भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास मोठा रंजक आहे पण त्याच बरोबर बदलत्या काळानुरुप स्वरुप पालटलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीचा वर्तमान काळ देखील रंजक म्हणता येईल भारतीय चित्रपट सृष्टीने भारतीय रसिकांसाठी केवळ मनोरंजनाची कवाडे उघडली नाहीत तर समाज प्रबोधनाच्या कार्यासही हातभार लावला आहे. […]
दक्षिण आशियामध्ये चीनला प्रभाव वाढवायचा आहे. त्यात त्यांना भारताचा अडथळा जाणवत आहे. दुसरीकडे जागतिक महासत्ता बनण्यासाठी त्यांची अमेरिकेशी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही आघाड्यांवर लढताना त्यांनी पाकिस्तानला हाताशी धरून भारताच्या सीमांवर अशांतता निर्माण करण्याचे धोरण ठेवले आहे. यात भारताचे बरेच नुकसान होत असून अमेरिका आणि चीन यांच्या वर्चस्वाच्या युद्धात भारत होरपळून निघत आहे. […]
देशात ३३ लाख स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्या तरी या संस्थांनी नफा कमावू नये या मूळ उद्देशालाच हरताळ फासलेला दिसून येतो. काही संस्था निःस्पृहपणे काम करत असल्या तरी अनेक संस्था कर वाचवणे, प्रवर्तकांसाठी सुविधा निर्माण करणे,शासनाचा निधी उकळणे अशा कामांसाठीच स्थापन केल्या जातात. या संस्थांनी खरोखरच काम केले तर देशापुढील अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील. […]
टीव्ही लावला की प्रत्येक वाहिनीवर एखादा तरी लोकप्रिय कलाकार किवा क्रिकेटपटू विशिष्ट ब्रँडची जाहिरात करताना दिसतो. सेलिब्रिटीजची हीच प्रसिद्धी उत्पादन लोकप्रिय करते. ब्रँड एंडोर्समेंटमध्ये कलाकारांची अटीतटीची स्पर्धा सुरू असते. अशा जाहिरातबाजीचा फंडा अर्थविश्वात अनेक तरंग उमटवत असून त्यातून भले मोठे अर्थकारण आकाराला आले आहे. वलयांकित व्यक्तिमत्वाच्या या अर्थकारणाचा खास वेध. […]
गोरेगावमधील एनसीसी मैदानावरील भारतीय आंतरराष्ट*ीय दागिने प्रदर्शनात ‘दालुमी हाँगकाँग’ कंपनीच्या स्टॉलवरून तब्बल ६.६ कोटी रूपयांचे हिरे चोरीला गेले. सीसीटीव्हीच्या फुटेजमधून चार परदेशी हिरेचोरांचा संशय आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. इंटरपोल पथक आणि दुबई पोलिसांच्या मदतीने १० तासांच्या आत मेक्सिकोच्या चारही हिरेचोरांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली. […]
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. बालसाहित्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहेच, पण अनिल अवचटांसारख्या समाजकार्यात रमलेल्या लेखकाच्या वेगळ्या प्रयत्नाला मिळालेली दाद म्हणूनही या पुरस्काराचे मोल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बालसाहित्याकडे वळलेल्या आणि कसदार साहित्य निर्मिती करणार्या डॉ. अवचटांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केलेले कौतुक. […]
शेतकर्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा पायंडा राजकीय पक्षानी पाडला आहे. इतर कोणत्याही मुद्यांना हात न लावता या भावनिक मुद्याचा लाभ घेण्याच्या हेतूने आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रकार राजकीय पक्षानी चालविला आहे. […]
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या गाथेत अनेक घराणी कामी आल्याचा उल्लेख आहे. छत्रपतींची इमानेइतबारे एकनिष्ठेने सेवा करण्यात ज्या दोन जाती इतिहास प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महार समाज, ज्यांचा शिवाजी महाराज आदराने “नाईक” म्हणून उल्लेख करीत आणि दुसरा समाज कायस्थ प्रभूंचा होता. राजापूरचे बाळाजी आवजी चिटणीस, हिरडस मावळातील बाजी प्रभू देशपांडे आणि रोहीड खोरेकर देशपांडे नरस प्रभू गुप्ते या घराण्यातील पुरुषांनी स्वराज्याची सेवा हाच कुळधर्म मानला. मुत्सद्देगिरी, शौर्य आणि त्यागाची कमाल केली. […]
जगात सुरक्षा आणि संरक्षणासाठी विविध उपाय योजना तयार केल्या व राबवल्या जातात. कोणताही प्रगत देश असो आता पर्यंत यातील कोणतीही यंत्रणा वा कार्यप्रणाली हा ठोस किंवा निश्चित उपाय होऊ शकला नाही. अमेरिका, चीन, ईस्रायल, जपान सारखे देश आजही पर्यायी उपायासाठी चाचपडत आहेत. यावर पुण्यातील शास्त्रज्ञ, टेलीकॉम्युनिकेशन इंजिनिअर तथा माजी तंत्रज्ञान सल्लागार भारत सरकार श्री. दिनकर बोर्डे यांनी तयार केलेल्या “डायल २६११” या परियोजनेमुळे जगाला एक कायमस्वरुपी नागरी, सामाजिक, विभागीय, अंतर्गत, सीमावर्ती, तटवर्ती, अवकाशीय आणि देशीय सुरक्षा आणि संरक्षणासाठीचा ठोस व परिणामकारक उपाय मिळणार आहे […]