नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

आम्र वृक्षाचे पौराणिक व धार्मिक महत्व

आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे वर्णन आहे. बुद्ध चरित्रात गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते याच्या कथा आहेत. […]

टिळकांची स्वदेशी संकल्पना आणि आजचा भारत

ब्रिटिश भारतात आले व्यापाराच्या निमित्ताने ! इथला पैसा त्यांनी तिकडे नेला, ते आणखी श्रीमंत झाले आणि पैशाच्याच बळावर ब्रिटिश आपल्यावर राज्यसुद्धा करू लागले ! भारतात पिकणारा कच्चा माल संपन्न असला तरी त्या मालावर इथेच प्रक्रिया होऊन हिंदुस्थानात उद्योगांचे जाळे उभे करणे मात्र ब्रिटिशांना पसंत नव्हते. […]

हात गणपतीचे!

श्री गणेश हे महाराष्ट्राचं सर्वात लाडके दैवत. भारतातील जे पुराणोक्त २१ गणपती आहेत. त्यापैकी १७ गणपती एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशभरातील गणपती मंदिरांची संख्या लाखोंच्या संख्येने आहे. दिवसेंदिवस गणेशभक्तांची संख्या वाढतच आहे. गणपतीचे नुसते नाव जरी घेतले तरी चार हातांच्या गोंडस मूर्तीचे रूप चटकन नजरेसमोर येते. […]

वाहतो ही दुर्वांची जुडी – महती २१ संख्येची

संख्याशास्त्रात २१ या संख्येची महती विलक्षण आहे. श्रीगणेश उपासनेत तर त्या संख्येचं माहात्म्य असाधारण म्हणावं लागेल. गणेशाची पूजा करताना २१ संख्येचं पालन कटाक्षाने केलं जातं. गणपतीला २१ दुर्वा वाहतात. […]

‘बूमरँग’ अशनी!

अशनी म्हणजे अंतराळात फिरणारे दगड-धोंडे. या अशनींपैकी काही अशनी पृथ्वीवर पोचतात. यांतील छोट्या आकाराचे अशनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोचण्यापूर्वीच जळून नष्ट होत असले, तरी मोठ्या आकाराचे अशनी हे मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोचू शकतात. असे अशनी जर वाळवंटासारख्या फिकट रंगाच्या प्रदेशात पडले, तर त्यांचे तुकडे या वाळवंटी प्रदेशात काहीसे सहजपणे सापडू शकतात. […]

माझी M- 80

माझी अत्यंत आवडती टू व्हिलर .पाच फुटापेक्षाही कमी उंची असलेल्यांसाठी एक वरदानच, दोन्ही पाय जमिनीला टेकवू देणारी गाडी. […]

श्रीगजानन ज्ञान-विज्ञान

आपल्या देवांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांच्या शरीरातला शिराचा (डोक्याचा) भागच वेगवेगळ्या देवांमध्ये वेगवेगळा असतो. उदा. हत्तीचं तोंड असेल तर गणपती, वानराचं तोंड असेल तर मारुती, सिंहाचं तोंड असेल तर नृसिंह, घोड्याचं तोंड असेल तर तुंबरू इ. तर देवांच्या या स्वरूपांमध्ये एक सांकेतिक संदेश आहे आणि तो आपल्या मंत्राशी निगडित आहे. […]

पेणचा गणपती – एक परंपरा

पेण मधला गणेशमूर्ती तयार करण्याचा व्यवसाय आता चांगला प्रतिष्ठा पावलाय. गणपतीची उत्तम मूर्ती कुठली तर पेणचीच अशी पेणची ख्याती झाली आहे. भारताच्या नकाशावरील बारीक टिंबाएवढं पेण गाव आषाढ महिना संपून श्रावण उजाडला की एकदम प्रकाशझोतात येतं. […]

अठरा हाताचा गणपती

रत्नागिरी शहरातील आंबराई वरची आळी या भागात १८ हात असलेल्या गणपतीचे मंदिर असून महाराष्ट्रातीलच नव्हे जगात पहिलेच गणेश मंदिर आहे. १८ हात असलेली श्री गणेशमूर्ती फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच आहे. हे गणेशाचे मंदिर कै. विनायक कृष्ण जोशी यांनी स्वतःचे मालकीचे ठिकाणात स्वखर्चाने बांधले आहे. […]

ड्रॅक्यूलाचे अश्रू

सन १८९७मध्ये प्रसिद्ध झालेली, ‘ड्रॅक्यूला’ ही ब्रॅम स्टॉकर यांची कादंबरी म्हणजे एक भयकथा आहे. ही कादंबरी इतकी लोकप्रिय झाली, की त्यावर अनेक चित्रपटही निघाले. या कादंबरीतलं ड्रॅक्यूला हे पात्र रक्तपिपासू आहे. हे पात्र लेखकानं, रोमानिआमधील वॉलॅशिआ प्रदेशात पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या, व्लाद (तिसरा) या क्रूर लष्करी सरदारावर बेतलं असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण, या कांदबरीलाही आजच्या रोमानिआची पार्श्वभूमी लाभली आहे आणि तिसरा व्लाद हा स्वतः ‘ड्रॅक्यूल्ये’ या नावानंही ओळखला जायचा. […]

1 22 23 24 25 26 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..