्गत विरोध सहन करून सांभाळली. […]
मोरया आता गोसावी झाले. गो म्हणजे इन्द्रिये; त्यावर ताबा मिळवणारे गोस्वामी म्हणजे जितेंद्रिय योगी. त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या. मोरगावला परतल्यावर त्यांचा दबदबा फार वाढला. अष्टौप्रहर लोक त्यांच्याकडे येऊ लागले. रंजल्या, गांजल्यांच्या अडीअडचणी दूर करताना त्यांना दिवसाचे चोवस तास पुरेनासे झाले. शेवटी वैतागून त्यांनी मोरगाव सोडले. […]
घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफि बनवायची!
भजनी मंडळाच्या वेळी मात्र छान दाट, ताजी वेलची , जायफळ पावडर घालून, खास कॅाफी बनवली जायची! मला ती गोड कॅाफी आवडायची, आणि जास्ती ती उकळत असतांनाचा वास आवडायचा!.. इतकंच माझं कॅाफी बद्दल प्रेम आणि ज्ञान !
जेव्हा कॅाफी बाटल्यातून, छोट्या साशा तून मिळायला लागली तेव्हा ब्रू,टाटा,नेस कॅफी अशी त्यांची नांवे कळायला लागली. […]