संगणकाचा जमाना जुना होऊन आता मोबाईलचा जमाना आलाय. सहाजिकच आहे. हातात आणि खिशात मावणार्या मोबाईलवरुन संगणकाची सगळी कामं होऊ लागली तर संगणक हवाय कशाला? बरं पुन्हा आपली क्रयशक्ती म्हणजेच खर्च करण्याची कुवत वाढल्यामुळे भारतीयांमध्येही आता “वापरा आणि फेकून द्या” ही वृत्ती रुजायला लागलेय. दर महिन्याला मोबाईलच्या नवनव्या मॉडेलच्या जाहिरातींनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरलेले असतात. “ए” पासुन […]
बुधाचे निरीक्षण बुध ग्रह सूर्यास्तानंतर संध्याकाळी काही वेळ पश्चिम क्षितीजाजवळ दिसतो तर काही महिन्यात हाच बुध ग्रह पूर्व क्षितीजावर पहाटे सूर्योदयापूर्वी दिसतो. बुध हा सूर्यापासून पहिलाच ग्रह आहे. त्यामुळे त्याचे सूर्यापासूनचे अंतर कमी आहे. परिणामी बुध ग्रह सूर्याची पाठ कधीच सोडत नाही. विशिष्ट कालावधीत, सायंकाळी किंवा पहाटे आणि क्षितीजालगत बुध दर्शन होत असल्यामुळे बुध शोधणे म्हटल. […]
भारतातील जमिनींची मोजणी १० एप्रिल १८०२ रोजी सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील. गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले? त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटीश अधिकारी होता. त्याने ३३ गुणिले ३३ अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. […]
कावळ्याचा रंग कोणता ? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर प्रश्न विचारणाऱ्याकडे आपण नक्कीच प्रश्नार्थक नजरेने पाहू… ‘काळा’ रंग असे उत्तर देऊन मोकळे होवू.. कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो. पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे. अनेकाविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, […]
माझं काही कामानिमित्त फोर्ट-चर्चगेट परिसरात जाणं होतं..हा परिसरच मुळी माझ्यावर गारूड करतो..सीएसटी पासून रमत गमत चालत निघायचं, ते सरळ काळ्या घोड्यापर्यंत. तिथून पुढे रिगलच्या दारात असलेल्या विलिंग्डन फाऊंटनला वळसा घालून, सायन्स इन्स्टिट्यूट उजव्या हाताला ठेवून, पुढे त्याच रस्त्याने पुढे उजव्या बाजूचा वळसा घेऊन युनिव्हर्सिटी, हायकोर्टाची मागली बाजू धरून चर्चगेटला यायचं आणि मग लोकलने घराच्या दिशेने.. कित्येकदा […]
सोळाव्या शतकाच्या प्रारंभी मुंबईच्या इतिहासाच्या रंगमंचावर पोर्तुगीजांचा प्रवेश झाला आणि मुंबई खऱ्या अर्थाने जागतिक नकाशावर उगम पावायला सुरूवात झाली. शेवटचा गुजराथी सुलतान बहादूरशहा याने उत्तरेकडून मोगलांचे दडपण व दक्षिणेत वाढणारे पोर्तुगीजांचे आक्रमक सामर्थ्य या पेचातून अंशत: मोकळे होण्यासाठी सोळाव्या शतकाच्या मध्यावर मुंबई आणि वसई ही दोन समुद्राकाठची ठिकाणे पोर्तुगीजांच्या हवाली केली. सन १५३४ साली मुंबई पोर्तुगीजांच्या […]
मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला ‘फोर्ट’ एरिया ज्याने पाहिला नाही त्यानं मुंबई पाहिली नाही असं म्हणायला हरकत नाही..किंबहूना, मुंबई हे संबोधन मुख्यत्वेकरून याच विभागाला लागू होतं असं म्हटलं तरी चुकणार नाही..फोर्टातले ते प्रशस्त रस्ते आणि फुटपाथ, त्या ब्रिटीशकालीन भव्य आणि देखण्या इमारती, प्रत्येक इमारतीला असलेला घाटदार घुमट वा उंचं मनोरा याची भुरळ न पडणारा विरळाच..! हा सारा […]
उतार वयात ‘काहीतरी आगळे वेगळे’ करण्याचे धाडस करणे म्हणजे एकप्रकारचा मूर्खपणाच असे अनेकांचे मत असते. माझे वय 70 रनींग तर माझ्या सौभाग्यवती अपर्णाचे वय रनींग 64. हे वय खरे म्हणजे आराम करण्याचे, तब्येतीची काळजी घेण्याचे, हरि हरि म्हणत स्वस्थ बसण्याचे. अशा वेळी थायलंडमध्ये बॉंकॉक येथे जाऊन 3 आठवड्यांचा ‘इंग्रजी कसे शिकवायचे’ या सारखा एक कोर्स अटेन्ड […]
प्रास्ताविक : माझें शैशव गेलें महाराष्ट्रातल्या ‘देशा’वर (घाटावर) , आणि त्यानंतर मी होतो शिक्षणासाठी मध्य प्रदेश व बंगालमधें. (इथें, ‘देशावर’ म्हणजे, कोकणवासी ज्याला घाटावर म्हणतात, तो महाराष्ट्राचा पठारावरील प्रदेश. ‘देश’ म्हणजे भारतदेश ही संकल्पना इथें अभिप्रेत नाहीं). त्या काळात मला ‘आगर’ हा शब्द’ भेटला संस्कृत शिकतांना आणि मराठी भाषेत एक तत्सम शब्द म्हणून. सुप्रसिद्ध समाजसुधारक आगरकर […]