एखादी गोष्ट आंतरजालावरून विकत घेतल्यानंतर सतत संगणकावर येणाऱ्या जाहिराती आणि आपल्या भ्रमणध्वनीवर सतत येणारे संदेश पाहून आपल्याला प्रश्न पडतो की, मला काय हवे आहे, हे या लोकांना कसे कळते? याच प्रश्नाची एक उकल पाहणार आहोत आपण या लेखामध्ये… […]
२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. […]
काव्यमय भाषेमुळे तिचे गद्य लेखनही पद्यमय झाले. तिची कादंबरी हीच एक कविता बनली. त्यामुळे साहजिकच तिला १९९३ मध्ये साहित्यविषयक नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. टोनी मारिसन हे तिचे नाव. […]
भारत सरकारने आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल करून स्वातंत्र्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी मागितलेले पसायदान देण्याची मानसिक आणि कायदेशीर तयारी सुरू केलेली आहे असे मला वाटते. ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे नागरीकांनी भारत सरकार कडून पूर्ण करून घेण्याच्या नागरी आधिकारांची आणि सुविधांची शॉर्टलिस्टच आहे. […]
गणपती संदर्भात वेगवेगळे चित्रपट आले असतील परंतु अष्टविनायक गणपतींचा संदर्भ असलेला तोपर्यंत एकही चित्रपट नव्हता आणि आता असे म्हणावे लागेल आणि अजूनतरी या विषयासंदर्भात कोणी चित्रपट निर्माण केलेला नाही. हे ‘अष्टविनायक’ चित्रपटाचे वेगळेपण म्हणता येईल. […]
आजच्या दिवशी पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांची आठवण आलीच पाहिजे…स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी पंजाबमधील पतियाळा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवंद्र शर्मा तर आईचे नाव तृप्ती शर्मा असे आहे. राकेश शर्मा यांचा जन्म झाल्यावर त्यांचे आईवडील आंध्र प्रदेश येथील हैद्राबाद शहरामध्ये रहाण्यास गेले. […]
संगणकाचे हार्डवेअर म्हणजे संगणकाचे विविध भाग. हे विविध भाग संगणकाचे अवयवच असतात. मानवी शरीराच्या अवयवांप्रमाणेच संगणकाचे हे अवयव विशिष्ट कामे पार, पाडत असतात. कालानुरूप या हार्डवेअरच्या स्वरूपात बदल होत गेले असले, तरी त्यांचे कार्य तेच राहिले आहे. संगणकाची ओळख करून घ्यायची तर संगणकाच्या या हार्डवेअरची माहिती हवीच… […]
मॅरॅथॉन शर्यत ही अॅथलेटिक्समधली एक अत्यंत प्रतिष्ठेची शर्यत आहे. सुमारे बेचाळीस किलोमीटर अंतराच्या या शर्यतीत धावपटूच्या शारीरिक क्षमतेचा पूर्ण कस लागतो. साहजिकच या स्पर्धेकडे फक्त क्रीडातज्ज्ञांचंच नव्हे, तर संशोधकांचंही लक्ष असतं. गेल्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे तीन तासांत पूर्ण केली जाणारी ही शर्यत, आजचे खेळाडू ती जवळपास दोन तासांत पूर्ण करू लागले आहेत. […]
विज्ञानाची प्रगती, वैद्यकीय उपचार, लोकात आरोग्याविषयी निर्माण झालेली सजकता यामुळे आयुर्मान वाढले आहे. तथापि, वृद्धापकाळात अनेक समस्या निर्माण होत आहेत. सर्व समस्यांना तोंड देण्याची अनेकांच्या मनाची तयारी झालेली नसते. त्यांचे एक कारण म्हणजे मागच्या पिढीतील त्यांचे आईवडील एवढे जगलेले नसतात. दुसरे आपली मुले चांगली आहेत आणि ती वृद्धापकाळात आपली व्यवस्थित काळजी घेतील. या भाबड्या समजुतीत अनेक असतात. […]
नूतन भारतीय हिंदी सिनेमातील एक आघाडीची नायिका, जन्म ४ जून १९३६. वडील कुमारसेन समर्थ आणि आई शोभना समर्थ, चित्रपट कलेशी जोडलेले. वयाच्या १३ व्या वर्षी तिने ‘हमारी बेटी’ या सिनेमामधून नायिका म्हणून पदार्पण केले. विशेष म्हणजे ह्या सिनेमाची निर्मिती तिच्या आई, शोभना समर्थ यांनी खास तिच्या साठीच केली होती. तिने अभिनय केलेला ‘हम लोग’ हा सिनेमा तिला तिच्या आई वडिलांनी बघू दिला नाही. […]