नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

अरुणोदय – कुरुंदवाड संस्थान – कृष्णाकाठ

कृष्णाबाईच्या काठावरच्या त्या आसमंतात त्या भल्या पहाटे सुखद गारवा होता. नदी संथ वाहात होती. धुक्याचा मुलायम पदर नदीवर … शेतशिवारांवर पसरलेला होता. घाटावरच्या देवळातल्या घंटांचा मंद नाद मनाला सुंदर स्पर्श करत होता. काकड आरतीची वेळ समीप येत होती. […]

कथा बोटीच्या ड्रायडॉकिंगची

बोटीचे सारे ‘जीवन’ पाण्यातच असते, आणि ते पाण्यालाच वाहिलेले असते. परंतु, समुद्रात बोटीला कधी अपघात झाला, कधी गंजलेला पत्रा बदलायचा असेल, कधी रंगकामासाठी किंवा बोटीच्या तळाला चिकटलेले जीवाणू काढून तळ, बोटीच्या बाजू स्वच्छ करावयाच्या असतील तर ती बोट ‘ड्रायडॉकिंग’ला पाठवावी लागते. याच प्रचंड जबाबदारीच्या प्रक्रियेची ही कथा… […]

तक्षशिला – भारतातील प्राचीन विद्यापीठ – भाग 4

प्रवेश सर्व जातीना मुक्त होता. कोणी कोणता अभ्यासक्रम घ्यावा यांची प्रत्येक विद्यार्थ्याला मुभा होती.त्यावर कोणतेही बंधन नव्हते.जे काही शिकवले जाई,ते ज्ञानासाठी होते. […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय चौदावा – गुणत्रयविभाग योग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय. […]

दशश्लोकी निर्वाणदशकम्

दशश्लोकी निर्वाणदशकात श्रीमद् आदि शंकराचार्यांनी वेदांताचे सार सांगितले आहे. या रचनेच्या नावाशी साधर्म्य असलेले शंकराचार्यांचेच निर्वाण षटकही प्रसिद्ध आहे. नर्मदा तीरी एका गुहेत श्री गोविंदपादाचार्यांची भेट झाल्यावर त्यांनी विचारलेल्या ‘ तू कोण आहेस? ’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ही दोन स्तोत्रे !  परंतु दोघांची जन्मकथा एकच असली तरी त्यांच्या विषय मांडणीमध्ये फरक आहे […]

मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला

मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला ….. स्वीकारावी पूजा आतां उठी उठी गोपाला हे गाणं अजरामर आहे. सकाळच्या शांत प्रहरी या गाण्याचे सूर ऐकू आले की आजच्या स्वार्थाने पुरेपूर वेढलेल्या प्रचंड कोलाहलात देखील मन क्षणात प्रसन्न, शांत होतं. एक वेगळीच मंगलता मनाला स्पर्श करू लागते. मन खूप मृदू होतं. धुपाचा गंध दरवळायला लागतो. […]

चकाकणारा बाह्यग्रह

आपल्या सूर्याला जशी ग्रहमाला आहे, तशाच ग्रहमाला इतर अनेक ताऱ्यांनाही आहेत. आतापर्यंत अशा हजारो ग्रहमाला आणि त्यातील ग्रह शोधले गेले आहेत. इतर ताऱ्यांभोवतालचे हे ग्रह ‘बाह्यग्रह’ या नावानं ओळखले जातात. हजारोंच्या संख्येत आढळलेल्या या बाह्यग्रहांपैकी अनेक बाह्यग्रह स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत. […]

मोना लिसाचं गूढ…

लिओनार्दो दा व्हिंचीने चितारलेले ‘मोना लिसा’ हे चित्र दीर्घकाळ चर्चेत राहिलेले चित्र आहे. या चित्राचे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केले आहे. यात वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. अलीकडेच केल्या गेलेल्या आणखी एका वैद्यकीय विश्लेषणामुळे मोना लिसाच्या वैशिष्ट्यांत आणखी एका शक्यतेची भर पडली आहे. त्या शक्यतेचा हा आढावा… […]

नॅटुफिअन बासऱ्या

वाद्यांना विविध मानवी संस्कृतींत महत्त्वाचं स्थान आहे. वाद्यांचा उपयोग हा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो – करमणूक म्हणून, संदेश पाठवण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी, वगैरे. वाद्यांचा असा उपयोग आजच नव्हे, तर प्राचीन काळीही केला जात असे. त्यामुळे प्राचीन काळी कोणत्या संस्कृतींत कोणती वाद्यं वापरात होती, हा अभ्यासकांच्या दृष्टीनं एक उत्सुकतेचा विषय आहे. […]

1 31 32 33 34 35 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..