शिर्षक वाचून हैराण झाला असाल परंतु हे आजचे वास्तव आहे हे कुणीही नाकारणार नाही. एखादी समस्या आली की आपण उपाय शोधतो अर्थात अनेक उपाय असतात ते थकले की माणूस त्या समस्यांना कंटाळतो आणि मग तो शेवटच्या उपायाकडे वळतो तो म्हणजे आत्महत्या.
आजपर्यंत अनेक डॉक्टर्स , समन्वयक उत्तम भूमिका निभावतात परंतु मानवी मन भन्नाट आणि प्रचंड वेगवान आहे. […]
आफ्रिका खंडात पर्यटनाला जाण्याची कल्पना आपल्याला युरोपात जाणे इतकी आकर्षक वाटत नाही मात्र डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या या पुस्तकातील केनियाच्या सफरीचे वर्णन वाचून आफ्रिकेत जाण्याचे वेध लागले नाहीत तरच नवल! […]
मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय उपकरण वापरले जाते त्याला ग्लुकोज मीटर असे म्हणतात. […]
मराठी पत्रकारितेची महान परंपरा तब्बल १८५ वर्षांची. बाळशास्त्री जांभेकरांनी १८१२ साली सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया घातला. त्यांनी आपल्या वृत्तपत्राला दिलेले नावही मोठे अर्थपूर्ण असेच आहे. कारण १८५ वर्षानंतर मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींच्या दर्पण मध्ये आज आपला चेहेरा निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. […]
ज्या भौतिक वस्तुच्या निर्मितीशास्त्राला इंग्रजीत “ इंजिनिअरिंग” म्हणतात त्याला शिल्पशास्त्र असे व्यापक अर्थ असलेले भारतीय नांव आहे. शिल्पशास्त्र मनुष्य जन्मापासून विकसित होत गेले. आधुनिक अभियांत्रिकी शास्त्रांत अंतर्भाव असलेली अनेक शास्त्रे प्राचीन भारतांत विद्यमान होती. भृगु ऋषींनी या शिल्पशास्त्र विषयाचे दहा उपशास्त्रे, बत्तीस विद्या व चौसष्ठ कला या मध्ये विभागणी केली. वास्तुशास्त्र हे सातवे उपशास्त्र. […]
कॉर्डलेस फोन हा वापरण्यास अगदी सोपा असतो. रिसिव्हरच आपल्याजवळ असल्याने चटकन योग्य तो संदेश दोन व्यक्तींमध्ये पोहोचवता येतो. यात वायरींचे जंजाळ नसते हे त्याचे वैशिष्ट्य. काही कंपन्यांमध्ये अजूनही अंतर्गत संदेशवहनासाठी अशा प्रकारचे कॉर्डलेस फोन वापरले जातात. […]
इंग्लंडमधील अॅस्टन जिल्ह्यातील बर्मिंगहॅम येथील हे प्रसिद्ध फुटबॉल मैदान आहे. १८९७ पासून ॲस्टन व्हिला फुटबॉल क्लबचे ते होम ग्राउंड आहे. १६ इंटरनॅशनल सामन्यांचे यजमानपद व्हिला पार्कने यशस्वी केले. १८९९ मध्ये तेथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला. इंग्लंडमधील हे पहिले वहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे फुटबॉल मैदान आहे. […]
मातृभूमीच्या रक्षणासाठी जनरल निखाइल कलाशनिकोव्ह यांनी ज्या ‘ एके -४७ ‘ चा शोध लावला .. दुर्दैवाने ती आता अतिरेक्यांचे लाडके शस्त्र बनली आहे . या ‘ एके -४७ ‘ च्या जन्माची ही कहाणी . […]
भारतीय रेल्वे ही खऱ्या अर्थाने भारतीयत्वाची खूण सांगणारी आणि हिमालयापासून कन्याकुमारीच्या समुद्रापर्यंत देशाला जोडणारी, एकात्मतेचे महत्त्वाचे प्रतीक ठरलेली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास हा केवळ लोहमार्ग-बांधणीचा वा तांत्रिक सुधारणांचा आहे; तितकाच एक संघटनयंत्रणा (ऑर्गनायझेशन) म्हणून रेल्वेच्या होत गेलेल्या विकासाचाही हा इतिहास आहे. १८५० नंतर रेल्वेच्या उभारणीला जसा वेग आला, तसाच त्यानंतर १०० वर्षांनी, म्हणजे १९५० नंतर स्वतंत्र भारताची रेल्वे सेवा प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या प्रकारे संघटित करावी, या प्रयत्नांनीही वेग घेतला… तिथवरच्या इतिहासातून उलगडणाऱ्या या प्रशासनखुणा… […]