गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुजबूज संपली आणि अशोक चव्हाण पायउतार झाले. त्यांचा राजीनामा घेऊन काँग्रेसने काही संकेत दिले असले तरी प्रश्न कायम आहेत. एखाद्याने गैरव्यवहार केला की हकालपट्टी होते पण भ्रष्टाचारही पचवला जातो असे चित्र उभे रहात आहे. कलमाडींबाबतही नेमके हेच घडले आहे. ताज्या बदलामुळे जनतेला क्षणभर बरे वाटेलही पण समाजाभिमुख राजकारणापासून आपण आजही कोसो दूर आहोत. […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीदरम्यान काय भूमिका घेतील याबद्दल सर्वांनाच कुतुहल होते. या दौर्यात ओबामा यांनी भारताभिमुख भूमिका घेतली तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीतील भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा देऊन त्यांनी खूष केले; परंतु जाता-जाता भारताने इराणच्या अणुकार्यक्रमाला तसेच म्यानमारमधील मानवी हक्कांच्या पायमल्लीला विरोध करावा असे सुचवून स्वत:चे हित साधले. […]
आपल्या भारत देशाला सर्वात जास्त जर, कुणी डिवचले असेल तर ते फक्त अतिरेकी कारवायांनी ! मग ह्या कारवाया दहशतवाद्यांचा असोत की नक्षलवाद्यांच्या भारताचे यामुळे फार मोठे नुकसानच झालेले आहे. भारताचे नुकसान अंतर्गत कलहाने जेवढे झाले नाही. तेवढे या कारवायांमुळे झालेले आहे. […]
दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी जोरदार मोहिम न राबवल्यास अमेरिका आपले भूदल पाकिस्तानमध्ये आणेल हा अमेरिकेचा इशारा, काश्मिरमध्ये सार्वमत घेण्याची पाकिस्तानने युनोत केलेली मागणी आणि जनरल मुशर्रफ यांची नव्या पक्षाची घोषणा या घडामोडींमुळे पाकिस्तानमधील प्रश्नांचा गुंता सुटण्याऐवजी वाढण्याचीच चिन्हे आहेत. अशा स्थितीत भारताने आपल्या भूमिकेवर ठाम रहाणे अधिक महत्त्वाचे आहे. […]
ठाणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या साहित्यिक उत्तम कांबळे यांची ‘वाट तुडवताना’ आणि ‘आई समजूनघेताना’ हीआत्मचरित्रात्मक पुस्तके आणि इतर साहित्य सुपरिचित आहे. त्यांनी मराठी वाचन चळवळ गावोगावी पोचवणे, सामान्य माणसाला वाचनसंपन्न करणे, मांडवाबाहेरच्या पुरोगामी मंडळींना मुख्य मंडपात विचारमंथन करण्याची संधी देणे वगैरे उपक्रम योजले आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे वय यौवनाकडे झुकवणार्या कांबळेंसाठी हे अध्यक्षपद भाग्यशाली ठरावे. […]
बहुचर्चित रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाचा निकाल अखेर लागला आणि अख्ख्या देशातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने या निर्णयाचे सर्व स्तरांमध्ये शांततेने स्वागत झाले. या निर्णयात न्यायालयाने भक्ती आणि भावनांचा अधिक विचार केल्यासारखे वाटते. तसेच वादग्रस्त जागेवर पूर्वी मंदिर होते असे सांगण्यापेक्षा रामाचा जन्म त्याच ठिकाणी झाला असे सांगणे संयुक्तिक वाटत नाही. […]
खासगीकरणातून बांधण्यात आलेल्या विविध रस्त्यांवर सुरू असलेल्या अन्याय्य टोलवसुलीच्या विरोधात आता वाहनधारकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे या विषयाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मुदत संपून गेल्यानंतरही टोलवसुली सुरू असल्याचे प्रकार यापुर्वी उघडकीस आले आहेत. त्यामुळे जनतेच्या आर्थिक लुटीचे नवे साधन बनलेल्या टोलबाबत सरकार फेरविचार करणार का हा खरा प्रश्न आहे. […]
आता वेळ आलि आहे जगालाच नव्हे तर आपल्यातल्याच जातीय विषवल्ली जोपासनार्या जात्यांध नतद्रष्ट पैदासिंना दाखवून देणयाची.आता वेळ आली आहे जगाला एकता आणि शांततेचा संदेश देणयाची.आता वेळ आलि आहे जात,पात,धमर्,पंथापेक्षा माणुस धर्माचा जयजयकार करण्याची.अयोध्यातील वादग्रस्त जागेच्या हक्का बाबत न्यायदेवता उद्या निकाल देणे अपेक्षित आहे .हा निकाल म्हणजे भारतावर मोठे संकट आहे.भारतावर जणू काही अनूबाँम्ब फुटणार आहे.अश्याच असुरी अनंदात भारताचे काही शत्रू दात काढ़त असतिल.अशा नतद्रष्टांचे मनसुबे नेस्तनाबुत करण्या साठी त्यांची दात खीळी बसविण्यासाठी आता आम्ही भारतिय सज्ज झालो आहोत […]
ताज्या रस्ते अपघातांमध्ये ‘सारेगामापा’ स्पर्धेतील लक्षवेधी गायक राहुल सक्सेना, अपूर्वा गज्जला, गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रितम मते असे अनेक मान्यवर जखमी पडले. गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यात रस्ते अपघातात अनेकांनी प्राण गमावले. अशा अपघातांना रस्त्यांची दुरवस्था, चालकांचा बेदरकारपणा कारणीभूत ठरत असला तरी अपघात टाळण्यासाठी प्रशासन फारसे काही करत नाही हेही खरेच. ही परिस्थिती कधी बदलणार? […]
या मूर्तिकारांना श्री गणपती बाप्पा बनवितांना अनेक अडचणी येत असतात. आजकाल काही कृत्रीम साचे तयार करुन बाप्पांची निर्मिती केली जात असते पण विशालकाय बाप्पांच्या निर्मितीमागचे परिश्रम, ते तयार करतांना त्यांची निर्माण होणारी कल्पकता त्यात ते भरीत असलेले कलात्मक रंग अन् त्यावर फिरणार्या हळूवार कुंचब्यांचा अद्भूत अविष्कार हा सर्व विचार मनात आला की या मूर्तिकाराचा खरोखरच खुप अभिमान वाटतो त्यांच्या कल्पक बुध्दीला सॅल्यूट ठोकावा वाटतो. त्यांच्या कलेपूढं नतमस्तक व्हावसं वाटतं मग ती मूर्ति भारताच्या खेड्यातल्या मलकापूर पासून अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत पोहचलेल्या श्री गणेशाच्या मनमोहक मूर्त्या बनविणार्या सर्व मूर्तिकारांना ग्रेटच म्हणायला हवं. केवळ निखळ आनंद देण्याशिवाय त्यांच्या या कलेनं दुसरं काहीच दिलं नाही. सो थँक्स् टू ऑल गणपती बाप्पा मेकर्स अॅन्ड हिज आर्टस् ! […]