इंग्लंडमधील अॅस्टन जिल्ह्यातील बर्मिंगहॅम येथील हे प्रसिद्ध फुटबॉल मैदान आहे. १८९७ पासून ॲस्टन व्हिला फुटबॉल क्लबचे ते होम ग्राउंड आहे. १६ इंटरनॅशनल सामन्यांचे यजमानपद व्हिला पार्कने यशस्वी केले. १८९९ मध्ये तेथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला. इंग्लंडमधील हे पहिले वहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे फुटबॉल मैदान आहे. […]
मातृभूमीच्या रक्षणासाठी जनरल निखाइल कलाशनिकोव्ह यांनी ज्या ‘ एके -४७ ‘ चा शोध लावला .. दुर्दैवाने ती आता अतिरेक्यांचे लाडके शस्त्र बनली आहे . या ‘ एके -४७ ‘ च्या जन्माची ही कहाणी . […]
भारतीय रेल्वे ही खऱ्या अर्थाने भारतीयत्वाची खूण सांगणारी आणि हिमालयापासून कन्याकुमारीच्या समुद्रापर्यंत देशाला जोडणारी, एकात्मतेचे महत्त्वाचे प्रतीक ठरलेली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास हा केवळ लोहमार्ग-बांधणीचा वा तांत्रिक सुधारणांचा आहे; तितकाच एक संघटनयंत्रणा (ऑर्गनायझेशन) म्हणून रेल्वेच्या होत गेलेल्या विकासाचाही हा इतिहास आहे. १८५० नंतर रेल्वेच्या उभारणीला जसा वेग आला, तसाच त्यानंतर १०० वर्षांनी, म्हणजे १९५० नंतर स्वतंत्र भारताची रेल्वे सेवा प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या प्रकारे संघटित करावी, या प्रयत्नांनीही वेग घेतला… तिथवरच्या इतिहासातून उलगडणाऱ्या या प्रशासनखुणा… […]
पृथ्वीवर आज अस्तित्वात असणारा, सगळ्यात वजनदार प्राणी म्हणजे निळा देवमासा. मात्र या देवमाशालाही वजनाच्या बाबतीत अगदी सहजपणे मागे टाकेल, असा एक देवमासा प्राचीन काळी अस्तित्वात होता. प्राचीन काळी म्हणजे खूपच पूर्वी – सुमारे चार कोटी वर्षांपूर्वी. हा देवमासा फक्त निळ्या देवमाशापेक्षाच वजनदार नव्हता, तर तो आतापर्यंत पृथ्वीवर होऊन गेलेल्या कोणत्याही प्राण्यापेक्षा अधिक वजनदार प्राणी ठरला आहे. […]
नालंदा विद्यापीठात १५०० गुरु आणि वेगवेगळे अभ्यासक्रम करणारे ८५०० विद्यार्थी रहात असत. दिवसाला १०० चर्चासत्र व वादविवाद होत असत. एका गुरूच्या हाताखाली सात ते आठ विद्यार्थी असत. गुरु प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देत असत. […]
नालंदा विद्यापीठाच्या उद्गमा बद्दल अनेक प्रवाद आहेत,त्यापैकी एक म्हणजे संघराम शहराच्या दक्षिणेस एका आंब्याच्या झाडाखाली एका हौदात नाग रहात असे,त्यावरून नाव पडले. […]
आजच्या संगणकाच्या युगातही आकडेमोडीसाठी कॅलक्युलेटर हे साधन वापरले जातेच. आता संगणकावर, घड्याळात, मोबाइलमध्ये कॅलक्युलेटर आहे. लॅटिनमधील कॅलक्युलेअर म्हणजे दगडांच्या मदतीने मोजणी, यावरून कॅलक्युलेटर शब्द तयार झाला. पूर्वीच्या काळी आपल्याकडे अर्ध्या भागात रंगीत मणी लावलेली पाटी होती, तिच्यात जी खुबी होती त्याचाच वापर करीत गणनाची संकल्पना प्रगत झाली. […]
फळे आणि भाज्या यांची शेती आणि तंत्रज्ञान ही जोडी वरकरणी विसंगत वाटते. परंतु, तंत्रज्ञान शेतीच्या सर्व टप्प्यांमध्ये फार मोठी कामगिरी बजावते; आणि शेतकऱ्याला उत्तम पीक, उत्तम नफा आणि ग्राहकाला रास्त भावात उत्तम फळे आणि भाज्या मिळायला कशी मदत करते, याचा आढावा घेणारा हा लेख… […]