फळे आणि भाज्या यांची शेती आणि तंत्रज्ञान ही जोडी वरकरणी विसंगत वाटते. परंतु, तंत्रज्ञान शेतीच्या सर्व टप्प्यांमध्ये फार मोठी कामगिरी बजावते; आणि शेतकऱ्याला उत्तम पीक, उत्तम नफा आणि ग्राहकाला रास्त भावात उत्तम फळे आणि भाज्या मिळायला कशी मदत करते, याचा आढावा घेणारा हा लेख… […]
काय करू काही समजत नव्हतं , कोणत्या स्थळाची / वराची निवड करू ? भल्या मोठ्या पगाराची शहरात नोकरी करणारा ,कि गेल्या तीनचार वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला , कि प्रगतिशील असलेल्या एखाद्या गावात स्वतःचा जमीन जुमला , बंगला , शेतकरी असलेला ग्रामीण भागात राहणारा . […]
हा फोटो नीट पहा. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेफ थॉ़म्पसनने ७ खेळाडुंना क्षेत्ररक्षण करण्यासाठी अगदी फलंदाजाजवळ लावले आहें. म्हणजे यष्टी रक्षक तसेंच स्वतः मिळुन असें नऊ खेळाडु खेळपट्टी जवळच आहेत. राहता राहीलें २ खेळाडु उर्वरीत मैदानात क्षेत्र रक्षणासाठी उरतात. […]
“मी आणि डॉ.काशिनाथ घाणेकर” हा एका उच्चविद्याविभूषित, रुबाबदार, देखण्या, बेदरकार, अभिनयसंपन्न त्याचबरोबर कलंदर, काहीसे एककल्ली, जीवन उधळून टाकणाऱ्या पण माणूसपण ल्यालेल्या व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास आहे, जो त्यांच्यातील संपूर्ण गुण दोषांसहित रमेशजींच्या शब्दांमधून उलगडत जातो, कारण तो त्यांनी जवळून पाहिलेला आहे. […]
हिरा हे आपल्याला सुपरिचित असलेलं रत्न आहे. हिरा म्हणजे प्रत्यक्षात स्फटिकाच्या स्वरूपातला कार्बन. योग्य अशा उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची परिस्थिती निर्माण झाली, की कार्बनचं हिऱ्यात रूपांतर व्हायला लागलं. अशी परिस्थिती पृथ्वीच्या कवचाखालील भागात अस्तित्वात असते. त्यामुळे पृथ्वीच्या या अंतर्भागातील कार्बनचं रूपांतर हिऱ्यांत होऊ शकतं. […]
व्यवस्थापन या विषयावर प्रोफेसरांनी व्याख्यानं देणं सुरु केलं आणि पुढे हाच त्यांच्या जीवनाचा, अविभाज्य असा उपक्रम झाला. याच कालावधीत त्यांचा विवाह, मुंबईतील दिपा पिंगळे यांच्याशी झाला. त्या मुंबईत नोकरी करीत होत्या. सौ. दिपा यांनी दिलीप यांना जीवनाच्या वाटेवर भक्कम साथ दिली. […]
आजपासून ४३ वर्षांपूर्वी….. ३१ जुलै २०२३ या दिवशी एक अशुभ वार्ता रात्री देणारी सकाळ उगवली होती….. लहान मुलासारखं निर्व्याज हसू असणारा एक उत्कृष्ट चेहेरा तितक्याच उत्कृष्ट आवाजासह शांत झाला ! मुझको मेरे बाद ज़माना ढूँढेगा म्हणणारा रफ़ी शांत झाला ! […]
श्रीकृष्णा नदी ही साक्षात् विष्णुस्वरूप व वेणी ही शिवस्वरूप असून या दोन्ही नद्या एकरूपाने अभिन्नपणे वाहतात म्हणूनच कृष्णा नदीला केवळ कृष्णा हे नाव नसून तिला कृष्णावेणी असे संबोधतात. अशा या दोन नद्या व शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती मिळून पंचगंगा असे सात नद्यांचे मिलन या क्षेत्री झाले आहे. […]
आजच्या औद्योगिक युगातली एक महत्त्वाची गरज म्हणजे कागद. लिखाणासाठी किंवा छपाईसाठी वापरला जाणारा कागद, वेष्टणासाठी वापरला जाणारा कागद, नॅपकिन म्हणून वापरला जाणारा कागद… अशा वेगवेगळ्या स्वरूपात कागदाचा वापर केला जातो. मात्र या कागदनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान, लाकडाच्या लगद्यातील काही पदार्थ वेगळे करून काढून टाकावे लागतात. […]
अगदी क्वचित प्रसंगी मात्र खूप चांगला, सुखावणारा अनुभव येऊन जातो. त्या दिवशी असच झालं, मी बोरीवलीहून ठाण्याला जाणारी TMT ची वातानुकूलित बस पकडली. आत येऊन तोल सांभाळत पैसे काढण्यासाठी मी खिशात हात घालताच, कंडक्टरने अगदी आपलेपणाने मला आधी बसून घ्यायला सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला उठवून मला बसायला जागा दिली. […]