२६ नोव्हेंबर, २००८ रोजी अतिरेक्यांच्या हल्ल्यात माझा जिवलग मित्र हेमंत करकरे शहीद झाला. दरवर्षी आजच्या दिवशी माझ्या जखमेवरची खपली निघून भावना भळाभळा वाहू लागतात. प्रिय हेमंत मी वर्गात शिरलो तेव्हा एका बेंचाच्या कोपऱ्यात स्वत:च्या अत्यंत कृश शरीराचं मुटकुळं करून खाली मान घालून तो बसला होता. कुपोषित बालक हा शब्द तेव्हा अस्तित्वात नसला तरी आज जाणवतं की […]
डीमॉनेटायझेशन नंतरचा जनतेचा बुद्धिभेद करण्याचा माध्यमांचा व राजकारण्यांचा प्रयत्न; विजय मल्ल्यांची कर्जमाफी.. कालपासून स्टेट बॅंकेने विजय मल्ल्यांचं ७ हजार कोटींचं कर्ज माफ केल्याची पोस्ट सगळीकडे फिरत आहे..हे कुणीतरी अज्ञानातून अथवा जाणून बुजून जनतेचा बुद्धीभेद करावा यासाठी करतंय अशी दाट शंका येते आणि लोकही किंचितसाही विचार न करता अशा पोस्टवर चर्चा करत बसतात व पुढे पुढे पाठवत […]
महागाईचा दर आणि चलनाचे मूल्य या दोन गोष्टींचे परिणाम नेहमीच सामाजिक आणि आर्थिक असतात . त्यांची कारणे मात्र अनेकदा राजकीय असतात . त्यामुळे त्याबाबतची उपाययोजना ही बहुतेकदा राजकीयच असावी लागते . या मालिकेतील अस्खलित उदाहरण म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून ५०० आणि १००० रुपयांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या चलनी नोटा रद्द करण्याचा आपले पंतप्रधान नरेंद्र […]
हा पत्ता रोज या ठिकाणाहून जा-ये करणार्यालाही लक्षात येणार नाही. पण ‘ र्हिदम हाऊस’ म्हटलं की चटकन, ‘च्यायला हा ऱ्हिदम हाऊसचा पत्ताय होय’ असे उद्गार ऐकू येतील..! […]
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ५०० व २००० च्या नोटा का चालू ठेवल्या असाव्यात? मला वाटणारे एक कारण. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे सर्वच थरातून स्वागत होत आहे. विशेषतः सामन्यांसाठी हा निर्णय अतिशय योग्य असल्याच्या प्रतिक्रिया मुंबईतल्या ट्रेन मध्ये, रस्त्यावर फिरताना प्रवासी, रिक्षा-टॅक्सीवाले, किरकोळ भाजी विक्रेते […]
२९ ऑक्टोबर हा ‘जागतिक इंटरनेट दिवस’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. भारतात १९९५ च्या सुमारास इंटरनेट उपलब्ध झालं असलं, तरी त्यापूर्वी कित्येक दशके अमेरिकेत आणि काही युरोपियन देशांमध्येही त्यासंबंधीचं संशोधन जोमानं चाललेलं होतं. २९ ऑक्टोबर १९६९ रोजी. सुमारे ४७ वर्षांपूर्वीचं हे १९६९ वर्ष विज्ञानाच्या दृष्टीनं एकूणच क्रांतिकारी होतं. २१ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर पाऊल […]
चायनीज अन्न (?)पदार्थ : विषारी चीनी ड्रैगनची भारतीय मनाला पडलेली भयानक भुरळ … हा लेख लिहायचा खरं तर काही वर्षांपासून माझ्या मनांत होतं …पण व्यवस्थित माहिती संकलित झाल्याशिवाय लिहणे अशक्य होते … चायनीज पदार्थांच्या विषारी गुणधर्माची ओळख झाली ती एका किडनी फेल झालेल्या रुग्णाचा अभ्यास करताना … डायलिसीस साठी दवाखान्याच्या चकरा मारणारा हा रुग्ण वयाने तरुण, […]
१६६१ सालात मुंबईत आलेल्या ब्रिटिशाना सार्वजनिक जीवनात करमणुकीची सोय नव्हती. त्यांना अशा सोयी करण्याची फुरसतही मिळाली नव्हती. इस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी असल्याने त्यांची व्यापाराची घडी बसवण्याची प्राथमिकता होती आणि करमणूक ही दुय्यम स्थानी होती. ब्रिटीश लोक हे पक्के व्यापारी आणि एकांतप्रिय म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत मात्र समान पातळीवरच्या लोकांनी विचार विनिमय करावा आणि त्यातून व्यापार […]
मुंबईची महालक्ष्मी. तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. नवरात्रात महालक्ष्मीचा सोहळा अप्रतिम असतो आणि तो याची देह, याची डोळा बघण्यासाठी तमाम मुंबईकर मोठ्या भक्तिभावाने महालक्ष्मीच्या देवळात हजेरी लावतात.. मुंबईतील महालक्ष्मीचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे तो सारा परिसराच गर्भश्रीमंत ‘लक्ष्मीपुत्रां’ आणि ‘लक्ष्मीकन्यां’चाही..देवळाच्या समोरच पेडर रोडवर ‘प्रभुकुंज’ मध्ये देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मीच्या सारख्याच लाडक्या कन्या मंगेशकर भगिनी बंधू पंडित […]