चित्रकार असो , लेखक असो . कवी असो ज्याचे त्याचे स्वतःचे असे विश्व् असते. तो त्यात रमतो तर काहीजण अत्यंत चातुर्याने आपला कार्यभागही साधू शकतात. अशी अनेक प्रकारची व्यक्तिमत्वे आजूबाजूला बघावयास मिळतात. चित्रकार किंवा चित्र काढणे आणि त्याचा अभ्यास करणे या गोष्टीना आपल्या मध्यमवर्गात कधीच सहजपणे थारा मिळत नाही. […]
भारतातील देवस्थानांभोवती असणाऱ्या देवराया ही जैवविविधतेची केंद्रे आहेत. अनेक सजीवांचे वसतिस्थान असणाऱ्या अशा जागा जगात इतरत्रही काही ठिकाणी आढळतात. इथिओपियातल्या देवराया हे अशा देवरायांचेच एक उदाहरण. इथिओपियात जी थोडीफार वनसंपत्ती टिकून आहे, ती या देवरायांमुळेच. या देवराया टिकून राहाव्यात म्हणून इथिओपियात प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांची ही माहिती… […]
देश-विदेशात गणपतीची लाखो मंदिरे आहेत. एकट्या बंगलोर शहरात तर १० हजारावर मंदिरे आहेत. महाराष्ट्रात तर एकही गाव असे नसेल की जेथे गणपतीचे मंदिर नाही. पण श्रीगणेश कुटुंबाचे मंदिर तुम्ही पाहिले आहे का? असा प्रश्न केला तर अनेकांचे उत्तर मात्र नकारार्थी येईल. […]
पृथ्वीभोवतालच्या अंतराळात बराच कचरा जमा झाला आहे. आपणच निर्माण केलेला हा कचरा, आज आपल्याच उपग्रहांना घातक ठरतो आहे. आपल्या भोवतालच्या अंतराळाचा, आपल्या सुखसोयींसाठी पूर्ण क्षमतेने उपयोग करायचा असेल, तर या कचऱ्याचा वेळेवर निचरा होणेही गरजेचे आहे. या ‘अंतराळ कचऱ्याच्या संदर्भातील विविध बाबींवर प्रकाश टाकणारा हा लेख… […]
क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेतल्या काही सामन्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अशा वेळी धावसंख्येचे लक्ष्य निश्चित करण्यासाठी डकवर्थ/ लुईस/स्टर्न यांनी सुचवलेल्या गणिती नियमाचा वापर केला जाईल. गणितावर आधारलेल्या अशा विविध नियमांची ही ओळख… […]
‘सेंट हेलेना’ हे दक्षिण अटलांटिक महासागरातलं, आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून दूरवर वसलेलं, ब्रिटिश अधिपत्याखालचं एक छोटंसं बेट आहे. सुमारे १२० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या या बेटाचं, आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासूनचं अंतर सुमारे दोन हजार किलोमीटर इतकं आहे. नेपोलिअन बोनापार्ट या फ्रेंच राज्यकर्त्याचं नाव जोडलं गेल्यानं, हे बेट सुपरिचित झालं. […]
प्रत्येक व्यक्तीच्या मनात घराच्या बाबतीत एक स्वप्न ‘घर’ करून राहिलेलं असतं. घर लहान असो वा मोठे, स्वप्न खरे झाले तर त्याच्या मनाला शांतता व समाधान मिळून त्याला त्याचा आनंद मिळतो […]
पृथ्वी ही भौगोलिकदृष्ट्या सात खंडांत विभागली आहे. त्यातील काही खंडांचे भूभाग हे एकमेकांना जोडले आहेत, तर काही खंडांचे भूभाग एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण अमेरीका या खंडांचा भूभाग हा युरोप, आफ्रिका आणि आशिआ या खंडांच्या भूभागापासून पूर्ण वेगळा आहे. तसंच ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाच्या भूभागांना स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु आज वेगवेगळं अस्तित्व असलेले हे सगळे भूभाग, काही कोटी वर्षांपूर्वी एका महाखंडाच्या स्वरूपात एकत्र वसले होते. […]
आज काल बऱ्याच घरांमध्ये हायपर टेन्शन, हाय किंवा लो ब्लड प्रेशरची समस्या किंवा आजार असतो. रक्तदाब म्हणजेच BP चा त्रास असणाऱ्या व्यक्तीचा वेळोवेळी BP चेक करावा लागतो. व तो आपण BP मशीन द्वारे चेक करू शकतो. तसेच प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणे शक्य होत नाही, त्यासाठी घरात एखादे BP मॉनिटर मशीन असणे सोयीस्कर होते. […]
आज जगातील प्रत्येक विकसित व विकसनशील देशात शेअर बाजाराचे अस्तित्व आहे. भारतात पहिला संघटित शेअर बाजार १८७५ मध्ये मुंबईमध्ये स्थापन झाला जो आशियातील सर्वात जुना बाजार आहे. […]