नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

गुपचूप रद्द झालेली ५० रुपयांची नोट !

५०० व १००० च्या नोटा नुकत्याच रद्द झाल्या आणि मराठी भाषेला, विमुद्रीकरण–चलनबंदी– नोटबंदी — मुद्राबंदी इ. अनेक शब्द आणि ” वैचारिक वाद” लाभले. अनेक वृत्तपत्रे आजसुद्धा फक्त याच विषयावरच्या ” हेडलाईन्स” छापतायत. पण काही वर्षांपूर्वी भारतीय चलनातील ५० रुपयाची एक नोट चलनातून अत्यंत गुपचूपपणे काढून घेतली गेली. त्याचीच ही “नोटकथा” ! १९७५ मध्ये श्री.एम.नरसिंहम यांच्या सहीने […]

आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मराठमोळे लिओ वराडकर

ब्रिटिशांच्या जुलमातून भारत मुक्त व्हावा यासाठी तुरुंगवास सोसलेल्या वराड (ता. मालवण) येथील वराडकर कुटुंबाचा वंश असलेले लिओ वराडकर हे आज ब्रिटनचा भाग असलेल्या आयर्लंडच्या पंतप्रधान बनले आहेत. एन्डा केनी यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर लागलेल्या निवडणुकीत लिओ यांचा मुख्य मुकाबला सीमोन कोवनी यांच्याशी झाला. ३८ वर्षीय लिओ यांचा राजकारणातील प्रवास खूप वेगवान आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. डबलीग […]

कुणकेश्वरची वालुकाशिल्पे !

कोकणातील कुणकेश्वर या अत्यंत सुंदर मंदिर परिसरात फिरण्याचा नुकताच योग्य आला. स्वच्छ समुद्र व हिरवागार निसर्ग यांच्या कोंदणामध्ये आपल्या भव्य मंदिरात वसलेला देव श्री कुणकेश्वर ! येथून अगदी जवळच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे खूप छान पर्यटक निवास आहे. कुणकेश्वर मंदिराच्या मागील किनाऱ्यावर एक वैशिष्ठ्य पाहायला मिळाले. देवळाच्या तटबंदीपर्यंत समुद्राच्या लाटा येऊन नंतर ओहोटी लागते. तेव्हा तेथील वाळूमध्ये […]

अरवलीचो वेतोबा !

बऱ्याचवेळा मित्रांकडून ऐकलेले हे एका जागृत देवाचे मंदिर पाहण्याचा मला योग आला. हे देऊळ वेंगुर्ल्यामधील शिरोडा येथे आहे. वि. स.खांडेकर शिरोड्याचे तर क्रिकेट विक्रमादित्य सुनील गावस्कर, साहित्यिक जयवंत दळवी, लालजी देसाई हे अरवलीचे आहेत. सर्व वाईट शक्तींवर वचक ठेवणारा शक्तिवान देव म्हणजे वेतोबा ! प्रशस्त मंदिर आणि गंभीर पण तितकेच देखणे असे देवाचे रूप ! हा […]

विशाळगड ते लांजा व्हाया ‘माचाळ’

घोल ते रायगड असे आम्ही चालत गेलेलो एकदा. तेव्हाचं सगळं सांगून झालाय. पानशेतच्या पुढे पानशेतचा जलाशय शेजारी ठेवून २८ किमी वर ते घोल नावाचं गाव आहे. तिथून पुढे सह्याद्री उतरत जायचं आणि मग पायथ्याला गेलो कि तिथून दहा-बारा किलोमीटर वर रायगड आहे. असा एकूण वीस-पंचवीस किमीचा रस्ता असेल. पुण्यातून जाणारी एसटी घोलमध्ये संध्याकाळी साडेसात नंतर पोहोचते. […]

वालावलचा लक्ष्मीनारायण !

कुडाळ जवळील वालावल हे देखील निसर्गाने गर्द हिरव्या झाडीने झाकलेले असेच एक छान गाव ! येथील लक्ष्मीनारायणाचे देऊळ म्हणजे डोंगर, माड , तलाव , कलात्मक दीपमाळा अशा सर्व संपत्तीने सजलेले प्रशस्त देवस्थान आहे ! बहामनी सत्तेने आत्यंतिक धार्मिक छळ सुरु केल्यावर, गोव्यातील हरमळ येथून ही मूर्ती वालावल येथे आणण्यात आली, असेही म्हटले जाते. लक्ष्मीनारायणाची मूर्ती म्हटले […]

घोल (पानशेत) ते कोकणदिवा … पुन्हा चालतच..

पानशेत धरणाचं बॅंकवॉटर जिथे संपतं तिथून साधारण तीन-चार किलोमीटर वर एक अतिशय अवघड घाट आहे. पानशेतनी खरच तळ गाठला होता. कोरडं जलाशयाच पात्र खरच आघात करणारं आहे. पण या प्रचंड जलाशयाचा ज्या झऱ्यातून उगम होतो, त्या झऱ्यावर एक छोटासा पूल आहे. तो पार करून पुढे गेल्यावर घाट सुरु होतो. सततच्या उल्लेखांमुळे वरंध किंवा ताम्हिणी हे खूप अवघड […]

गूढ रम्य, निसर्गरम्य — मालवणजवळचा धामापूर तलाव !

या तलावाच्या परिसरात विलक्षण शांत निसर्ग पसरलेला आहे. तेथे या तलावाबाबत काही गूढ आख्यायिका आहेत. पूर्वी येथील देवीला प्रार्थना केली की एखाद्या गरीब मुलीच्या विवाहासाठी, तलावातून दागिन्यांची परडी वर येत असे. लग्न झाले की हे दागिने परडीत भरून पुन्हा तळ्यात सोडून दिले जात. पण कुणालातरी दागिने परत न करण्याचा मोह झाला आणि नंतर हे दागिने येणे […]

पानशेत ते रायगड (चालत)

भव्य हिमालय तुमचा, आमचा केवळ सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजीन रायगडा!! ही कविता बहुतेक वसंत बापटांची आहे. आणि वैयक्तिक मला हिमालयाचं आकर्षण मुळीच नाही. अनेक ट्रेकर्स ‘एव्हरेस्ट’ सर करणं हे आपलं स्वप्न मानतात, माझी मात्र उडी सह्याद्रीच्या पुढे पडणार नाही. ‘ट्रेकिंग’चे सर्वच अनुभव खूप समृद्ध करणारे असतात. असच दोन एप्रिल महिन्यातच आम्ही ४-५ जणं […]

मराठी की मरींदी ?

२७ फेब्रुवारी म्हणजे मराठी राजमाषा दिन ! सध्याच्या मराठी भाषेच्या स्थितीबद्दल मी लिहिलेला एक छोटा लेख दैनिक नवाकाळ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा लेख आपल्याला पाठवीत आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे. आपल्याला महाराष्ट्रातच ” मराठी राजभाषा दिन” साजरा करावा लागतो हेच आधी मोठे दुर्दैव आहे. भाषावार प्रांत रचनेनंतर प्रत्येक राज्यात राज्यभाषेतून सर्व व्यवहार होऊ लागले. […]

1 208 209 210 211 212 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..