आपल्या सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याला अंत:करणापासून सलाम करण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईकवर किळसवाणं राजकारण करणाऱ्या कर्मदरिद्री राजकीय पक्षांच्या वर्तणुकीने व्यथित होऊन तीन वर्षांपूर्वी लिहिलेला हा माझा लेख आपल्या जांबाज सैनिकांना अर्पण करतो. शक्य असल्यास शेअर करून अनेकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद ! […]
मोबाईल सोबत नसताना तुम्ही अस्वस्थ होतात का? आपल्या घरात काय चाललंय यापेक्षा ऑनलाइन विश्वात काय चाललंय याबद्दल तुम्हाला अधिक रस वाटतो का? सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वप्रथम फोन हातात घेऊन त्याचा मोबईल डेटा चालू करतात का?ऑनलाइन बोलणे तुम्हाला आनंदाचा आभास देते का? कुणी तुमच्याशी ऑनलाइन बोलत असताना पलीकडून पटकन reply आला नाही किंवा कोणी ऑनलाइन भेटले नाही […]
इतिहास – समृध्दी आणणाऱ्या आपल्या धरणांचा – भंडारदरा धरण, अकोले अहमदनगर….. शेंडी गावाच्या उशाशी उभ्या असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीना जोडल्या गेल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यागिरीच्या कुशीत विसावला… अन भंडारदरा धरणाचा जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर धो- धो कोसळणा-या पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात घेत आहे. […]
मुंबईच्या राजभवनात अत्यंत सुस्थितीतला ब्रिटिशकालीन बंकर सापडल्याच्या बातम्यांनी काही दिवसांपूर्वीची वर्तमानपत्रं भरून गेली होती. केवळ राज्यपालांचं कुतूहल जागृत झाल्याने हा बंकर उजेडात आला अन्यथा इथे एवढा अनमोल खजाना दडलाय हे कोणाच्याच लक्षात आलं नसतं. या अगोदर तिथे मुक्काम केलेल्या अनेक राज्यपालांच्या तरी हे कुठे लक्षात आलं होतं.? ‘हे असं का?’ हा स्वत:ला पडलेला कुतूहलमिश्रित प्रश्न जगातील […]
महाडच्या दुर्घटनेचा दोष निसर्गावर टाकून आणि ‘मृतात्म्यां’ची एक ‘सरकारी किम्मत’ ठरवून सरकारी बगळे सावित्रीच्या पुरात मृतांच्या नावाने आंघोळ करून मोकळे झाले. पुलाच्या दुरुस्तीवर पैसे खर्च करण्यापेक्षा जे काही लोक अपघातात मरतात त्यांची अशी ‘किम्मत’ देणं एकदम स्वस्त पडत असावं बहुदा..! शिवाय पुलाच्या दुरूस्तीत यांना असा काय तो मलीदा मिळणार असा विचार त्यांनी केला असणेही सहज शक्य […]
मुंबईच्या इतिहासासंबंधीत किंवा इतरही जुनी पुस्तकं वाचताना फोर्ट मधील ‘एस्प्लनेड मैदान’ हा शब्द बर्याच वेळा भेटायचा.. फोर्टमधील एस्प्लनेड मैदान म्हणजे नक्की कोणतं, हा माझा गोंधळ नेहेमी व्हायचा..पुढे मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात आलं, की ‘एस्प्लनेड मैदान’ म्हणजे कोणतंही एक मैदान नसून कुलाबा-नरिमन पॉईंटच्या फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या कुपरेज मैदानापासून ते सीएसटी-मेट्रो नजीकच्या आझाद मैदान-क्रॉस मैदानापर्यंतचा पसरलेला सपाट […]
‘भायखळा’ ही जागा म्हणजे धान्याचे खळे होते आणि त्याच्या मालकाचे नाव होते ‘भाया’. ‘भाया’चे खळे ते ‘भायखळे’ आणि त्याचा झाला ‘भायखळा’ ही कथा अनेकदा व्हाट्सअॅपवर वाचण्यात आली. आपणही वाचली असेल.. जुन्या मुंबईचे उपलब्ध असलेले फोटो पाहिले की त्यात वरवर तरी तथ्य असल्याचंही लक्षात येतं.. परंतु का कोण जाणे, माझं मन अद्यापही ही व्युत्पत्ती स्विकारायला त्याच्या मनापासून […]
आपल्याला सगळ्यांना माहित आहे की, परमवीर चक्र हा भारतातला सर्वात मोठा सैनिकी शौर्यपुरस्कार आहे – अगदी ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ अथवा अमेरिकेच्या ‘मेडल ऑफ ऑनर’ च्या बरोबरीचा – जो सैनिकांना युद्धातील अतुलनीय शौर्याबद्दल दिला जातो. १९४७ पासून २१ वीरांना परमवीर चक्र मिळालेले असून त्यापैकी १४ जणांना ते मरणोत्तर मिळाले आहे. परमवीर चक्र पदक ३.४९ सेंटीमीटर व्यासाचे ब्राँझचे […]
शिवरायांनी एक पुल बांधला होता माहिती आहे का..????? प्रतापगडाच्या पायथ्याशी “पार्वतीपुर” नावाचे एक गाव आहे नंतर त्यांचे “पार”असे नाव पडले. पार गावाजवळ शिवरायांनी एक पुल बांधून घेतला होता,त्याच खणखणीत नि योजनापूर्व केलेले बांधकाम अजूनही शाबूत आहे. ८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा. कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ […]
लोथलचा काळ आहे इ.स.पूर्व २४०० ते इ.स.पू. १९०० असा. लोथल हे आजच्या गुजरातमधील अहमदाबाद जिल्यामधे धोलका तालुक्यात आहे. ते खंभातच्या आखातापासून जवळ आहे. भारतात आणि जगात आज अनेक मोठमोठी बंदरे आहेत. पण लोथल येथें जगातील सर्वात जुना डॉक (गोदी) आहे, आणि तो आजपासून ४४०० वर्षांपूर्वीचा आहे ! […]