मॅरॅथॉन शर्यत ही अॅथलेटिक्समधली एक अत्यंत प्रतिष्ठेची शर्यत आहे. सुमारे बेचाळीस किलोमीटर अंतराच्या या शर्यतीत धावपटूच्या शारीरिक क्षमतेचा पूर्ण कस लागतो. साहजिकच या स्पर्धेकडे फक्त क्रीडातज्ज्ञांचंच नव्हे, तर संशोधकांचंही लक्ष असतं. गेल्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे तीन तासांत पूर्ण केली जाणारी ही शर्यत, आजचे खेळाडू ती जवळपास दोन तासांत पूर्ण करू लागले आहेत. […]
विज्ञानाची प्रगती, वैद्यकीय उपचार, लोकात आरोग्याविषयी निर्माण झालेली सजकता यामुळे आयुर्मान वाढले आहे. तथापि, वृद्धापकाळात अनेक समस्या निर्माण होत आहेत. सर्व समस्यांना तोंड देण्याची अनेकांच्या मनाची तयारी झालेली नसते. त्यांचे एक कारण म्हणजे मागच्या पिढीतील त्यांचे आईवडील एवढे जगलेले नसतात. दुसरे आपली मुले चांगली आहेत आणि ती वृद्धापकाळात आपली व्यवस्थित काळजी घेतील. या भाबड्या समजुतीत अनेक असतात. […]
नूतन भारतीय हिंदी सिनेमातील एक आघाडीची नायिका, जन्म ४ जून १९३६. वडील कुमारसेन समर्थ आणि आई शोभना समर्थ, चित्रपट कलेशी जोडलेले. वयाच्या १३ व्या वर्षी तिने ‘हमारी बेटी’ या सिनेमामधून नायिका म्हणून पदार्पण केले. विशेष म्हणजे ह्या सिनेमाची निर्मिती तिच्या आई, शोभना समर्थ यांनी खास तिच्या साठीच केली होती. तिने अभिनय केलेला ‘हम लोग’ हा सिनेमा तिला तिच्या आई वडिलांनी बघू दिला नाही. […]
ऐतिहासिक स्वातंत्र्य संग्रामामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिकांचा फार मोठा वाटा होता. देशी वृत्तपत्रांचे मालक आणि संपादक यांचा थेट किंवा अप्रत्यक्षरित्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग होता. त्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून ते आजच्या सोशल मीडिया, वेब पोर्टल आणि ऑनलाईन पत्रकारितेच्या जमान्यापर्यतच्या जवळपास सव्वा दोन शतकाच्या दीर्घ प्रवासात वृत्तपत्रसृष्टीला अनेक स्थित्यंतराला सामोरे जावे लागले आहे. […]
आज जवळजवळ सर्वच क्षेत्रांत संगणकाचा वापर होतो आहे. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सतत संगणकाचा वापर करतो आहे. त्या निमित्ताने, संगणकाची सोप्या भाषेत ओळख करून देणारी ही लेखमाला ‘पत्रिके’त वर्षभर प्रकाशित केली जाणार आहे. या अंकापासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील हा पहिला लेख अर्थातच संगणकाच्या ‘पूर्वजां’ बद्दलचा… […]
ती तिच्या नावाप्रमाणे दीनदुबळ्यांची ‘ आई’ होती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे दीनदुबळे लोक कोणत्याही एका विशिष्ट भागाचे, देशाचे वा खंडाचे नव्हते तर संपूर्ण जगातील होते. मानवसेवेचे एवढे मोठे कार्य तिने केले होते म्हणूनच तिला १२७९ सालचे शांततेचे नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आले आणि हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिल्याबद्दल सार्या जगातून स्वागत करण्यात आले. ही दीनदुबळ्यांची आई म्हणजेच मदर टेरेसा. […]
डिक्शनरी आणि डिरेक्टरी आता नामशेष होण्यातच जमा आहेत. आजची e -पिढी गुगल वरच त्यांचे अर्थ सर्च करेल. पण आमचे हे संपर्क आणि शब्दांचे ब्राउझर आठवणींच्या ट्रंकेतला एक कोपरा व्यापुन विराजमान राहतील. […]
भारताच्या अंतराळ क्षेत्रातील भरीव यशात काही महत्त्वाचे टप्पे आहेत. यांतला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. या ऐतिहासिक उड्डाणास पन्नास वर्षे झाल्याच्या निमित्ताने हा विशेष लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२३ च्या अंकात प्रकाशित झाला होता. चांद्रयान ३ च्या निमित्ताने पुन्हा प्रकाशित करत आहोत. […]
तिच्या कवितांमध्ये केवळ एका विशिष्ट भागाचे, भाषेचे वा स्थानिक प्रश्नांचे प्रतिबिंब पडलेले नाही; तर त्यामध्ये संपूर्ण मानवी जीवनाचे प्रतिबिंब आहे. म्हणूनच १९९६ सालचा साहित्यविषयक नोबेल पुरस्कार तिला मिळाला. या पोलिश कवयित्रीचे नाव होते विस्लावा सिम्बोर्सका. तिला नोबेल पुरस्कार बहाल करताना स्वीडिश अकादमीने म्हटले की सिम्होर्सका यांच्या कविता मानवी जीवनातील सत्याच्या इतिहासाबरोबरच जैविक संदर्भाच्या बाबतीतही तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत. […]