देवमासे वर्षभराच्या काळात आपल्या वास्तव्याची जागा बदलत असतात. त्यांच्या वास्तव्याच्या जागेत होणारा हा बदल वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकतो. काही जातींचे देवमासे हे उन्हाळ्याच्या काळात, जिथे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं अशा किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी जातात; तर थंडीच्या दिवसात ते प्रजोत्पादनाच्या दृष्टीनं अनुकूल असणाऱ्या किनारी भागात राहतात. […]
अभ्यासामध्ये आपल्या परीक्षेच्या वेळी कधी अभ्यास केला नसेल परंतु डॉक्टर कडे जाताना आपल्या आजाराचा इंटरनेट वरती सखोल अभ्यास करून आलेले महा विद्वान पेशंट…. […]
इजिप्तचं वैशिष्ट्य असणाऱ्या पिरॅमिड या वास्तू, संशोधकांच्या दृष्टीनं अत्यंत कुतूहलजनक रचना ठरल्या आहेत. काही पिरॅमिडच्या आतल्या भागात थोडंफार शिरता येत असलं तरी, त्या पिरॅमिडची संपूर्ण रचना कशी आहे, त्यांतील विविध रचनांचा उद्देश काय आहे, ते अजूनही आपल्याला ठाऊक नाही. […]
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई नागपूर द्रुतगती महामार्ग म्हणजेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात मोठा तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा महामार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देणारा, विविध विभागांत कनेक्टिव्हिटी प्रदान करणारा तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. […]
नेली ब्लाय ही जगप्रसिद्ध अमेरिकन पत्रकार ! बातमी मिळवून तिची ‘स्टोरी’ करण्यासाठी ती कोणतीही भूमिका करीत असे. ही भूमिका करताना ती कोणतेही धाडस करीत असे. तिच्या धाडसाला सीमा नव्हती. समाज काय म्हणले याची भीती तिने कधीच बाळगली नाही. वाचकांना सत्य जाणण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तिच्या मनाची तयारी असे. […]
इथे साधारण तीनेक प्रकारची घर दिसतात. पहिला प्रकार अपार्टमेंट स्वरूपाचा. ती एक किंवा दोन मजली असतात. आपल्याकडे इमारती असतात तशी. त्यामध्येदेखील ऐसपैस जागा असते: […]
अमेरिकेत पाऊल टाकले की तिथला विलक्षण निसर्ग मनाला भावतो. आपला भरतखंडही यादृष्टीने संपन्न आहेच. त्याला स्वतंत्र परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. […]
मानवाच्या ‘अधिपत्या’खालील भूप्रदेश वाढत आहेत, जंगलं नष्ट होत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्यासुद्धा घटत आहे. विविध वन्यप्राण्यांची संख्या ही पृथ्वीवरच्या वन्यजीवनाच्या ‘प्रकृती’ची निर्देशक असते. वन्यप्राण्यांच्या संख्येवर होणारा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणून घ्यायचा असला तर, कोणत्या जातीचे किती प्राणी अस्तित्वात आहेत, हे माहीत असायला हवं. […]
लुडविग वॅन बिथोवेन हा अभिजात पाश्चात्य संगीताच्या क्षेत्रातला एक महान संगीतकार. इ.स. १७७०मध्ये जन्मलेल्या या जर्मन संगीतकारानं आपल्या सांगीतिक कारकिर्दीत उत्तमोत्तम अशा सुमारे सातशे सांगीतिक रचना निर्माण केल्या. त्याची ही सांगीतिक कारकिर्द सुमारे पंचेचाळीस वर्षांची होती. आश्चर्य म्हणजे अशी दीर्घ काळ निर्मितीक्षमता लाभलेल्या या संगीतकाराची श्रवणशक्ती मात्र त्याच्या तरूण वयातच क्षीण होऊ लागली होती. […]
ममी हा इजिप्तच्या पुरातन इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. ममी म्हणजे इजिप्तच्या राजघराण्यातील, तसंच तिथल्या सधन लोकांची, प्रक्रियेद्वारे जतन करून ठेवलेली शवं. ममीद्वारे मृताचा अनंताकडचा प्रवास सुरू होत असल्याचं मानलं जायचं. त्यामुळे ममी ही अगदी रूढीपूर्वक तयार केली जायची. […]