लेखकाने किंवा कवीने निसर्गाचे किंवा चित्राचे तसेच पदार्थाचे सोप्या भाषेत वर्णन केले असले तरी एखाद्या अंध व्यक्तीने ती गोष्ट आपल्या डोळ्यांनी जन्मताच बघितली नसेल अनुभवली नसेल ते फिलिंग नसेल तर त्या वर्णनाचा काय अर्थ आहे? ज्या व्यक्तीला दिसत होते पण अचानक अपघातात दृष्टी गेली तर त्या व्यक्तीला दैनंदिन जीवन जगताना त्या आठवणीने किती यातना होतील? जीव किती कासावीस होईल याचा विचारच करवत नाही. पाच मिनिटे लाईट (वीज) गेले तर आपली काय अवस्था होते ते सर्वांनी अनुभवले असेल ! खेळात आंधळी कोशिंबीर खेळतांना अनुभव घेतला असेल ! […]
वलयांकित स्त्री-पुरुषांचं नीतिबाह्य वर्तन जनतेच्या लघुस्मरणामुळे व त्यांच्याबद्दलच्या लोकप्रियतेमुळे समाजाच्या पचनी पडतं. त्यांच्या मुलांच्या जीवनात फारसा अडथळा निर्माण होत नाही. पण सर्वसामान्यांनी त्यांचं अनुकरण केल्यास त्यांना कुजबुज, तुच्छतादर्शक कटाक्ष आणि तिरस्कारयुक्त वागणूक समाजाकडून मिळते. प्रथम-पत्नीचे व मुलांचे तळतळाट सुख लाभू देत नाहीत. आपल्या आवडत्या नायक-नायिकांच्या आयुष्याचा असला आदर्श समोर ठेवला तर आजची तरुण पिढी स्वैरच होईल. […]
सूर्यावर घडणार्या लहान-मोठ्या घटना पृथ्वीवर चुंबकीय वादळांसारखे परिणाम घडून आणतात. या घडामोडींचं स्वरूप विध्वंसात्मकही असू शकतं. या घडामोडींचं विश्लेषण अधिक तपशीलवार करता येण्यासाठी आपल्याकडे सूर्याचं त्रिमितीय चित्र असण्याची आवश्यकता आहे. एखादी सौरज्वाला उफाळली तर त्या सौरज्वालेचा विस्तार केवढा आहे, तिचा उफाळ किती व कोणत्या दिशेने आहे, सौरज्वालेतून किती प्रमाणात, कोणत्या दिशेने पदार्थ बाहेर उत्सर्जित केले गेले आहेत, ही सर्व माहिती अधिक वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्याला अशा त्रिमितीय चित्रावरून मिळू शकते. पृथ्वीवरील दुर्बिणींतून, तसंच अंतराळातील सोहोसारख्या यानांकडून सूर्याच्या पृष्ठभागाची छायाचित्रं सतत टिपली जात असतात. […]
जपानला 1854 साली 8.4 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यापेक्षा अधिकचा म्हणजे 8.9 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप शुक्रवार दिनांक 11 मार्च, 2011 रोजी जपानच्या वेळेप्रमाणे दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी झाला आहे. त्या वेळी भारतात सकाळचे 11 वाजून 16 मिनिटे झाली होती. पण 2004 साली सुमात्रा बेटात झालेला भूकंपही 8.9 तीव्रतेचा होता. म्हणजे तेव्हाचा सुमात्रातील भूकंप आणि आताचा जपानमधील भूकंप हे सारख्याच तीव्रतेचे होते. […]
कुणाला काेणता छंद जडेल याचा काही नियम नाही. मराठी ज्यांची मातृभाषा आहे, अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याचा छंद मला जडला. आतापर्यंत सुमारे ६० हजार आडनावे संग्रहित झाली आहेत. त्या निमित्ताने मराठी आडनावांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले. त्याचेच विवेचन या लेखात वाचावे. […]
स्वरसम्राट भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या स्वरांची भुरळ अवघ्या जगालाच घातली होती. आज सकाळी ८ वाजता पुण्यात , ८९ वर्षांच्या ह्या स्वरभास्कराचा अस्त झाला. […]
आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणावरुन राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य के. लाला यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर राज्यात मोठे प्रशासकीय फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले. वास्तविक प्रशासकीय सुधारणा ही केवळ निवड-नियुक्ती या पुरती मर्यादित बाब नाही. त्यासाठी अनेक गोष्टींचा विविध पातळ्यांवर विचार करावा लागेल. तरच हे शिवधनुष्य पेलणे शक्य होईल. […]
अलीकडे ग्राहकांची फसवणूक करण्याला वैद्यकीयक्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. डॉक्टरांकडे किवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणार्या रुग्णाची फसवणूक झाल्याच्या किवा त्याला मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अशा तक्रारींना आळा घालायचा तर त्या संदर्भात ग्राहक मंच वा विविध न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांवर नजर टाकायला हवी. […]
सध्याच्या उदारिकरणाच्या प्रक्रियेत भ्रष्टाचाराला उघड पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्याला विमान कंपनी उभी करण्यासाठी ठरावीक मंत्र्याला लाच देण्याचा सल्ला मिळाल्याचे सांगितले. उद्योगपती राहुल बजाज यांनी तर अशी लाच सर्रास दिली जाते असे सांगून आणखी एक गौप्यस्फोट केला. एकंदरित, भ्रष्टाचाराला ‘टाटा’ करण्याची कोणाचीच मानसिकता दिसत नाही. […]