शेतकर्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा पायंडा राजकीय पक्षानी पाडला आहे. इतर कोणत्याही मुद्यांना हात न लावता या भावनिक मुद्याचा लाभ घेण्याच्या हेतूने आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रकार राजकीय पक्षानी चालविला आहे. […]
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या गाथेत अनेक घराणी कामी आल्याचा उल्लेख आहे. छत्रपतींची इमानेइतबारे एकनिष्ठेने सेवा करण्यात ज्या दोन जाती इतिहास प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महार समाज, ज्यांचा शिवाजी महाराज आदराने “नाईक” म्हणून उल्लेख करीत आणि दुसरा समाज कायस्थ प्रभूंचा होता. राजापूरचे बाळाजी आवजी चिटणीस, हिरडस मावळातील बाजी प्रभू देशपांडे आणि रोहीड खोरेकर देशपांडे नरस प्रभू गुप्ते या घराण्यातील पुरुषांनी स्वराज्याची सेवा हाच कुळधर्म मानला. मुत्सद्देगिरी, शौर्य आणि त्यागाची कमाल केली. […]
जगात सुरक्षा आणि संरक्षणासाठी विविध उपाय योजना तयार केल्या व राबवल्या जातात. कोणताही प्रगत देश असो आता पर्यंत यातील कोणतीही यंत्रणा वा कार्यप्रणाली हा ठोस किंवा निश्चित उपाय होऊ शकला नाही. अमेरिका, चीन, ईस्रायल, जपान सारखे देश आजही पर्यायी उपायासाठी चाचपडत आहेत. यावर पुण्यातील शास्त्रज्ञ, टेलीकॉम्युनिकेशन इंजिनिअर तथा माजी तंत्रज्ञान सल्लागार भारत सरकार श्री. दिनकर बोर्डे यांनी तयार केलेल्या “डायल २६११” या परियोजनेमुळे जगाला एक कायमस्वरुपी नागरी, सामाजिक, विभागीय, अंतर्गत, सीमावर्ती, तटवर्ती, अवकाशीय आणि देशीय सुरक्षा आणि संरक्षणासाठीचा ठोस व परिणामकारक उपाय मिळणार आहे […]
गेले काही दिवस एक इ-मेल इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहे. Aderoid नावाचा एक तारा पृथ्वीच्या अतिशय जवळ येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला २१ जून २०१० रोजी आकाशात दोन सूर्य दिसणार आहेत असे ते इ-मेल आहे. हे एक मनमोहक दृष्य असेल आणि असे दृष्य पुन्हा केवळ इ.स २२८७ मध्ये दिसेल असेही या इ-मेल मध्ये लिहिले आहे. मजा म्हणजे इ-मेल पाठवणार्याने २१ जून २०१० च्या आकाशाचे फोटोही त्यात पाठवले आहेत. हा इ-मेल पाठवणारा भविष्यवेत्त्या नॉस्ट्रेडॅमसचा अवतार तर नाही ना? […]
थोडक्यात- मानवाच्या प्रत्येक जखमेवर, दु:खावर काळच मात करू शकतो. त्यावर तोच उपाय आहे. काळाच्या ओघात हा आघातही दूर होईल. आता मी जे या खेपेला सांगितले, त्याचे तूही रोज मनन करशील. हे दोस्त, उदास… निराश नको होऊस! […]
अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात यावर मी जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. हे काम आपल्यावरच सोपवतो. अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात अशी मागणी केली तर तो परत बटबटीत पणा भडक पणा वाटेल . […]
१३ जून १९६९ या दिवशी आ. अत्रे आपल्यातून निघून गेले, वरळीच्या ‘शिवशक्तीतून‘ दादरच्या स्मशानभूमीपर्यंत त्यांची जी प्रचंड अंत्ययात्रा निघाली ती आजही लोकांना आठवत असेल. आ. अत्रे गेले आणि मराठीचा अत्यंत अभिमानी असा महापुरूष निघून गेला. आ. अत्रे गेल्यानंतर १९७६ पर्यंत ‘मराठा‘ दैनिक चालू राहिले व ते नंतर बंद पडले. ‘शिवशक्ती‘ सुध्दा दुसर्यांच्या हातात गेली त्यामुळे आ.अत्रे यांचे नाव मराठी माणसांच्या स्मृतीपटलावरून हळूहळू नाहीसे होऊ लागले. ज्या महापुरूषाने मबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई प्राणपणाने लढून जिंकली, त्याचे मराठी मनाला विस्मरण होऊ लागले याची टोचणी वृत्तपत्रव्यवसायात काम करणार्या माझ्या काही मित्रांनाही लागून राहिली. […]
अलीकडच्या काळात अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बजेटचा थोडा मागे जाऊन इतिहास रंजक आहे. भारतीय अर्थसंकल्पाबाबतची ही मोजकी पण संग्रही ठेवावी अशी माहिती. […]
आज आपल्या राज्यामध्ये मध्ये जर राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष सारखेच नाकर्ते असतील तर केवळ “सिस्टीम” ला नावे ठेवून आणि “हे असेच चालणार ” असे सुस्कारे सोडून महाराष्ट्रा ची नक्कीच प्रगती होणार नाही.कुठेतरी आपण कार्यरत झाल्याशिवाय हे राज्य सुधारणार नाही.रस्त्या वर उतरून एक मेकांची डोकी फोडणे आणि मग जेल च्या वारया करणे याने काहीही सध्या होत नाही.घरबसल्या केवळ १० रुपये आणि थोडासा वेळ दिला तर सामान्य माणूस सुद्धा सामाजिक कार्य करू शकतो.तेव्हा मी महाराष्ट्रा तील जनतेला विनंती करीन कि माहितीचा अधिकार कायदा जाणून घ्या,त्याचा भरपूर वापर करा […]
त्या भर उन्हात कर्जतच्या बाजारपेठेनं एका अस्सल कलावंताचा अभूतपूर्व असा उत्स्फूर्त आविष्कार पाहिला. त्या कलावंताला नव्हतं भान बाजारपेठेचं, तिथल्या गर्दीचं, नव्हतं भान कशाचं! तो नव्हता यशवंत दत्त, तर त्या क्षणी तो होता – अप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट! […]