शाळा सुरू असताना अनेक सहशालेय उपक्रम घेतले जातात. स्नेहसंमेलन, परिसर भेट, चावडी वाचन अशा काही उपक्रमाचा प्रामुख्याने त्यामध्ये समावेश असतो.स्पर्धा परीक्षा, रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा , संगीत खुर्ची,जिलेबी रेस, विविध खेळ या उपक्रमामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते . सहल हा भौगोलिक आणि ऐतिहासिक माहीतीसाठी उत्तम प्रकार आहे. गड-किल्ले पाहणे, धरण, […]
महिला दिनाच्या शुभेच्छा देतांना महिलांच्याच एका प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधून घ्यावं असं वाटत.. आंतरराष्ट्रीय महिला दिन व महिला पोलिस काॅन्स्टेबल्स/सुरक्षा रक्षकांचा गणवेश.. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने माझ्या मनात बरीच वर्ष रेंगाळणारा एक प्रश्न आपल्यासमोर ठेवतो. मुळात हा प्रश्न आहे की नाही हे मला नीट्सं कळत नाही, तरी त्यामुळे मी अस्वस्थ होतो हे खरं..! हा प्रश्न आहे […]
९ मार्च १९५९ हा बार्बीचा जन्मदिन! आज बार्बी डॉल अठ्ठावन्न वर्षाची झाली. लहान माझी बाहुली, मोठी तिची साऊली घारे डोळे फिरवीते, लुकूलुकू ही पाहाते नकटे नाक उडवीते, गुबरे गाल फुगवीते कविवर्य दत्तांची ही कविता वाचताना त्यांनी बार्बीला पाहिले होते का, असा प्रश्न पडतो. त्यांनी बार्बीला पाहिले असण्याची शक्यता नाही. बार्बीला ज्यांनी जन्माला घातले त्यांनी दत्तांची ही […]
३ मार्च १९७२ हा दिवस…. बॉम्बे टू गोवा या चित्रपटाला चित्रपटगृहात लागून ४५ वर्षे पूर्ण झाली. एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं […]
१०४ उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची अफाट कामगिरी केल्याबद्दल इस्रो च्या शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तितके कमी आहे. इस्रो असू दे किंवा डी आर डी ओ यात काम करणारी शास्त्रज्ञ मंडळी म्हणजे आधुनिक ऋषी आहेत आणि सुदैवाने आजपर्यंतच्या सरकारांनी त्यांची हि स्वायतत्ता कायम राखली आहे. बहुसंख्य मंडळी दक्षिण भारतीय, बहुसंख्य मंडळी ब्राह्मण आणि अत्यंत धार्मिक. खऱ्या अर्थाने […]
आज अंगारकी चतुर्थी. मंगळवारी येणाऱ्या ‘संकष्टी’ला अंगारकी म्हणतात कारण ‘अंगारक’ हे मंगळाचे नांव आहे. ‘अंगार’ म्हणजे आग..! अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि दाहक असलेल्या मंगळाला म्हणूनच ‘अंगारक’ म्हणतात. मंगळ अग्नीप्रमाणे तांबडालाल दिसतो. इंग्रजीत मंगळाला Military Planet म्हणतात. ज्योतीषशास्त्रानुसार तो उग्र व विनाशक प्रवृत्तीचा पापग्रह मानला जातो, मग गणपती सारख्या शुभ देवतेचा मंगळासारख्या पापग्रहाशी आजच्या दिवशी येणारा संबंध येवढा […]
इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या जगाला एका कुटुंबाप्रमाणे बनवण्याचे श्रेय जाते ते फेसबुकला. या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणा-यांची संख्या १८० कोटींहून अधिक असल्याने फेसुबक म्हणजे १८० कोटींहून अधिक लोकांचे एक कुटुंबच बनले आहे. आज ४ फेब्रुवारी रोजी या सोशल नेटवर्किंग साइटला १३ वर्षे पूर्ण होत असताना फेसबुक […]
आपला देशातून जगातील इतर कोणत्याही देशांत जाण्यासाठी पासपोर्ट अनिवार्य आहे. पासपोर्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सरकार कडून नागरिकाला प्रदान केले गेलेले अधिकृत प्रमाणपत्र. नागरिकत्वाचा हा एक सबळ पुरावा असतो. त्यामुळे परदेशात जाताना पासपोर्ट व त्या देशाचा व्हिसा अत्यावश्यएक असतो. अमेरिका आणि युरोपमधील देशांचे व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष जाण्याच्या दिवसांपूर्वी काही महिने आधी सुरू करावी लागते. पासपोर्टमध्ये तुमच्या […]
मराठी दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला २२ जानेवारी रोजी २८५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने शनिवारवाडय़ाची माहिती. पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी माघ शुद्ध तृतीया या तिथीला (शके १६५१) म्हणजेच १० जानेवारी १७३० रोजी भूमिपूजन करून शनिवारवाडय़ाच्या बांधकामाचा प्रारंभ केला. त्या दिवशी शनिवार होता. पहिल्या टप्प्याचे […]
नमस्कार. मी या शहरातील अत्यंत रहदारीच्या रस्त्यांनी घेरलेल्या प्रमुख चौकातील एक पुतळा. जिवंत असताना या देशातील जनतेच्या म्हणण्यानुसार मी खरंच महापुरुष होतो की नाही हे मला माहित नाही, पण आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दीनदुबळ्यांना त्यांच्या अमानवीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो. या कामाचा अवाका इतका मोठा होता की, मी जिवंत असेपर्यंत हे काम संपू शकण्यासारखं […]