आपल्याला सगळ्यांना माहित आहे की, परमवीर चक्र हा भारतातला सर्वात मोठा सैनिकी शौर्यपुरस्कार आहे – अगदी ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ अथवा अमेरिकेच्या ‘मेडल ऑफ ऑनर’ च्या बरोबरीचा – जो सैनिकांना युद्धातील अतुलनीय शौर्याबद्दल दिला जातो. १९४७ पासून २१ वीरांना परमवीर चक्र मिळालेले असून त्यापैकी १४ जणांना ते मरणोत्तर मिळाले आहे. परमवीर चक्र पदक ३.४९ सेंटीमीटर व्यासाचे ब्राँझचे […]
शिवरायांनी एक पुल बांधला होता माहिती आहे का..????? प्रतापगडाच्या पायथ्याशी “पार्वतीपुर” नावाचे एक गाव आहे नंतर त्यांचे “पार”असे नाव पडले. पार गावाजवळ शिवरायांनी एक पुल बांधून घेतला होता,त्याच खणखणीत नि योजनापूर्व केलेले बांधकाम अजूनही शाबूत आहे. ८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा. कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ […]
लोथलचा काळ आहे इ.स.पूर्व २४०० ते इ.स.पू. १९०० असा. लोथल हे आजच्या गुजरातमधील अहमदाबाद जिल्यामधे धोलका तालुक्यात आहे. ते खंभातच्या आखातापासून जवळ आहे. भारतात आणि जगात आज अनेक मोठमोठी बंदरे आहेत. पण लोथल येथें जगातील सर्वात जुना डॉक (गोदी) आहे, आणि तो आजपासून ४४०० वर्षांपूर्वीचा आहे ! […]
मुंबईची हार्बर रेल्वे लाईन पश्चिम व मध्य रेल्वेवर राहणाऱ्या मुंबईच्या पांढरपेशा समाजाच्या दृष्टिनं काहीशी दुर्लक्षितच..या हार्बर लाईन मुळे आपल्याला दाना-पाण्याची रसद मिळत असते याची जाणीव फार थोड्या मुंबईकरांना असते. अशा या हार्बर रेल्वे लाईनवरचं ‘कॉटन ग्रीन’ हे एक सर्वसाधारण रेल्वे स्टेशन. या स्टेशनात काही खास आहे याची जाणीव न होणारं..अशा या ‘कॉटन ग्रीन रेलवे स्टेशन’ या […]
एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी जगप्रसिध्द शास्त्रज्ञ व आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी जगाचा निरोप घेतला. माझ्या या अभिमानास्पद मित्राला अंत:करणापासून श्रध्दांजली. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे विशाल सभागृह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने ओसंडून वाहत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम मंचावर येऊन उभे राहिले आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून अख्खे सभागृह डोक्यावर घेतले. वातावरण चैतन्याने […]
माझे मित्र श्री. आमोद डांगे यांनी, ‘हिन्दी ही आपली राष्ट्रभाषा आहे का?’ हा प्रश्न मला विचारला आणि मला लिखाणाला एक विषय मिळाला. माझ्या इतरही अनेक मित्रांना वस्तुस्थितीची माहिती असावी म्हणून मी हा लेख लिहीत आहे. भारताच्या राज्य घटनेमध्ये कुठल्याही एका भाषेचा उल्लेख ’राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही. उलट घटनेच्या शेड्यूल-८ मधे उल्लेख केलेल्या सर्वच भाषा (१४ किंवा […]
मुंबईत अजुनही तग धरून असलेल्या ब्रिटीशकालीन ‘माईलस्टोन्स’ची माहिती माझ्या वाचनात आली आणि त्यांचा शोध घेण्यास मी सुरुवात केली. माईलस्टोन्सचा माग काढता काढता अचानक ‘मुंबईच्या किल्ल्या’बद्दल वाचनात आलं आणि मी थेट प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहोचलो. दरम्यान माईलस्टोन्स मागे पाडले. आता मला माझ्या वाचनातून सापडलेल्या व मी पाहिलेल्या त्यापैकी काही माईलस्टोन्स बद्दल माहिती इथे देत आहे. मुंबईत असे एकूण […]
आज बारा जुलै : पानशेत धरण फुटीच्या आधीचे अर्थात बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ पूर्वीचे पुणे ! पुणे येथील पानशेत धरण फुटलेल्या घटनेला आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली ! बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ, त्यादिवशी दिव्याची आवस होती ! एवढा काळ लोटला, तरीही माझ्यासारख्या जुन्या पुणेकरांच्या मनात पानशेत धरणफुटीच्या त्या भयानक आठवणी अजुनीही विस्मुतीमध्ये […]
मानव हा पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राणी आहे. तो सतत नवेनवे शोध लावत असतो. या शोधांचं कारण म्हणजे मानवाची गरज दिवसेंदिवस वाढत गेली. असं म्हणतात की गरज ही शोधांची जननी आहे. पण जगातल्या अनेक शोधांचा उगम माणसाने केलेल्या चुकांमधून किवा अपघातातून झालेला आहे. अमेरिकेतील दोन भावांच्या विसराळूपणामधूनच शोध लागला फ्लेक्स या खाद्यपदार्थाचा. सकाळी उठल्यानंतर आपली सर्वात पहिली […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा यशस्वी दौरा भारताची आर्थिक, संरक्षण चौकट मजबुत करण्यासाठी उपयुक्त…. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५-१० जुनच्या पाच देशांच्या दौर्यामागे मुख्य उद्देश होता तो अणू पुरवठादार गटामध्ये (न्युक्लिअर सब्स्क्रायबर्स ग्रुप किंवा एनएसजी) भारताला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यातील सदस्य देशांचा पाठिंबा मिळविण्याचा. पाचपैकी तीन देश एनएसजीचे सदस्य आहेत.मोदी यांनी अफगाणिस्तान, कतार,स्वित्झर्लंड,अमेरिका,मेक्सिको या 5 […]